"पण ते राहतात कुठे?"मी आजीना विचारले. "चला माज्यासंगाती,मी दाखवतंय.मी त्याचो डब्बोच घेवन
ललंय."आम्ही आजींच्या मागून निघालो.
(क्रमशः)
*********************************************************************************
आजी चालता चालताही बोलत होत्या.मध्येच थांबल्या.चपापून म्हणाल्या,” तुमी कुटून आलात?कोण त्यांचे?”
मी सांगितले,”नाही.कोणी नाही. मी पण कामासाठी आलेय.”
”बरा तर.”असे म्हणून पुढच्याच घराकडे बोट दाखवून म्हणाल्या,”आलाच घर.” त्या सरळ आत गेल्या.
मयुने हाक मारली,”,चाफेरकर,ओ चाफेरकर.”
आतून आवाज आला,”कोण आहे रे?”
मययूने सांगितले,”.मी मयू पाटील.मिऱ्यावरनं आलोय.लवकर बाहेर या.मी वजन घेऊन आलोय ताईने दिलेलं."
आतून अधीर आवाज आला.”आलो,आलो.
मला हसू आवरेना.एवढ्यात आजी बाहेर आल्या.मी सांगितलं,”वेळ असला तर थांबा गडग्याबाहेर.मी आलेच.”
इतक्यात चाफेरकर टॅावेल गुंडाळून बाहेर आले.मला पाहताच वरमून “आलोच” असे पुटपुटत आत गेले.माझ्या हसणयाचा स्फोट झाला.मयूही मोठ्याने हसू लागला.आता चाफेरकर महाशय घाईघाईने कपडे चढवून बाहेर आले.मयुला म्हणाले,’काय पाटील,मला सांगायचं ना,की,मॅडम आल्यात तुमच्याबरोबर म्हणून.” हसू आवारत मी म्हटलं की,”तुम्ही असेच भेटता का घरी आलेल्यांना ?”
चाफेरकरची अवस्था ,’सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी झालेली.
कसनुसं हसत त्याने विचारले,”काय काम होतं मॅडम?ते सातबाराच्या उताऱ्याचंच ना?तो तयार आहे तुमचा .ऑफिसात आला असतात तरी चाललं असतं.”आता माझे हसणे संपले.”.हो,पण तुम्हाला वजन पाहिजे ना?तसाच निरोप तुम्ही दिला होतात ना भावाकडे?त्यासाठी मी इथे आलेय.तुम्हाला वजन उचलायचा त्रास नको उगाच.”
आता चाफेरकर गडबडला. आवाजही नरमला.”नाही,नाही,मॅडम.त्यांनी काहीतरी चुकीचं ऐकलं बहुतेक.” मयूच पारा चढलेलाच होता” .ए भडव्या, कानफाट फोडून टाकीन हां आता.”उंचापुरा ,दणकट बांध्याचा मयू त्याच्या अंगावर धावला”.मयू,थांब.”मी पुन्हा मयूला थांबवले.”नाही हो ,मॅडम.मी खरंच सांगतो.मी जरा गमतीने काय बोललो असलो तर सायबांचा गैरसमज झाला असेल.”थोडया वेळापूर्वी ‘पाटील’अशी हाक मारली होती,आणि आता लगेच ‘साहेब?’ सरडा पण इतक्या घाईने रंग बदलत नाही.”
"ओ.के. तुम्ही म्हणता तसं झालं असेल कदाचित! पण मी तुम्हाला वजन द्यायला आले आहे आणि ते तुम्हाला घेतलंच पाहिजे हां.”असे म्हणत मी पर्स उघडली.आता चाफेरकारचा चेहरा परत खुलला
आजी पण आत डोकाऊन पाहायला लागली होतीएव्हाना.दोनचार रिकामटेकडेपण जमा झाले होते.चाफेरकर म्हणतो कसा?”आत या ना मॅडम."
“कशाला,इथेच देते ना तुम्हाला.”पर्समधून लिफाफा काढून त्याच्या हातात ठेवला.मोठया संतुष्टीने तो लिफाफा त्याने खिशात टेवला तोच मी म्हटले,”अहो,उघडून तरी बघा,त्यात काय आहे ते!."
‘हँ,हॅ,हॅ’, करीत माठयाने तो लिफाफा उघडायला सुरुवात केली.वर अक्कल पाजळीत निर्धास्तपणे बोलला,”मी म्हटलंच होतं सायबांना,की,मॅडम बरोबर समजतील म्हणून."
लिफाफ्यात दोन कागद होते.वर होता शासन निर्णय आणि खाली होता एक अर्ज.”हे काय आहे?”पडेल आवाजात चाफेरकर. “अरे,तू शिकला नाहीस का वाचायला?”,मयू फणफणला. मी पण ढुशी दिली”.हं, वाचा लवकर.मग मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत."
चाफेरकरची नजर त्या शा.नि.वरून फिरू लागली.पुढचा कागद न्हाणजे माझा अर्ज वाचताच तो फाफलला.तो अर्ज जिल्हाधिकारी,रत्नागिरी यांना लिहिलेला असून त्याची प्रत चाफेरकरला अग्रेषित(मार्क) केलेली होती. अर्जातील मजकूर थोडक्यात असा होता असा होता.’सदर शा.नि.प्रमाणे मला दो महिन्यांचे सात बारा घरपोच मिळावयास हवे होते ते न मिळाल्यामुळे मी इतरांकडे चौकशी केली असता कोणालाही असे सात बारा घरपोच तर सोडाच पण प्रत्यक्ष गेले तरी लगेच मिळत नाहीत. शिवाय गावकऱ्याच्या भाषेत काहीतरी नैवेद्य मिळाल्याशिवाय (तलाठी यांच्या भाषेत वजन तठेवल्याशिवाय) मिळत नाहित.तरी सर्व गावकऱ्यांचया वतीने मी आपणास विनंती करीत आहे की ,सदर प्रकरणात लक्ष घालून श्री.चाफेरकर याच्यावर करणे दाखव नोटीस बजावण्याची कारवाई त्त्वरित करण्यात यावी’यासाठी लागतील ते साक्षीदार हजर करण्यात येतील.’
यात मखलाशी अशी होती की,अजून जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज द्यावयाचा होता,पण चाफेरकरला ते माहीत नसल्याने तो अगदीच गडबडला.मी आधीपण कागदपत्र वरून पाठवल्यामुळे तो गंडला.
त्यावेळी मोबाईल फोनचे प्रस्थ नव्हते.अजून ऑफिसेस सुरु व्हायला वेळ होता.ज्या घरात तो भाड्याने रहात होता तिथेही फोन नव्हता.जत्रा अजून वाढलली होती गडग्याबाहेर.
चाफेरकर आत जाऊन खुर्ची घेऊन आला.”मॅडम,बसा तरी.”मी बसले.”अहो ,पण तुमचा उतारा तयार आहे.”’कधी पासून?’इति मी.”तुम्ही येऊन गेलात त्याच्या दुसरयाच दिवशी.”माझा इथला आणि मुंबईचा दोन्ही पत्ते तुमच्याकडे आहेत.तुम्ही का पाठवला नाही पोस्टाने या शा.नि.प्रमाणे. शिवाय माझा भाऊ तुमच्याकडे खास तो उतारा नेण्यासाठी आला असताना तुम्ही तो न देता जी मुक्ताफळे उधळीत ती तुम्ही आताच कबूल केली आहेत त्याला हे इथे हजर असलेले साक्षीदार आहेत.काय बरोबर आहे न मंडळी.?”.शेवटचा प्रश्न गडग्याबाहेर उभ्या असलेल्या प्रेक्षकांसाठी होता.सामील होण्यासाठी तयारच असलेल मडळी होकार देत आत प्रवेश करती झाली."
"अरे,अरे,इथे काय आहे तुमचे?चला, निघा.”चापेरकर चरफडला.मी मिस्किलपणे बोलले”.अहो,तुम्ही त्यांच्या गावात राहताय.त्यांनाच काय हाकलताय.”चाफेरकरची गोची झालेली.गावकरी पडत्या फळाची आज्ञा घेऊन अजून आत सरकले.
“मी तुम्हाला आताच्या आत्ता तो उतारा देतो. चला ऑफिसमध्ये.”ही नसती पीडा जाऊंदे एकदाची या भावनेने चाफेरकर.”तुम्ही आताच शा, नि, वाचलात ना?दर महिन्याला वेगळा सातबारा लिहिला पाहिजे.त्यामुळे तो सातबाराचा उतारा चालणार नाही.तुम्हाला नवा बनवावा लागेल.”माझा फटका.”हो,हो,मॅडम. बनवतो ना.पण तुम्ही ऑफिसात चला.” त्याला चांगली शिक्षा करण्याचे माझ्या मनात होतेच,पण आता झाली इतकी शोभा पुरेशी आहे आहे असे वाटून मी त्याच्याबरोबर कार्यालयात आले.सगळी वरातही पाठोपाठ.आजी सगळ्यात पुढे.
चाफेरकर घाईघाईने कार्यालय उघडून आत गेला.अजून शिपाई वगैरे न आल्याने स्वतः:च टेबल खुर्चीवर फडका मारून मला आत बोलावू लागला.तिथेच बाहेरच्या रस्त्यावर बस थांबा.तिथले लोकही काय चाललेय याचा अदमास घेऊ लागले.
मधल्या वेळात मी विचारले की इथे सरपंच कोण आहे.मयू म्हणाला,” अग ताई,ती आपल्या मिरयावरचीच आहे मयरांची (मयेकारांची) सुरेखा.यंदा महिला सरपंच म्हणून ती निवडून आली आहे. हा काय तिला दाद देणार.?
"कोणाबरोबर निरोप पाठवून तिला बोलावून घे.” मी मयूला हळूच सांगितले.इत क्यात गोंधळाची बातमी तिच्यापर्यंत पोचलीच होती.ती घाईघाईने आलीच”.मयू कोण रे?””अग ,मुंबईची ताई.”विशितली सुरेखा माझ्या गळ्यात पडली.”ताई, घरी चल.या मेल्याने तुलापण नाय ना सोडलंन.रे, आता बघ तुझी कशी चंपी करते ती बिनतेलाने".
एव्हाना जमावाचा राग पाहून मीही आवरते घ्यायचे ठरवले.”तुमच्यापैकी किती लोक कलेक्टर कचेरीत येऊन साक्ष द्यायाला तयार आहेत?.” कसलीही चौकशी न करता दहाबारा हात वर झाले.”ठीक आहे. सुरेखा यांना पाहून ठेव .तू ओळखतेस ना यांना.साक्षीच्या दिवशी मी तुला फोन करेन.तेव्हा तू या सगळ्यांना घेऊन ये.आता तुमचे काही काम नाही.तेव्हा तुम्ही घरी जा.”माझे काम झाले की मी निघतेच आहे.”
हळू हळू जमाव पांगला..आजी मात्र गेली नाही.
माझे स्वतः:चे नाव असलेला तो सात बाराचा उतारा मी घेतला.मी शेतकरी झाले होते आजपासून.
”काय चाफेरकर? कसं वाटलं वजन?”मयूने हसत हसत चिमटा घेतला
"अहो,मॅडम,मी तुमच्या पाया पडतो. प्लीऽऽऽज, ती तक्रार मागे घ्या मी तुमचा सातबारा दर महिन्याला पोस्टाने पाठवीन.” “तो तर तुम्हाला पाठवायलाच पाहिजे, पण आता मी गावकऱ्यांचा विश्वासघात नाही करू शकत.मलापण याच गावात रहायचंय.तेव्हा आता तरी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही.चला,मी निघते.
दरवाज्यातून वळून पहिले तर हताश झालेला चाफेरकर डोक्याला हात लावून बसला होता. म्हटलं,अजून एक दणका देऊया.मी परत आजीला घेयून आत.”आणि हो एक सांगायचा राहिलंच. उद्यापासून आजी तुम्हाला डबा देणार नाही.आणि तिचापण सातबारा माझ्या पत्त्यावरच मला मिळाला पाहिजे.” आजी खूष.” आजी,तुम्हाला पण काय सांगायचं असेल तर ह्यांना सांगा ." आजी अजून खूष.”.माझ्या नातवाच्या तोंडात्सून काढून ह्येच्या मढयार घाली व्हतय आणि मेलो माज भीती घाली.नमकहराम मेलो."
आता चाफेरकरकडे पाहवत नव्हते.पण त्याची दया न येऊ देता मी बाहेर पडले.पुन्हा चाफेरकरने मयूला हक मारली.”ओ पाटीलसाहेब,तुम्हीतरी कायतरी सांगा न तुमच्या ताईला.” “ए ताईला काय बोलतोस?ताईना बोल.”मयूने वाजवला. “हो.हो. तुमच्या ताई ना” घाकुतीला येत चाफेरकर बोलला अरे,तुला वजन हवं होतं न तुला घे आता डोक्यावर नि छातीवर वजनच वजन.”मयूच्या बोलण्यावर आजीही खदाखदा हसली.माझ्या डोळयांयाच्या कडा पाणावल्या होत्या.
“ताई ,घरी येतेयस न?मी नाय हां जेवल्याशिवाय सोडणार.”सुरेखा म्हणाली.”अग मी येतेच आहे.मला तुझ्याशी बोलायचंय पुढे या प्रकणात कय करायचं त्याबद्दल.आणि तोपर्यंत जेवणाची वेळ होईलच,तर मी आणि मयू तुझ्याकडे जेवल्याशिवाय काही जाणार नाही.”
"आज्ये,चल गो तूपन.आज तू पण जेव चल."आजी हसली,'गो आज मजा प्वाट भररला हाय. माका नुको तुजा ज्येवान.माज आज देवीन दर्शन दिल्यान.माका आज काय्येक नुको."मी आजीचा हात धरला आणि सुरेखाच्या घराकडे चालू लागले.डोळयांना वाट दिसत नव्हती.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
15 May 2015 - 4:51 pm | एस
क्या बात है!
15 May 2015 - 4:55 pm | सूड
वाह!! पुभाप्र..
15 May 2015 - 5:07 pm | पिलीयन रायडर
वाह!!!!
15 May 2015 - 5:10 pm | यशोधरा
है शाब्बास!
15 May 2015 - 5:11 pm | भुमन्यु
मस्त ... क्रमशः वाचुन बरं वाटलं!
15 May 2015 - 5:13 pm | अदि
काय झकास धडा शिकवला त्याला.. मज्जा आली वाचून..पुभाप्र
15 May 2015 - 5:28 pm | अनन्न्या
अगदी चांगला धडा शिकवलात.
15 May 2015 - 5:32 pm | टवाळ कार्टा
भारी :)
15 May 2015 - 5:46 pm | बॅटमॅन
वा, सहीच!
15 May 2015 - 5:56 pm | स्वाती२
है शाब्बास!
15 May 2015 - 6:03 pm | श्रीरंग_जोशी
कल्पक अन परिणामकारक उपाययोजना केली ताई तुम्ही.
अगोदरचा भाग वाचून संताप वाटला होता. परिस्थितीने गांजलेल्या लोकांना त्यांचे कसलेही सरकारी काम नसताना वर्षानुवर्षे पिडताना मनाचीही नाही तर जनाचीही वाटत नाही अशा नीच माणसांना.
15 May 2015 - 6:05 pm | पगला गजोधर
:)
15 May 2015 - 6:12 pm | आदूबाळ
जबरदस्त! नेहेमी लिहीत रहा!
15 May 2015 - 6:16 pm | रेवती
ग्रेट!
15 May 2015 - 6:17 pm | मोहनराव
झकास!!
15 May 2015 - 6:20 pm | द-बाहुबली
गोष्ट आहे होय. मला वाटत होते सत्यकथा, अर्थात वास्तवादी रेफरन्स दिसत आहेतच. छान.
15 May 2015 - 7:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
उ त्त म काम केलं. असल्या माजोरी भडव्यांना अशीचं अद्दल घडायला पाहिजे.
15 May 2015 - 7:03 pm | स्रुजा
क्या बात !!
15 May 2015 - 7:09 pm | नूतन सावंत
आदि ,अनन्या हा धडा अर्धाच आहे.
बॉमकेस बक्षी ,ही कल्पित गोष्ट नसून सत्यघटना आहे.जशी घडली तशी मांडली आहे.पात्रेसुद्धा माझ्यासकट खरी आहेत.
स्वॅप्स,सूड,पिरा आदि,यशो,भूमन्यू,अनन्य,टका ,बॅटमॅन,स्वाती२,श्रीरंग जोशी ,आदुबळ,पगला गाजोधर,रेवाक्का,मोहनराव,बॉमकेस बक्षी सर्वाना धन्यवाद.
15 May 2015 - 10:53 pm | द-बाहुबली
अतिशय नाट्यमय प्रसंग होता म्हणुन मला तर कथाच वाटु लागली होती. जबरा.
15 May 2015 - 7:25 pm | चुकलामाकला
सही!
15 May 2015 - 7:39 pm | रामपुरी
क्रमशः वाचून बरं वाटलं. असल्या लोकांना एवढ्या स्वस्तात सोडता कामा नये.
15 May 2015 - 8:18 pm | रुस्तम
पु भा प्र....
15 May 2015 - 10:37 pm | नीलमोहर
एकदम फिल्मी स्टाइल धडा शिकवलात
15 May 2015 - 10:58 pm | रुपी
शेवटचा आजीबरोबरचा संवाद खूपच भावपूर्ण आहे..
16 May 2015 - 10:15 am | नाखु
उतारा वाचताना अक्षरे अंधुक झाली मला डोळ्यात पाणी आणलं, त्या आज्जीचे आशीर्वाद आयुश्यभर पुरतील हे नक्की.
हळवा नाखु
16 May 2015 - 6:23 pm | अजया
ज्जे बात सुरंगी ताई.आज सगळे भाग एकत्र वाचुन काढले!
16 May 2015 - 6:42 pm | विवेकपटाईत
वाचून मजा आली.
17 May 2015 - 7:53 am | शिव कन्या
उत्तम.
17 May 2015 - 3:35 pm | नूतन सावंत
सत्य हे कल्पिताहुन अद्भुत असते हेच खरे.
कॅ जॅ स्पॅ.,सृजा, चुकला माकला रामपुरी,निलापी,नीलमोहर,रुपी,नादखुळा,अजय,विवेक पटाइत,तर्री ताई आभार.
17 May 2015 - 3:35 pm | नूतन सावंत
सत्य हे कल्पिताहुन अद्भुत असते हेच खरे.
कॅ जॅ स्पॅ.,सृजा, चुकला माकला रामपुरी,निलापी,नीलमोहर,रुपी,नादखुळा,अजय,विवेक पटाइत,तर्री ताई आभार.
17 May 2015 - 3:35 pm | नूतन सावंत
सत्य हे कल्पिताहुन अद्भुत असते हेच खरे.
कॅ जॅ स्पॅ.,सृजा, चुकला माकला रामपुरी,निलापी,नीलमोहर,रुपी,नादखुळा,अजय,विवेक पटाइत,तर्री ताई आभार.
17 May 2015 - 9:05 pm | सानिकास्वप्निल
सहीच!!
18 May 2015 - 1:06 am | जुइ
तिन्हीं भाग वाचले.
19 May 2015 - 11:01 am | कविता१९७८
मस्त सुरंगीताई , अगदी चांगला धडा शिकवलास गं त्यांना
19 May 2015 - 12:19 pm | पैसा
चांगला धडा शिकवलात! फक्त तपशीलात एक बारीक चूक गालबोट म्हणून काढते! ;) "मैर" हा शब्द मुसलमानांसाठी वापरतात.
19 May 2015 - 12:22 pm | गणेशा
सुरंगी ताई.. जिंदाबाद.....
आजच तिन्ही भाग वाचले....
19 May 2015 - 3:54 pm | स्पंदना
सुरंगी ताई त्या +×÷+++_+×÷ ला आतापर्यंत गिळालेल्या डब्याचा खर्च द्यायला लाव!
बरा हाणालास!
19 May 2015 - 3:57 pm | नूतन सावंत
पैसाताई,तू म्हुतेस ते बरोबळ असेल पण मयेकर या नावासाठी मयर असे संक्षेपणे म्हटले जाते.मयेकरांच्या वाडीत च्य ऐवजी मयरांच्यावाडीत;मयेकरांकडे ऐवजी मयरांकडे असे सरसकट म्हटले जाते.मैर नाही म्हणत.म आणि य वेगवेगळा वापरतात.यवर जोर असतो.
19 May 2015 - 3:58 pm | नूतन सावंत
म्हणतेस असे वाच.
19 May 2015 - 4:08 pm | सनईचौघडा
मला किंवा सगळ्यांनाच या शा.नि.प्रमाणे पाठवण्याच्या नोटीशीचा उपयोग होईल असे वाटते,
तेव्हा ती नोटीस कुठुन मिळवायची ते सांगा. नाही म्हणजे ज्यांची जमिन गावाकडे आणि जी मंडळी मुंबई / पुण्याकडे राहतात त्यांना त्यांच्या पत्यावर ७/१२ उतारा मागवायला ती नक्कीच उपयोगी पडेल.
20 May 2015 - 6:45 pm | नूतन सावंत
सरकार बदलल्यावर तो शा.नि.रद्द झाला.आता पुन्हा युती सरकारने काढला असल्यास माहिती नाही नेटवर पहा.असला तर मिळेल.आता मीही ती जागा विकल्याने माझ्याकडे ती प्रत नाही आणि नंबरहि नाही.आणि आता या मुद्द्यार नोटीस काढता येत नाही.त्या अर्जात मी करणे दाखवाच्या नोटीस बद्दल लिहिले आहे तो मी जिल्हाधिकारी यांना उद्देशून लिहिला होता.पण तो देण्याची वेळ आली नाही.
20 May 2015 - 6:47 pm | नूतन सावंत
आणि म्हणून या मुद्द्यावर नोटीस काढता येत नाही असे वाचावे.
22 May 2015 - 2:55 pm | रुस्तम
ताई पुभालटा पुभाप्र
25 Dec 2015 - 8:23 pm | शाम भागवत
काही नवे करावे म्हणून.-भाग ४