समाज

माहिती हवी आहे-.........सहकारी सोसायटी.

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
15 Apr 2014 - 6:56 pm

खालील विषयांवर निश्चित अशी माहिती कुणाकडे असल्यास हवी आहे.

सहसा बिल्डर गाळा धारकाना पार्किंग वाटून देतो. यात स्टिल्ट खाली पार्किंग हवे असेल तर काही पैसे आपल्या करारात न दाखवता रोखीने घेतो. नंतर काही काळाने इमारतीचे खरेदी खत करून सहकारी गृहरचना संस्था स्थापन केली जाते. काही कालाने दुचाक्यांची संस्ख्या वाढते .अशी वेळ आल्यास चारचाकी बाहेर हकलण्याचे दडपण जनरल बॉडीचा ठराव करून किंवा अनधिकृत्त पणे धमकी वगैरे देऊन आणण्यात येते. अशा स्थितीत बिल्डरने केलेले वाटप वा जनरल बॉडीने केलेला ठराव यात
कायदेशीरित्या महत्ता कोणाची.(who supercedes whom ? )

आडनावाच्या आडून...

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
14 Apr 2014 - 10:45 pm

शाळेचा पहिला दिवस. ५ वी चा वर्ग. वर्गशिक्षिका जोशीबाई. वर्गाची 'ओळखपरेड' चालू होती.एक-एक विद्यार्थी उभे राहून आपली ओळख करून देत होता.मी उभा राहीलो (उंची कमी असल्यामुळे उभा आहे का बसलेला आहे ह्यात विशेष फरक पडत नव्हता व बाकहि उंच होते.) मीही माझी ओळख करून दिली. सगळ्या वर्गाची ओळखपरेड पूर्ण झाल्यावर बाईंनी माझ्याकडे बघितले व म्हणाल्या 'गोडसे' माझ्यासमोरील पहिल्या बाकावर बस. पुढून तिसर्या बाकावरून थेट मी पहील्या बाकावर आलो. पहिल्या बाकावरचा हुशार शिंदे तिसर्या बाकावर फेकला गेला. सापशिडीचा खेळ म्हणावा तर मी कोणतेही फासे टाकले नव्ह्ते. उंचिचे म्हणावे तर तोही माझ्याइतकाच उंचीचा होता.

विनोदसमाजविरंगुळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सचिन७३८'s picture
सचिन७३८ in जनातलं, मनातलं
14 Apr 2014 - 6:53 am

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम. जय भीम !!!

उध्दरली कोटी कुळे ।
भीमा तुझ्या जन्मामुळे ।।

Babasaheb

धोरणइतिहाससाहित्यिकसमाजराजकारण

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
11 Apr 2014 - 5:25 pm

ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल!

ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

धोरणमांडणीकथासमाजजीवनमानतंत्रराहणीनोकरीविज्ञानअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियामाध्यमवेधशिफारससल्लामाहितीमदतप्रतिभा

चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
11 Apr 2014 - 4:00 am

मुलांना कार आणि मुलीना बाहुल्या खेळायला आवडतात असा एक समज असतो . मला लहानपणी गाड्या फार आवडत. पुढे या क्षेत्रात मागील काही वर्षे काम करायला मिळतंय तेव्हाचा आनंद काय विचारता! या मालिकेची सुरुवात खरं तर जून २०१३ ला जाग्वार वरील लेखाने केली होती. त्यावेळी मिपा अचानक बिघडल्याने उत्साह जरा कमी झाला अन नंतर राहून गेलं. तिथले अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद पण उडून गेले. असो. आता पुन्हा प्रयत्न करतोय.

चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल

मांडणीसमाजप्रकटनविचारआस्वाद

आठवणीतील मराठी (इमेल) ग्रूप्स आणि संस्थळे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
9 Apr 2014 - 1:55 pm

खर म्हणजे मागच्याच महिन्यात इंटरनेट चा उदय होऊन पंचविस वर्षे झाली. सर्नचे अभियंता टिम बर्नर-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरुवात केली[१]. सर्न या संस्थेने ३० एप्रील १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.[२] सायबर विश्वात मराठीचे पहिले पाऊल रोवण्याचा मान ‘मायबोली‘ या संकेतस्थळाला जातो. १९९६ मध्ये (www.maayboli.com) हे संकेत स्थळ सुरू झाले[३] म्हणजे मराठी आंतरजालावर येऊनही जवळपास १८ वर्षे झाली.

बडोदा येथे "मी राज्य करण्यासाठी आलो आहे"

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
9 Apr 2014 - 1:48 pm

फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर
अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड,
(मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

संस्कृतीकलाइतिहाससमाजराजकारणप्रकटनआस्वादलेखसल्लामाहितीमदतभाषांतर

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१०

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
8 Apr 2014 - 7:52 pm
संस्कृतीसमाजमौजमजाविरंगुळा

कळी जपताना....

स्मिता श्रीपाद's picture
स्मिता श्रीपाद in काथ्याकूट
8 Apr 2014 - 12:11 pm

केवळ चार वर्षाचं छोटसं पिल्लु.... आत्ताशी कुठे शाळेच्या फुलपाखरी विश्वात प्रवेश केलेला..... सगळं जग खुप गोड आणि रंगिबेरंगी वाटणारं वय....
आणि अचानक तिच्या आयुष्यात काहितरी वेगळच घडत....काय घडलं ? कसं घडलं ? हे पण कळलं नसेल तिला....
रोज भेटणारे बसमधले काका आपल्याशी असे का वागले हे पण कळलं नसेल.....
कसं सहन करायचं ते तिनं.....

चार वर्षांच्या चिमुरडीवर ओढवलेल्या प्रसंगाने अस्वस्थ झालेय मी कालपासुन....
माणसं इतकी विक्रूत का होत असतील.....?