बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
श्वास आहे घास नाही कोरडे नि:श्वास केवळ
भाकरीचा चंद्र नाही, चांदण्याचा भास केवळ
साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे
माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ
मिरग गेला हस्त गेला पांढरीला ओल नाही
धान नाही पेरणीला, पावसाची आस केवळ
प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे
मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ
खोल नांदे जखम ओली वेदनेला अंत नाही
मोकळा आहे तरी ना मुक्त मी... आभास केवळ
अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने?
सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ
विशाल ५/०९/२०१५
त्या वीर मुलास प्रेम.पूर्वक श्रद्धांजली , ज्याचे मृत.देह इस्तांबुल च्या समुद्र काठी मिळाले.
इस्लामिक स्टेट (कवितेत त्यांसाठी कावळा अशी उपमा वापरली आहे) च्या आतंका पासून स्वतःच्या परिवाराची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात अत्यान्त् सध्या होडीतून आपल्या परिवारास घेऊन अथांग सागराचा प्रवास करणाऱ्या ११ लोकांना घेऊन जाणारी होडी सागरात विलीन झाली.
ह्या लहान ३ वर्षाचे मृत देह मात्र सागराने परतावले , जगास त्यांचे कर्म त्यांना दाखवून देण्या साठी. एवढीच आशा कि हे हृदय विदारक चित्र पाहून तरी आतंकी मन बदलतील.
….त्या लहान आयलान कुर्दी साठी..
आजकाल माणुसकी भटकल्याने
दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे!
माणसांनी तिला सोडून दिल्याने
ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!
याहूनी सुखी जग ते कोणते?
भेटल्याचा आनंद नाही
निरोपाचा खेद नाही....
आभासी जगातला फिल कसा
गुड गुड व्हेरी गुड!
आठवणींचे सेल्फी कुठले?
हसल्याचा आवाज नाही
मुसमुसल्याचा गंध नाही......
आभासी जगातला टच कसा
साॕफ्ट साॕफ्ट मायक्रोसाॕफ्ट!
कोण जागतो कोणासाठी?
फिकट डोळे दिसत नाहीत
उरली रात्र सरत नाही....
आभासी जगातला गुंता कसा
क्रेझी क्रेझी काचणारा!
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!)
प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे -
('खरे' कवी यांची माफी मागून...)
आयुष्य ना सुखांचे अंधार दाट होता
बुद्धयाच वेदनांशी श्रृंगार थाटलेला
झाली उजाड़ स्वप्ने, सत्यास दंभ होता
चातुर्य प्राक्तनाचे कळलेच ना कदापी
रक्तास चटक ओल्या लागून आज गेली
जखमाच त्या, तयांशी, संसार थाटलेला
अस्तित्व जाणिवांचे उधळून रात्र गेली
त्यां टाळणे मलाही जमलेच ना कदापी
होता तसाच आहे ओसाड माळ तिथला
पान्हा वसुंधरेचा वक्षात गोठलेला
मी रान शुष्क होतो पाऊस स्तब्ध तिथला
गोंजारणे फुलांना रुचलेच ना कदापी
पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट..
रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !!
त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त..
युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !!
केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात...
जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !!
अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी...
बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !!
आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता...
त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !!
अबला की सबला ,
वयस्क की बाला ,
नारी की कुमारी,
ऑफिस, शाळा की पाळणाघरी,
फुलायच्या आधीच कोमजली कळी ,
त्यांची नजरच विखारी ,
काळी की गोरी,
शिकलेली की भोळी,
मोलकरीण की अधिकारी ,
फुलायच्या आधीच कोमजली कळी,
सावज हेरणारे हे अट्टल शिकारी,
साडी असो की जीन्स
तोकडे कपडे की पदडाशीन,
गर्दीच्या बाजारी,की सुनसान आळी,
फुलायच्या आधीच कोमजली कळी ,
कायमची जखम ती जिव्हारी .
जगावेगळे मागणे मागतो मी
तुझी याद नाही विसर मागतो मी
स्मरावे तुला ना प्रभो मी कधीही
तुझ्या दुश्मनांना शरण मागतो मी
नको शाश्वती जीवनाची दयाळा
हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी
किती आजवर मीच केलीत पापे
नको श्वास आता, अभय मागतो मी
इथे माजले धुर्त स्वार्थांध सारे
जमावे मला वाकणे.., मागतो मी
नुरे पात्रता रे तुला प्रार्थण्याची
'हरामीपणा' थोडका मागतो मी
जगाला कळेना विनंत्या मनाच्या
विषाचाच जहरीपणा मागतो मी
कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'?
जगावेगळ्या मागण्या मागतो मी !
विशाल..