धोतर आणी डबा २

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
12 Apr 2015 - 11:30 pm

पोटच्या खळगीसाठी मी शहरात उतरलो
शहराच्या वैभवात पार हरवुन गेलो

मॉल थिएटर हॉटेलमध्ये सकाळ सरली
अचानक पोटातुन माझ्या कळ आली

भविष्याच्या कियेची जाणीव तिथे झाली
'त्या' जागेची मागणी तत्परतेने केली

सुलभ सुविधा फारच असुलभ होती
पाय ठेवण्याचिही तिची लायकी नव्हती

मनातला आवेग बाहेर पडु लागला
उत्कटता जशी प्र्ेयसी शोधे प्र्ीयकराला

अंधारमय भविष्य माझे समोर दिसले
थकलेले घामेजलेले पाय थरथरु लागले

समोरुन एका बसला जाताना पाहिले
उरलेले बळ क्षणात गोळा केले

पकडताच बस कंडक्टने मला उतरवले
भयानक गर्दिचे कारण पुढे केले गेले

चालत जावुन शेवटी स्टॅंड गाठले
जागेसमोरील गर्दि पाहुन मन हबकले

कुलुपाची चावी त्यांच्याकडुन होती हरवलेली
माझ्यासोबत कैकांची ब्रह्मानंदी टाळी लागली

शेवटी मी कसाबसा आत 'उतरलो'
शिव्यांच्या लाखोलीसह पुन्हा बाहेर आलो

आतले जल आता अटले होते
सकाळपासुन मुहुर्तच मिळत नव्हते

अखेरीस सर्व कार्यक्रम उरकला गेला
जीव माझा समोरच्या बादलीत पडला

परतताना धोतराची पोरांनी टर उडवली
त्यांच्या हातातील 'डब्याने' खोपडीच सटकवली

प्र्ाण्यांपेक्ष्ा वाईट ही मानवाची अवस्था
मनास घाव देई ही शहरव्यवस्था

काहीच्या काही कविताहास्यबिभत्सकरुणअद्भुतरसरौद्ररसरेखाटन