तुझे एकेक विचार.......

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
25 Oct 2013 - 12:19 pm

तुझे एकेक विचार
जपलेत मनांत,
तूच दिलेले श्वास
आज पिंजऱ्यात......!!

आज पिंजऱ्यात
जन्मा जन्माची साथ,
तन बंबाळ जखमांनी
अन वाट पायात......!!

वाट पायांत अन
आग दही दिशात,
होरफळत चाललो मी
तुझ्या एका वचनात......!!

तुझ्या त्या वचनात
प्रेम बलिदानात,
हृदय घायाळ पण
हसं डोळ्यात.......!!

हसं डोळ्यात
वाराही शांत,
थकून गेलो मी
शेवटच्या सहवासात........!!

तुझ्या शेवटच्या सहवासात
अनोळखी क्षणात,
पानगळीच जगणं
.....आणि बाकी शून्यात ...........!!
.....आणि बाकी शून्यात ...........!!

श्री. साजीद यासीन पठाण

करुणकविता