आज खूप दिसांनी
पुन्हा त्या वास्तूत आलु,
पडक्या पांढरीच्या इटा बघून
काळूखात त्या हरवून गेलू !!
माती सारता हातांनी
डोळं उघडं निर्जीव धूड,
नवलाईत सगळं डोळं
वासं झोपल्याचं त्यात गूढ !!
वाटतंय राहून राहून मना
माती कृतघ्न नसावी झाली,
आखीरपर्यंत आसंल थरथरली
जरी शेजाऱ्यांनी मान ढाळली !!
या मातीतच वलावा उभारा
त्यावर निर्धास्त सोडला पसारा,
दोन चिमुकली फळे संसारा
झोपली गार ओढून ढिगारा !!
दैव घालाच तिथं वास्तूचं काय ?
बायको मुलांसंगती कारभारी जाय,
पर मी आकारल्या मातीला वाटलं असावं
समद्यासोबत माझा हात धरायचा नाय !!
डोळ्यांतल्या पाण्याबरोबर
पांढरी माय चमकत हुती,
पाणी साचल्या डवंग्यात मातुर
पानकणसं तुरयात हुती !!
येतोय हुंदका तेंव्हाचाच एकदा
ओकू कि पिवू त्याला आता,
धैर्य बळ वृधत्वाशी विरघळता
कंप सुटे उभे राहता !!
श्री. साजीद यासीन पठाण
प्रतिक्रिया
13 Nov 2013 - 12:42 pm | जेपी
***
13 Nov 2013 - 12:42 pm | जेपी
***
13 Nov 2013 - 12:45 pm | प्यारे१
साजिद भाई,
(तुमच्या दुसर्या कवितेच्या तुमच्याच प्रतिसादाला इथं उत्तर देतोय.)
प्रतिसादांची काळजी न करता लिहीत रहा.
तुमच्याकडून इतर लेखांवर सुद्धा थोडे प्रतिसाद पण देत चला.
कधीकधी त्यानं मला प्रतिसाद दिला नाही मग मी का देऊ असं असतं 'आमच्याकडं' ;)
लेखन भिडणारं असलं तर आपसुकच प्रतिसाद मिळतो.
कधी नेमकं काय लिहायचं ते समजत नाही म्हणून देखील प्रतिसाद मिळत नाहीत.
प्रसंगानुरुप कधी ताज्या गोष्टींबद्दलच्या लिखाणाला मार्केट पटकन मिळतं.
त्यामुळं लिहीत राहा. :)
13 Nov 2013 - 1:04 pm | झंम्प्या
अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं,
मळक धोतर, टोपी, कोपरी, वाढलेली दाढीची खुट, पाठीत वाकेला, पाठ पोट एक झलेला मळक्या अंगाचा, हातात माती घेऊन भरल्या डोळ्यांनी घराकड पाहत असणारं कोणी, समोर दिसतंय.
येतोय हुंदका तेंव्हाचाच एकदा
ओकू कि पिवू त्याला आता,
मुक्याने मार खाऊन गप्प उभा
15 Nov 2013 - 12:28 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
15 Nov 2013 - 12:31 pm | शैलेन्द्र
काळजातुन हलवणारी कविता
15 Nov 2013 - 11:52 am | arunjoshi123
हृद्य
15 Nov 2013 - 11:53 am | अमेय६३७७
हृद्य