निघाली खाशी हो स्वारी
दुष्काळी त्या दौऱ्यावरी
संगे घेउनिया लवाजमा
फौजफाटाही तो भारी
तिकडे नाही की पाणी
कोरड्याच साऱ्या विहिरी
संगे घेउनिया बिस्लेरी
ट्रकमधे भारी भारी
खाण्याला नाही बाजरी
ना दाणा ना भाकरी
संगे घेउनिया कारभारी
कुशल सैपाकी आचारी
डोईवर छत्री ती धरी
सोबतचा चमचा कुणीतरी
संगे घेउनिया गालीचा
पायघडी ती कुणी अंथरी
निघाली खाशी ती स्वारी
पहा हो विमाने ती वरी
संगे घेउनिया सामग्री
दुष्काळी त्या दौऱ्यावरी !
.
प्रतिक्रिया
21 Feb 2013 - 5:05 pm | अविनाशकुलकर्णी
कविता छान लिहिली आहे .....
पण युगानु युगे नेते असेच वागत असल्याने बोथट व मुर्दाड मनावर परिणाम करत नाहि..
मी नगरचा असल्याने पाण्या साठी पाय पिट मला माहित आहे...
दुश्काळ इश्टापत्ति आहे व फार मोठे अर्थकारण त्यात दडल्याचे वाचनात आले...
22 Feb 2013 - 11:56 am | फिझा
विषय आवडला कवितेचा !!!