तेंव्हा
तेंव्हा स्वप्नांसाठी , जागणारी ‘तळमळ’ वेगळी होती
ऊरी भीती हुरहूर , आवडणारी ‘हळहळ’ वेगळी होती !
जीव गहाण खळीसाठी , पैंजनास कान दिला
कुंतलात मुख , मन वेधणारी ‘सळसळ’ वेगळी होती !
वीण जोडून वर्तमानी , दाविले भविष्य त्यांनी
घेऊन प्राक्तन हाती, वाहणारी ‘कळकळ’ वेगळी होती !
भोवतीचं भान नाही , क्षण एकेक माजलेला
बोचलं सुख ज्यांना , वाटणारी ‘खळखळ’ वेगळी होती !
दोष त्यांचाच होता , ज्यांच्या सदाचारी वल्गना
पडदा घेऊन द्वेषाचा , भेदणारी ‘मळमळ’ वेगळी होती !