जीवनमान

तिथली दिवाळी.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
9 Nov 2015 - 7:18 pm

तिथली दिवाळी.....

तीरकामठा रंगीत कागद
चिखलमाती अर्धा किल्ला....
शिवाजीच्या मावळ्यांहाती,
परत फराळ ठेवशील का?

पहाट झोपेत हळूच उठवून
घमघमणारी आंघोळ घालून,
फुलबाजांची हजार फुले
परत हातात ठेवशील का?

रांगोळीतील हुकले ठिपके
रेषांमधील नाजूक वळणे,
तुळशीमाईचे लगीन लटके
परत दणक्यात लावशील का?

किणकिण बांगड्या काचेच्या
घिरघीर झालरी पोरींच्या!
सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या
परत उडवण्या येशील का?

कविता माझीभावकविताविराणीसांत्वनाकरुणसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमानदेशांतर

मागे उभा मंगेश ....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
8 Nov 2015 - 10:21 pm

प्रेरणा सांगायला हवीच आहे का?

ढुस्क्लेमर : ही एका नाक्यावरच्या वासूची व्यथा आहे , तेव्हा कपया मीटर, वृत्त, यमक, चाल शोधु नये. (पैसा)तायडे, सॉरी... :P

मागे उभा मंगेश, पुढे उभा सर्वेश
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !

ओढणी ती माथ्यावरी
'स्टोल' मुखा कव्हर करी
मोबाइल रुळे उरी
'भाऊ' तीज सर्वांगास रक्षु पाहे
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !

जन्मजन्मांचा मी वासू
इथे कधी तिथे बसू
प्रेमी, म्हणावे की कामी?
नाक्यावरी येताजाता रोखुनी पाहे
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !

इरसाल म्हमईकर

vidambanहास्यप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीभूगोलराजकारणशिक्षण

मनाच्या आकाशवाणी केंद्रावरून !

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
6 Nov 2015 - 3:48 pm

मध्यमध्वनीलहरी ४२० कि.ह.
आम्ही मनाच्या आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत.
सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनिटे आणि तीन सेकंद झालेत.
आमच्या आज प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा...
सकाळच्या सभेत सुरुवातीला ऐकू या ‘भक्तीवंदना’!
यात ज्याच्यात्याच्या मनाचे श्लोक सादर होतील!
त्यानंतर ‘मनाची शेती’ कार्यक्रमात,
‘मनातल्या गाजर गवताला आळा कसा घालावा?’
याविषयी मार्गदर्शन केले जाईल.
दिवसभराच्या जगण्याच्या झेंगटाचा आढावा घेतला जाईल,
‘हवामनाचा अंदाज’ मध्ये!
विविध वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणाऱ्या

अनर्थशास्त्रकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कवितामांडणीवावरसंस्कृतीकलामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रमौजमजा

असचं काहीतरी

बाजीगर's picture
बाजीगर in जनातलं, मनातलं
3 Nov 2015 - 11:19 am

पप्पूने इन्फ़िल्ड ला किक मारली ,नारायण पेठेतली एवढीशी गल्ली,इफील्डचे इंजिन रोंरावू लागले 
मग फिल्मी स्टाईल ने पाय फिरवून पप्पू गाडीवर बसला, नेहमीप्रमाणे आपली सर्व समावेशक नजर अवतीभवती टाकली  रजनीकांत सारखा गोगल डोळ्यासमोर धरून त्यातल्या प्रतीबिम्बातून पाठीमागे काय चाललाय ते पाहिले, मग सर्र कन फिरवून डोळ्यावर चढवला, दारातून आत नजर  फेकली तर आजी काहीतरी बडबड करत धडपडत येतांना दिसली . 

जीवनमानप्रकटनविचार

कोवळ्या वयातलं व्यसन

जातवेद's picture
जातवेद in जनातलं, मनातलं
1 Nov 2015 - 4:25 pm

आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती?

जीवनमानशिक्षणविचारअनुभवमत

एक पिल्लू: तिचं आणि आमचं....

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
1 Nov 2015 - 1:52 am

परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता....

धोरणसंस्कृतीधर्मसमाजजीवनमानतंत्रप्रकटनलेखचौकशी

राष्ट्रीय पुरस्कार आणि आम्ही

nasatiuthathev's picture
nasatiuthathev in जनातलं, मनातलं
31 Oct 2015 - 9:19 pm

शीर्षक पाहून धागा जरी राजकारणाशी संबधित वाटत असला तरी तो नाही
---------------------------------------------------------------------------------------------------------
काल ख्वाडा पाहिला , प्रदर्शनापूर्वीच काही चित्रपटांना खूप पुरस्कार मिळतात त्या पैकीच हा १ चित्रपट. तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्याचा सपाटाच लावलाय , माफ करा मी अजूनही राष्ट्रीय पुरस्काराचा विचार करतोय .. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलाय .

वावरजीवनमानप्रकटनविचार

काउंट डाउन...

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
28 Oct 2015 - 12:11 am

आपण क्षणा क्षणाला बदलत असतो. आपल्या गरजा बदलत असतात. आपण त्या वाढवत असतो. खाली यावं लागल याचा विचार हि न करता वरचढ़ होत असतो. वेळेसोबत आपली सहनशीलता कमी होते. वाढत असते ते परावलंबन आणि सीमा ओलांडून उपभोग घेण्याची सवय. सुरु असते उधळपट्टी, नासाड़ी. दहा जणांच्या गरजा भागवल असे एकटाच गिळु पाहतो. गिळतो. आणि मग निसर्ग ही थकतो, आपले लाड पुरवुन-पुरवून. त्याचा कल ढासळतो. तो बिथरतो. आपण ही बिथरतो पण आपण तुटतो. अगदी पार आतून बाहेरून तुटतो. आपल्या हाती काहीच नसते. त्याच्या बिथरण्यात सगळं चराचर नष्ट करण्याचे सामर्थ्य असते.

जीवनमान

स्थापत्य- एक कला भाग २

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
27 Oct 2015 - 7:25 pm

पहिला भाग लिहील्यानंतर बर्‍याच लोकांनी अकॅडेमिक नको म्हणून सांगितलं. तरीही काही मूलभूत संकल्पना ठाऊक असणं आवश्यक आहे असं म्हणून अट्टहास करतोय. मात्र जोकरच्या झोपडपट्टी लेखातला १२०० स्क्वेफु चा मुद्दा (कुणी तरी इथं लिंक अपडेट करावी अशी विनंती) ऐरणीवर आल्यानंतर तदनुषंगिक मुद्दे आणि संकल्पना मांडावेत असं वाटलं म्हणून ते लिहीत आहे. थोडं विस्कळीत होतंय पण पुन्हा गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न होईल. किंवा कदाचित .... बघू ओ पुढचं पुढं!

--------------

मांडणीवावरजीवनमानतंत्रराहणीराहती जागाअनुभवमाहितीसंदर्भ