स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता
प्रत्येक नजर वाटे
धरतेच डूख आता
स्त्रीजन्म हीच आहे
हर स्त्रीची चूक आता ||धृ||
हक्क कितीक आले
आरक्षणेही आली
आणि वेगळेपणाची
मग लक्षणेही आली
गर्दीत पुरुषांच्या
कोंडतो श्वास येथे
एकटेपणात होतो
भलताच भास येथे
शोधता स्नेह नयनी
दिसतेच भूक आता
कळपात श्वापदांच्या
गत होई जी हरणाची
होते तशी अवस्था
अन भीती ही मरणाची
एकही भला चेहरा
ना वाटतो आधार
सर्वांसमक्ष येथे
घडतोही अत्याचार
सगळा समाज वाटे
झालाय मूक आता