.
.
- काही नवे करावे म्हणून - भाग १
- काही नवे करावे म्हणून - भाग २
- काही नवे करावे म्हणून - भाग ३
- काही नवे करावे म्हणून - भाग ४
- काही नवे करावे म्हणून - भाग ५
- काही नवे करावे म्हणून – भाग ६
- काही नवे करावे म्हणून - भाग ७
- काही नवे करावे म्हणून - भाग ८
- काही नवे करावे म्हणून - भाग ९
- काही नवे करावे म्हणून - भाग १०
- काही नवे करावे म्हणून - भाग ११
- काही नवे करावे म्हणून - भाग १२
< /ul>
पुन्हा शेवंतीच्या मदतीने बाकीचे समान आणले.एका मेधीच्य खिळ्याला गुंडाळी सोडवून फळा टांगला.ज्यांनी हात वर केले होते, त्यांना एका बाजूला बसवून त्यांना पाट्या आणि पेन्सिली दिल्या. एका वहीत त्यांची नावे घातली. हजेरी घेतली आणि माझ्या हातात खडू देऊन ती म्हणाली,”कर उद्घाटन.”
मी फळ्यावर “श्री” काढला.तो अचानक दिसेनासाच झाला.
(क्रमश:)
सरस्वतीच बोलली होती माझ्या तोंडून त्याशिवाय इतक्या त्तांतडीने या गोष्टी घडूच शकत नाहीत.शिक्षणाला देवाचे अधिष्ठान लागतेच.सगळ्याचे हात धरून श्री कसा काढायचा हे दाखवून आता तो गिरवायचा हे सांगून सुरेखा माझ्याकडे आली.
“हं,आता सांग पुढे काय करू ते?”तिने विचारले.
“सध्या त्या जी अक्षरे शिकतील त्याची उजळणी कर दररोज.इथे येऊन फळ्यावर लिहायला सांग.बरोबर लिहिलं तर कौतुक करायला विसरू नकोस.आणि अंकलिप्या इतक्यात देऊ नकोस. सर्वात महत्वाचं पुढचं पाठ नि मागचं सपाट असे होऊ देऊ नकोस.”
दहा-पंधरा मिनिटांतच विद्यार्थिनीचे हात दुखू लागले.गिरवण्याचा वेग मंदावला."काय ग, तुम्ही रानात जाता,कवळ तोडता,गवताचे भरे आंत तेव्हा अंग दुखतं की नाही?”सगळ्यांनी होकार भरला.
मग दुसरी दिवशीही गरज असेल तर जाता कि नाही?की अंग दुखतंय म्हणून घरी बसता?”
'“नाय बा! जावा त लागतेच नि नाय गेला तर अंग दुखायचा ऱ्हात नाय.जावाच लागताय.”शेवंती म्हणाली.
“तसंच आहे हे पण. आज बोटं दुखतील पण उद्यापण लिहाल तेव्हा सवय होईल.”मी सांगितलं.
”आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा.सुरेखाला कामधंदा नाही म्हणून ती हे काम करत नाहीय.हे तुमच्या चांगल्यासाठी आहे हे लक्षात घ्या.आणि हा वर्ग रोज चालू ठेवा. चला आज सुट्टी.उद्य्पासून मात्र शाळा वेळेवर आणि पूर्णवेळ असेल बरं का!’’मी शाळा सोडून दिली.
इतक्यात सुरेखाचे यजमान ,मयू आणि नवरा आला.थोडा वेळ थांबून आम्ही निघालोच.
चौथ्या शनिवारला जोडून एक सुट्टी आली.आता बागेत जाण्याचे वेध लागायचे.म्हणून आम्ही दोघे शुक्रवारी रात्रीच्या गाडीने रत्नागिरी गाठले.मयूच्या सोबतीने बागेत पोचलो.पाहतो तर काय?बागेत गुरे घुसलेली.मयू आणि नवरा निगडीच्या काठया घेऊन त्यांना हुसकावू लागले.सगळीकडून बंद बागेत ही गुरे कुठून घुसली?गुरे आल्या वाटेनेच पळत होती आणि एका बाजूने बांध फोडलेला दिसला.सगळी गुरे बाहेर काढून पुन्हा दगड रचून बांध घालून ठेवला.ती वाट भाईच्या घराकडून येणारी होती.पण गुरेही त्याचीच असतील का?हे नक्की नव्हते.
एव्हाना गुरे उधळली होती त्या पठारावर.मयू संतापला होता.”नवी पालवी जर गुरांनी खाल्ली तर मोहर कसा येणार?”
“चला आता ,कोळंबा वाटेने बाहेर पडू.गावात कोणाला माहित नाही आपण आलेले.उद्या परत येऊ.”म्हणत
मी त्याची समजूत घातली.,”बघ, गुरांना कोणीतरी बांध फोडून दिल्याशिवाय ती आली नाहीत.आपण कोणावर आळ घेणार?उद्या येऊन पाहू काय ते.?”
कोळंबा वाटेने फणसोप पावस रस्त्यापर्यंत मस्त फेरफटका झाला.सगळीकडे हिरवेगार, मध्ये मध्ये झुळझुळणारे व्हाळ,अगणित रानफुले,पिवळी,जांभळी,लाल,गुलाबी छटा तर अनंत.निसर्ग आपल्या अनंत सुंदर रूपांनी आमच्याकडे पाहत होता.त्यालाही आम्ही नवीनच होतो.मगाचच्या मनस्तापाचा मागमूसही उरला नव्हता.तो दिवस असाच मजेत घालवून आम्ही परत आलो.संध्याकाळही मागच्याच बाजूला समुद्र असल्याने आजूबाजूच्या शेजाऱ्यांशी गप्पागोष्टी करत मजेत गेली.
दुसऱ्या दिवशी बागेत जाताना पातेरे मामी वाटेतच घाईघाईने येताना दिसल्या. त्या म्हणाल्या” बरा झाला तुमीच आलाव.मी आताच आमची गुरां सोडून आला.बागेत गुरां हायत.ह्यान्ला सांगायलाच येत होतो.”
“कोणाची आहेत.?’’असे विचारल्यावर त्यांनी भाईच्या घराकडे बोट दाखवले.
“ठीक आहे .तुम्ही मामांना घेऊन या आणि येताना सुरेखाकडे लांब दोरी असेल तर घेऊन या.”असे सांगून आम्ही बागेत पोचलो.आधी फोडलेला बांध रचला.आता गुरे बाहेर पडू शकणार नव्हती.इतक्यात पातेरे मामा,मामी,सुरेखाचे यजमान, सोबत एक गडी घेऊन आले.सगळ्याच्या मदतीने गुरांची दावण बांधली.एकूण चौदा गुरे होती.
पुन्हा रचलेले दगड काढून गुरे बाहेर काढली.पातेरेमामांना पक्का बांध घालण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.मामी त्यांच्या मदतीला थांबल्या.आम्ही त्याच वाटेने खाली उतरलो.ही वाट भाईच्या घरावरून मुख्य रस्त्याला मिळाली होती.
मयूच्या हातात त्या दावणीचा कासरा आणि मागे सुरेखाकडचा गडी गुरांना हाकतोय.. त्यामागे आम्ही तिघे.अशी वरात भाईच्या घरावरून जाऊ लागली.इतक्यात तो बाहेर आलाच.”अहो पाटील,आमची गुरं घेऊन कुठे निघालात?”
“ही तुझी गुरं आहेत?”मयू फुत्कारला.”मी कोंडवाड्यात घेऊन चाललोय.आमच्या बागेत धुडगूस घालत होती.”
“अहो,गुरं ती.वाट मिळेल तिथे चरणार,त्यांना काय कळतेय तुमची बाग आहे ती?”तो निलाजरेपणे दात दाखवीत बोलला.”कुठूनतरी वाट मिळाली असेल त्यांना.”
मयू संतापलेला होताच.”अरे बैला,त्यांना ती वाट तूच दाखवलीस.इतकंच नाही तर बांध पण फोडलास.”
“अहो,काय बोलताय काय? माझी गुरं काही मी चरायला नाही घेऊन जात .गडी आहेत माझ्याकडे ”तो हडबडून बोलला.
आता मी पुढे सरसावत म्हटलं ,”कुठल्या गड्याने सोडलीत गुरं?बोलवा त्याला.”
आता भाईचा नाईलाज झाला.”अरे,तो गण्या कुठेय?बोलवा त्याला.”एव्हाना गावात खबर पोचलेली.माणसेही जमू लागलेली.एकजण अंगणात आला.त्याला पाहून भाई म्हणतो कसा?”जारे त्या पाटलांच्या हातातला कासरा घे जा .कुठेतरी गुरं सोडता.त्यांना किती त्रास झाला असेल?”
मयूच्या हातातला कसारा नवऱ्याने घेतला आणि पुढे आलेल्या गण्याचा हात मयूने धरला.मी म्हटलं.”का रे गण्या?बांध फोडून गुरं घातलीस बागेत?कधीपासून घाल्तोयास?’’
गण्या गुळमुळत बोलला,”नाय बा,काल नि आजच.”
“ठीक आहे,म्हजे दोन दिवस तू गुरं बांध फोडून बागेत घातलीस.होय ना?”या माझ्या प्रश्नाला त्याने होकारार्थी मन हलवली.
“चला तर,गुरं कोंडवाड्यात आणि तू तुरुंगात.”असे म्हटल्याबरोबर गण्या कळवळला.”मी काय केलंय?मी हुकमाचो ताबेदार.भाईनी सांगितला ता मी केलंय.”
आता भाईलाही कंठ फुटला.”अरे मेल्या.मी कदी तुज काय सांगलंय?माजा नाव घेतंस ता?”पण तुरुंगाचे नाव ऐकून हडबडलेला गण्या कुठला गप्प बसायला?”अवो भाई, तुमी काल माज सांगल्यात ,ह्या वाटेन वर जा नि गड्गो फोडून गुरा घाल आत.”
भाईकडे लक्ष न देता मी त्याला म्हटलं.”पोलिसांना सांग आता हे,तुला अडकायचं नसलं तर.परकीय चलन मिळवून देणाऱ्या झाडाबद्दल वेगळे कायदे असतात.पोलीस बघतील कोण दोषी आहे ते.”मी पीळ पक्का केला
.
आता भाई हादरला.कायदे हातात घेणाऱ्याला फार कमी कायदे माहीत असतात अशा अनुमानाने मी परकीय चलनाबद्दल ठोकून दिलं होतं.तसाही कलमी आंबा कच्चा असताना तोडला तर दंड आहेच.
”अहो सावंतहेब,अहो वैनी तुम्ही काय त्याचं ऐकताय.मी असं कसं सांगेन,त्याचा काहीतरी गैरसमज झाला असावा.”
लगेच गण्या,”नाय,नाय,तुमीच माज काल सांगीतलेल्यात.”
भाई त्याला गप्प करत म्हणाला,”नाय हो, मी असं काही सांगितलं नाही पण आता ह्याने गडगा फोडला त्याचं काम त्याच्याकडून करून घ्या.”
“अरे चोरा, परस्पर पावणेतेरा करायला बघतोस काय?”मयूने विचारले.”गडगा दोन दिवस घातला आम्ही. त्याची मजुरी दे आता तू.”
पैसे भरून सुटका होतेय हे पाहिल्यावर भाई तयार झाला.पातेरेमामांना दोन दिवसांची मिळून दोनशे रुपये मजुरी मिळाली,त्यातले शंभर रुपये मामींना मिळाले.अजून गण्याचा हात मयूच्या हातात होता.तो तसाच ठेऊन मयूने त्याला सांगितलं,”याच्यापुढे कोणाचीही गुरं बागेत न जाऊ द्यायची जबाबदारी तुझी राहील,मान्य असल्यास सोडतो.” गण्यानेही ते मान्य केलं.मयुने गाण्याला सोडताच भाई पुन्हा बोलला,” तो कासरा घे रे त्यांच्या हातातला.”
मानेनेच नकार देत नवरा बोलला, ” गुरं कोंडवाड्यातून सोडवून घ्या.”भाईचे काही न ऐकता गुरे कोंडवाड्यात पोचवली.प्रत्येक गुराला शंभर रुपये दंड होता तेव्हा.त्या कोंडवाड्यानेही गुरे प्रथमच पहिली असावीत.
“गावातल्या लोकांसमोर झालेल्या फजितीने तरी तो आपल्याला यापुढे त्रास देणार नाही अस वाटतंय.शिवाय बाकीच्यानाही परस्पर धडा मिळेल”,नवरा म्हणाला.
“तुमचे खरे होऊदेत.पण ज्याच्या हाताशी माणसे असतात ते सहजासह्जी गप्प बसत नाहीत.शिवाय त्याला इतका चुना लागलाय तर तो गप्प नाही बसणार.”मी उत्तरले.
सुरेखाची दोरी द्यायला तिच्या घरी गेलो.ती म्हणाली,”ताई,तुम्ही काल येऊन गेलात?पत्तापण नाही लागला.”
तिला म्हटलं,”अग,काल कळलं असतं तर आज मजा आली असती का?”
“पण मला नाही ना बघायला मिळाली.”ती फुरंगटून म्हणाली.
नवरा म्हणाला,”काळजी करू नकोस, तुझी ताई तुला दुसरी गम्मत दाखवेल. शाळा कशी चाललीय तुझी.?”
“छान चाललीय,अजूनतरी सगळ्या येताहेत.”सुरेखा अभिमानाने म्हणाली.”पंधरा दिवसात पाच अक्षरापर्यंत मजल गेलीय.”
“अरे वा! छानच की!”मी तिला शाबासकी दिली.”आता तू बघ दुपारी.”तिनेही हसत सांगितलं.
सुरेखाने दारातल्या भोपळ्याची भाजी,काकडीची कोशिंबीर.आमटी,भात,चपात्या ,घरचे दही असा जेवणाचा सुरेख बेत जमवलेला.जेऊन थोडा आराम करेतो सुरेखाच्या विद्यार्थिनी आल्याच.
शाळा सुरु झाली.अर्थातच आजचा वर्ग अतिथी शिक्षक म्हणून मी घेतला.शिकलेली अक्षरे असलेले शब्द ओळखणे,शब्दातून शिकलेली अक्षरे शिकणे,शिवाय शिकलेली अक्षरे ज्या शब्दात असतात असे शब्द सांगणे असे खेळ आम्ही खेळलो.खूप मजा आली.
सुरेखाचा वर्ग संपेतो,काही पुरुष येऊ लागले.साधारण २०/२२ जन होते.त्यांचाही वयोगट १५ ते ७५ असा होता.काही जणांच्या हातात पाट्याही दिसत होत्या.काहीच्या हातात पिशव्या.मला खरंच आनंद झाला.म्हणजे पुरूषांचा वर्गही चालू झाला होता तर.
”कोण शिकवतं?”मी विचारलं.
“आम्ही दोघेही.शिवाय आपले आजोबापण येतात.”सुरेखा हसत म्हणाली.
“कोणाची कल्पना?”.या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली ,”तशी तर तुझीच पण हा वर्ग घ्यायची कल्पना यांची.आज आठ दिवस झाले सुरु होऊन.”
“छान झालं बघ.म्हणूनच तुझ्या विद्यार्थिनींची गळती झाली नाहीय.”मी खुशीने निष्कर्ष काढला. मग या वर्गात पण थोडी गम्मत केली.
आजोबाही भेटले.आजीतर वर्गातच भेटलेली.त्यानाही सकाळची घटना लाली होती.त्याबद्दल मलाही शाबासकी मिळाली.जपून राहण्याचा सल्लाही मिळाला.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
9 Oct 2015 - 2:43 pm | एस
मस्त.
9 Oct 2015 - 2:43 pm | रुस्तम
पु भा प्र
9 Oct 2015 - 2:50 pm | नाखु
पु भा प्र.
एक डाव भेट घेणे अनिवार्य होऊन बसले आहे. शहरात राहून गावातल्या अडग्यांशी डाव खेळल्याबद्दल.
ता.क. आत्ता बाग आहे का?
9 Oct 2015 - 2:51 pm | मीता
मस्त.
9 Oct 2015 - 2:52 pm | पिलीयन रायडर
मस्त!!! असेच पटापट पुढचे पण भाग टाका. वाट बघत असतो आम्ही.
9 Oct 2015 - 6:40 pm | स्वाती२
मस्तच! तुमच्या धीराचे आणि प्रसंगावधानी वृत्तीचे फार कौतुक वाटते.
10 Oct 2015 - 12:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त चालली आहे लेखमाला. तुमच्या करामती वाचायला मजा येतेय :) पुढचे भाग लवकर लवकर टाका.
11 Oct 2015 - 9:57 am | नूतन सावंत
नाही नाखुजी,आता बाग नाही.२००५ हे माझ्या शेतकरी कारकिर्दीचे शेवटचे वर्ष.आता बाग जी काही ग्रीलमध्ये कुंड्यातून होईल तीच.
11 Oct 2015 - 10:06 pm | इशा१२३
हा भागहि मस्त.मजा येतीये वाचायला.
12 Oct 2015 - 8:12 am | मुक्त विहारि
पुभाप्र.
(स्वगतः आज रात्री रत्नांग्रीला जाणार आणि प्रशांत मध्ये जेवणार.)
26 Dec 2015 - 12:33 pm | शाम भागवत
काही नवे करावे म्हणून –भाग १४