ऑनलाईन मराठी कट्यांच्या आणि ग्रूप्सच्या मराठी आणि महाराष्ट्रासाठीच्या योगदानाची माहिती हवी
आंतरजालाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या ऑनलाईन मराठी लोकांच्या कट्यांच्या आणि ग्रूप्सच्या मराठी आणि महाराष्ट्रासाठीच्या उल्लेखनीय योगदानाची माहिती हवी.
* कट्टे = यात मराठी संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारे कट्टे आले
* ग्रूप = यात जुने याहू ऑर्कूट ग्रूप नवीन काळातील फेसबूक ग्रूप इत्यादी तत्सम ग्रूप आले
* या धाग्यावर प्राप्त ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेली माहिती मराठी विकिपीडियासाठी वापरली जाऊ शकते म्हणून नेहमी प्रमाणे या धाग्यावरील आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.
* दिल्या जाणार्या माहितीस इतर सदस्यांचा दुजोरा उपयूक्त ठरणारा असू शकेल.