आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली ….

घन निल's picture
घन निल in जे न देखे रवी...
25 Oct 2013 - 6:53 pm

आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली ….
शब्दांमध्ये गुंफून भावना कागदावरती उतरली …

माझे मला वागण्याचे कोडे का पडावे ,
आसे काहीसे विपरीत का माझ्या हातून घडावे
माझीच व्यथा अनावर … माझा पोटशूळ ठरली …
आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली ….

माझ्याच दोन आसवांचे सामने खेळतो मी ,
बेधुंद यातनांच्या कैफात लोळतो मी …
डोळ्यात अखेर माझ्या आसवेंच उरली ….
आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली ….
शब्दांमध्ये गुंफून भावना कागदावरती उतरली …

करुणकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Oct 2013 - 9:25 pm | पैसा

सुरुवात चांगली होती. पण मधेच

आसे काहीसे विपरीत का माझ्या हातून घडावे
माझीच व्यथा अनावर … माझा पोटशूळ ठरली …

बात कुछ जमी नहीं.

बॅटमॅन's picture

26 Oct 2013 - 11:45 pm | बॅटमॅन

=)) =))

कच्चा माल अलर्ट ;) =))