दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका
इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥
पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥
क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
शतसहस्र "बळी" बळीचे, पण हाल पुसेना त्यांचे
या शहाण्यांच्या सद्बुद्धीवर, अवदसा कुठूनी आली?
मुळी कशाची लाज न उरली; की बुद्धी भ्रमिष्ट झाली?
पगार-वेतन विनाश्रमाचे यांना करतसे नादान है? ॥
या देशाच्या पुढारकांचा दिमाग सटकला आहे!
दीडदमडीच्या सुधारकांचा विवेक भटकला आहे!!
एकच प्रश्न अंतिम आता, पुसून घेऊ पुन्हा
विद्वानांनो, सुशिक्षितांनो, अरे! काय बिमारी तुम्हा?
काय नेमका इलाज तुम्हावर? आयुर्वेद की अॅलो?
धागे-दोरे की मांत्रिक-बाबा? बस एकबार तो बोलो!
जेणेकरूनी विवेक तुमचा येईल ताळ्यावरती
'अभय'तेने जगेल जनता त्यांच्या शेतावरती
आम्हालाबी जगू द्या आता! हम भी तो इन्सान है!!
- गंगाधर मुटे 'अभय’
--------------------------------------------------------
प्रतिक्रिया
15 Dec 2013 - 7:21 am | अत्रुप्त आत्मा
:)
15 Dec 2013 - 7:35 am | वेल्लाभट
मस्त ! जबरी झालीय !
फक्त
हे काय मले जमलं नाय ब्वा !
20 Dec 2013 - 12:40 am | गंगाधर मुटे
एकाचवेळी एकापेक्षा जास्त एकसमान घटना घडत असतील तर मग प्राधान्यक्रम ठरवणे महत्वाचे ठरते.
हजारो शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत. त्या तुलनेने नरबळीमुळे मरणारांची संख्या अगदीच नगण्य किंवा कोणत्याच खिसगणतीत नाही. अशा परिस्थितीत कोणी हजारो शेतकर्यांच्या मरणाकडे ढुंकूनही पाहायला तयार नसतील मात्र नरबळी मुळे राष्ट्रीय आपत्ती कोसळली आहे, असा आभास निर्माण करत असतील तर अशा दिडशहाण्यांच्या सदसदविवेकबुद्धीबद्दल संशय घ्यायला नक्कीच वाव तयार होतो.
मरण हे मरण असते, ते थांबायला हवे. यासाठी केवळ सर्वसाधारण मनुष्य प्रयत्न करत असतो. पण;
स्वतःला अतिविद्वान घोषीत करून समाज सुधारायला निघालेले बेगडी समाजसुधारक मात्र "केवळ त्यांची स्वतःची महती ज्यामुळे वाढते" केवळ तोच अजेंडा रेटत असतात.
दुर्दैव आपले, दुसरे काय?
15 Dec 2013 - 12:04 pm | पैसा
या शहाण्या पुढार्यांनी 'मेरा भारत महान' म्हटलं होतं खरं, पण ते "मेरा इंड्या ग्रेट" असं पाहिजे होतं. शेतकर्यांनी न्युईसन्स पॉवर वाढवली तर त्यांना मानाने जगू देतील लोक नाहीतर बळी तो कानपिळी.
15 Dec 2013 - 3:51 pm | अभ्या..
है शाब्बास. काय भारी सोल्यूशन.
संघटित व्हा अन न्युइसन्स वाढवा. :-(
15 Dec 2013 - 7:30 pm | पैसा
सध्या तेच चालू आहे ना सगळीकडे. ज्याच्या हातात दांडका, त्याचीच म्हैस.
15 Dec 2013 - 4:46 pm | विवेकपटाईत
मस्त कविता. अमेय साहेब बाबा राम देव ग्रामीण जनतेची आर्थिक उन्नती व्हावी या साठी प्रयत्न करीतआहेतच. आज उत्तराखंड आणि प. उत्तर प्रदेशातील शेतकरी, ग्वारपाठा, आवळा (३०,००० टन त्यांनी वापरला -सरकारी आकडा), गीलोय इत्यादी वनस्पती विकून एवढेच काय गो मूत्र विकून अतिरिक्त पैसा कमवितात आहे. गेल्या उन्हाळ्यात मी पहिल्यांदाच मी बुरांश (उत्तराखंडातील एक फुलझाडचे फुले ), खस, ब्राह्मी, बेल, आंब्याचे पण हेच शरबत (पेप्सी एवजी पाहुण्यांना पाजले). याचा ग्रामीण जनतेला सरळ फायदा मिलता. विदर्भात ही असा फूड पार्क स्थापित झाला पाहिजे.
बाकी अतिशिक्षित लोक मूर्ख असतात याचेच उदाहरण दिल्लीत दुप्पट किमतीत लो फ्लोर बसेस घेतल्या जेणे करून सायकल चालवीत अपंग व्यक्ती बस मध्ये येऊ शकेल, हे शहाण्यांनी सरकारला पटवून दिले. दिल्लीत कुठलेच बस स्थानक असे बांधलेले नाही जिथून सायकल वर बसलेला अपंग बस मध्ये दाखील होऊ शकेल. (जमिनी पासून ६ इंच उंच आणि ५० फूट लांब) तेवढ्यात पैश्यात लाख दोन लाख अपंगाना विजेवर चालणारी सायकल देता आली असती. शिवाय या बसेस मध्ये फक्त ३५ लोक बसून शकतात (साधारण बस मध्ये ४४) व लांब व वजनी असल्या मुळे दीडपट इंधन पिते. लोक गमतीने 'हाय कास्ट लो कॅपासिटी' बसेस म्हणतात)
15 Dec 2013 - 7:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाकी अतिशिक्षित लोक मूर्ख असतात याचेच उदाहरण दिल्लीत दुप्पट किमतीत लो फ्लोर बसेस घेतल्या जेणे करून सायकल चालवीत अपंग व्यक्ती बस मध्ये येऊ शकेल, हे शहाण्यांनी सरकारला पटवून दिले.
हे किंवा खड्डे न पडणारे रस्ते बनवणे हे अशिक्षित / मूर्ख नेत्यांमुळे होते असे तुम्हाला वाटते काय? अहो हे फक्त अत्यंत "चतूर" नेत्यांनाच जमते.याला "वेल मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट" म्हणतात. ह्याच मुख्य तत्वावर तर सद्याचे राजकारण चालले आहे.
15 Dec 2013 - 4:48 pm | विवेकपटाईत
मस्त कविता. अमेय साहेब बाबा राम देव ग्रामीण जनतेची आर्थिक उन्नती व्हावी या साठी प्रयत्न करीतआहेतच. आज उत्तराखंड आणि प. उत्तर प्रदेशातील शेतकरी, ग्वारपाठा, आवळा (३०,००० टन त्यांनी वापरला -सरकारी आकडा), गीलोय इत्यादी वनस्पती विकून एवढेच काय गो मूत्र विकून अतिरिक्त पैसा कमवितात आहे. गेल्या उन्हाळ्यात मी पहिल्यांदाच मी बुरांश (उत्तराखंडातील एक फुलझाडचे फुले ), खस, ब्राह्मी, बेल, आंब्याचे पण हेच शरबत (पेप्सी एवजी पाहुण्यांना पाजले). याचा ग्रामीण जनतेला सरळ फायदा मिळतो. विदर्भात ही असा फूड पार्क स्थापित झाला पाहिजे.
बाकी अतिशिक्षित लोक मूर्ख असतात याचेच उदाहरण दिल्लीत दुप्पट किमतीत लो फ्लोर बसेस घेतल्या जेणे करून सायकल चालवीत अपंग व्यक्ती बस मध्ये येऊ शकेल, हे शहाण्यांनी सरकारला पटवून दिले. दिल्लीत कुठलेच बस स्थानक असे बांधलेले नाही जिथून सायकल वर बसलेला अपंग बस मध्ये दाखील होऊ शकेल. (जमिनी पासून ६ इंच उंच आणि ५० फूट लांब) तेवढ्यात पैश्यात लाख दोन लाख अपंगाना विजेवर चालणारी सायकल देता आली असती. शिवाय या बसेस मध्ये फक्त ३५ लोक बसून शकतात (साधारण बस मध्ये ४४) व लांब व वजनी असल्या मुळे दीडपट इंधन पिते. लोक गमतीने 'हाय कास्ट लो कॅपासिटी' बसेस म्हणतात.
17 Dec 2013 - 4:37 pm | Bhagwanta Wayal
एकदम बेस्ट...!
18 Dec 2013 - 11:19 am | अर्धवटराव
नाय कळणार कोणाला. नाकातोंडात पाणि जाउन जीव गुदमरायला लागेस्तो हालचाल नाहि करणार आम्हि.
20 Dec 2013 - 12:43 am | गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.