सीमारेषा
आहे आणि नाही यांच्या
सीमारेषेवर जगणे तसे
फार अवघड असते गं
------
श्वासाइतकीच सवयीची
झालेल्या तुझ्या आणि
माझ्यातील अंतर
आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे
एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही
आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित....
आहे आणि नाही यांच्या
सीमारेषेवर जगणे
फार अवघड असते गं
-------
सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात
तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात
कटलेल्या पतंगामागे धावण्यार्या मुलासारखा
मीही त्यांचा पाठलाग करत राहतो
मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय