आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक
सुरकतलेल्या चेहर्यावरी तुझाच कयास
उसवला श्वास गड्या जणू संपला प्रवास
भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं
सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं
भुकेल्या पोटाला आता मातीची ढेकळं
पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!!
आस घे भिडायाला ओठी पिरतीचे गाण
रानातल्या पिकासाठी काळजाचा ठाव
हरवलं आता भान.. अंधारलं जग
मिठीत तुझ्या विसावलं वेडं स्वप्नपान
------------- शब्दमेघ