समाज

महाराष्ट्रातल्या निवडणूकीचे अंदाज

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
3 May 2014 - 11:05 am

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत... त्यातल्या किती जागा कोणाकडे जातील... सगळ्यांना उत्सुकता आहे
याबाबतचा अंदाज वागळेंच्या कार्यक्रमातला वर्तवण्यात आला आहे
आपण तो अवश्य पहावा
https://www.youtube.com/watch?v=itWhYgG4It0

काँग्रेस-राष्ट्रवादी १६-१८
महायुती - ३०-३२
यात मनसेचा एखादा उमेदवारही असू शकतो- कल्याण सुरेश म्हात्रे

समाजप्रकटन

चलती का नाम गाडी- ४: प्रदूषण नियंत्रण ( युरो नॉर्मस )

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
2 May 2014 - 3:54 am
समाजजीवनमानप्रकटनविचारआस्वाद

पैसा म्हणजे ...

असहकार's picture
असहकार in काथ्याकूट
30 Apr 2014 - 5:34 pm

पैसा म्हणजे साधन , पैसा म्हणजे साध्य ,
पैसा म्हणजे सुःख , पैसा म्हणजे दुःख ,
पैसा म्हणजे अश्रू , पैसा म्हणजे हसू ,
पैसा म्हणजे शांती , पैसा म्हणजे अशांती ,

पैसा म्हणजे दुधाची वाटी ,
पैसा म्हणजे शाळेची पाटी ,
पैसा म्हणजे तरूणाची लाठी ,
पैसा म्हणजे म्हाताऱ्याची काठी ,
पैसा म्हणजे मरणानंतरची ताटी ,

पैसा म्हणजे प्रगती, पैसा म्हणजे अधोगती,
पैसा म्हणजे मालक, पैसा म्हणजे नोकर,
पैसा म्हणजे घामाचा दाम , पैसा म्हणजे हाताचा मळ , पैसा म्हणजे शोषितांचे रक्त ,

विवाहांतर्गत बलात्कारांचा प्रश्न

arunjoshi123's picture
arunjoshi123 in काथ्याकूट
30 Apr 2014 - 3:54 pm

या संदंर्भात सद्य भारतात ही माहिती उपयुक्त ठरावी.
http://timesofindia.indiatimes.com/india/Treat-marital-sexual-abuse-as-r...
नि
http://www.indialawjournal.com/volume2/issue_2/article_by_priyanka.html
नि
http://timesofindia.indiatimes.com/india/Govt-justifies-exclusion-of-mar...

केंद्र परिघाचं नातं

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
30 Apr 2014 - 11:09 am

(लेख फार पूर्वी अन्यत्र प्रसिद्ध झाला आहे; सहज आठवला म्हणून मिपाकरांशी शेअर करत आहे)

वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते.

समाजआस्वादअनुभव

थोड positive थोड negative

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
28 Apr 2014 - 12:13 am

एस टि तिल काही अनुभव कायम स्वरूपी लक्षात राहिले. सध्याच्या महिलन्वरिल वाढत्या अत्याचारचे प्रमाण बघता हे अनुभव मला नेहमी आठवतात.

समाजअनुभव

दिल्लीतील पहिला वहिला कट्टा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
27 Apr 2014 - 4:41 pm

चित्रगुप्त उवाच:
दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.

समाजजीवनमानमौजमजाबातमी

मोदींच्या लोकप्रियतेचे कारण

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in काथ्याकूट
27 Apr 2014 - 12:42 pm

नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे.

आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे.

विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी
तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे.

डेटिंग गेम - डिनरडेट - हलकाफुलका धागा

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
27 Apr 2014 - 7:56 am

अतिशय हलकाफुलका, जंत्रीवजा बराचसा निर्बुद्ध आणि हुच्चभ्रूच्या अगदी विरुद्ध निव्वळ मनोरंजनात्मक व पाश्चात्य (विशेषता: अमेरॆकेअन) संस्कृतीत जो डेटिंग गेम चालतो त्यात सर्वसाधारण कोणत्या नियमांवर खेळ खेळला जातो त्याचे उथळ चित्रण करणारा हा धागा असून सर्वांनी हलका घ्यावा अशी विनंती. धागाकर्ती सर्व मुद्द्यांशी सहमत असेलच असे नाही. जड्व्यागळ धाग्यांपासून हटके , डोक्यास नो कल्हई असे या धाग्याचे स्वरूप आहे. तसेच या धाग्याला स्त्री-पुरुष लढाईचा आखाडा बनवू नये, अथवा ...... ऑन सेकण्ड थॉट बनवा ना माझ्या तॆर्थरुपांचे काय जाते.

संस्कृतीसमाजजीवनमानविरंगुळा