दारवा....

पक पक पक's picture
पक पक पक in जे न देखे रवी...
16 Feb 2013 - 10:53 pm

आज जरा जास्तच झाली आहे असे रोज बार मधे बिल आल्यावर वाटते,फक्त चार पेग लावुन देखील दोन तासांत ते शेट्टी हराम्खोर फारच लुट्तय ,

तरी बोटे चालतात नोटा मोजायला पण बिल वाचायला डोके मात्र चालत नाही , back ground मध्ये गोंगाट अन शिव्यागाळी शिवाय काहीच ऐकु येत नाही,

तितक्यात बायकोचा फोन येतो, संध्याकाळी भाजी आणायला बाहेर पड्लास आता गिळायला तरी येणार आहेस का म्हणून आवाज कारदावतो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो. (मग वेटर देखिल ९० अन ६० ची सोय करुन जातो ;) )

मन हे नुसते सोड्याच्या फेसा सारखे उसळत असते, भविष्याच्या विचाराने अंधारलेल्या प्रकाशात डचमळ्त असते,
वेटर पुढे पैसे फेकुन सुरू होतो उद्याच्या खर्चाचा ताळ्मेळ, विचार करता करता घरी पोहचून मी वाजवते घराची बेल,

दरवाजा उघडता पिल्लू येते धावत, पायाला मिठी मारून करते गोड माझे स्वागत,
घेता त्याला मिठीत जिव माझा जळ्तो ,अन तेच मन विचारत रहाते " तु असं का करतो....तु असं का करतो... "

करुणकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2013 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा

:-)

अग्निकोल्हा's picture

16 Feb 2013 - 11:52 pm | अग्निकोल्हा

बार बदलुन बघा बरं काही फरक पडतो का ते ?

पक पक पक's picture

17 Feb 2013 - 8:08 am | पक पक पक

आज बघतो.. ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Feb 2013 - 9:28 am | ज्ञानोबाचे पैजार

बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे सुरु करा. स्वस्त पडेल, बायकोच्या हातचा गरम गरम चखणा पण मिळेल आणि पिल्लु जवळ पास घुटमळत राहील त्यालाच ग्लास मधे सोडा ओतायला सांगायचा. बॅकग्राउंडला गोंगाट आणि शीव्यागाळी चालुच असेल बायकोची.शिवाय जेवणाची वेळ चुकणार नाही, गरम गरम जेवण आणि फोनचे बीलही वाचेल.
तुमच्या बद्दल सहानुभूती वाटली म्हणुन सुचवले हो. बघा करुन पटले तर.
पैजारबुवा,

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Feb 2013 - 9:30 am | श्री गावसेना प्रमुख

बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे सुरु करा
कोणती गावठी,की देशी

पक पक पक's picture

17 Feb 2013 - 9:40 am | पक पक पक

सहानुभुती पुर्वक सल्ल्या बद्द्ल धन्यवाद... :)

पक पक पक's picture

20 Feb 2013 - 8:28 am | पक पक पक

पैजारबुवा 'घरात बसुन घेतल्याचा फायदा झाला .. ;) अजुन एक टंकल आहे 'सुरुवात... ' कस वाट्ल ते सांगा.

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2013 - 9:35 am | श्रीरंग_जोशी

त्रिपकराव - दंडवत स्विकारा...

अवांतर - अशा लेखनावर वैधानिक इशारा देणे विसरू नका हो...

संसारा उध्वस्त करी दारू,
बाटलीस स्पर्श नका करू...

त्या पेक्षा घराजवळचा बघावा,

काव्याचा ( की गद्यकाव्याचा) शेवट थोडा हळवा आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2013 - 10:41 am | परिकथेतील राजकुमार

उगाच विडंबनासाठी विडंबन केल्यासारखे वाटले.

येवढे प्रश्न पडतात / त्रास ज्यांना होतात त्यांनी दारुच्या नादाला लागुच नये.

साला तुमच्या सारख्या लोकांसाठी दारु बनलेलीच नाही. दारुवर कसे नितांत प्रेम करावे.

पक पक पक's picture

20 Feb 2013 - 1:14 pm | पक पक पक

आयला ! परा महाराज , अहो हे तुम्हाला काय माझ आत्मचरित्र वाट्ल का काय..? :)
बाकि आमच देखील दारुवर नितांत प्रेम आहे.. ;)

सासुरवाडीकर's picture

21 Feb 2013 - 1:30 am | सासुरवाडीकर

' देशी ' बजेट मध्ये बसेल

भावना कल्लोळ's picture

23 Feb 2013 - 5:25 pm | भावना कल्लोळ

काय बोलू, सुचेनाच …।

jaypal's picture

23 Feb 2013 - 5:31 pm | jaypal

मैने पिना सिख लिया
मैने जिना सिख लिया
पाप कहो या पुन्य कहो
मैने पिना सिख लिया

jaypal's picture

23 Feb 2013 - 5:59 pm | jaypal

w