जीवनमान

खाद्ययात्रा कल्याणची!!

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
24 Jan 2016 - 1:26 pm

बर्‍याच दिवसांनी मागच्या आठवड्यात कल्याणला गेलो होतो. थोडी घरची कामे, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि असेच कायकाय मनात होते. सकाळीच पोचलो आणि घरी पोचायच्या आधीच भुकेची जाणीव झाली. आता ईतक्या सकाळी काय बरे खावे? बरं दुपारी एका ठिकाणी जेवायचे आमंत्रण होते, त्यामुळे फार जास्त खाउन चालणार नव्ह्ते.

जीवनमानआस्वाद

गुलामी नात्यातली!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
19 Jan 2016 - 1:21 pm

एखादी भिडस्त व्यक्ती असेल जी कधी कुणाला "नाही" म्हणू शकत नसेल त्याची आजकालच्या जगात फारच परवड, कुचंबणा आणि गोची होत असते. अशा भिडस्त असलेल्या समोरच्या व्यक्तीची संमती न घेता त्याला गृहीत धरून अनेकदा काही गोष्टी केल्या जातात. समोरच्याने त्याबद्दल चकार शब्द काढायचा अवकाश की त्या अगोदरच त्याच्या तोंडावर "भावनिक धमकी" असलेली चिकट पट्टी लावली जाते आणि त्याला बोलू न देता व स्वत:चे मत व्यक्त न करू देता त्याचेवर अगणित स्वार्थी अपेक्षा, इच्छा, आकांक्षा कर्तव्याच्या वेष्टनात बांधून लादल्या जातात मग पट्टी काढली जाते. याला काहीजण संवाद म्हणतात.

समाजजीवनमानविचार

साहित्यिक कसले हे !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
16 Jan 2016 - 5:21 pm

साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.

धोरणमांडणीसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियालेखअनुभवमतशिफारससल्ला

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
15 Jan 2016 - 10:54 pm

म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्‍या कोणातचं नसल्याने आज ही "गोsssSSssड कामगिरी" मी माझ्या अंगावर घेतो आहे.

(५ सेकंद कॅमेर्‍याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर)

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

ll सत्य परिस्थिती ll

नुस्त्या उचापती's picture
नुस्त्या उचापती in जनातलं, मनातलं
11 Jan 2016 - 7:49 pm

पैसे नाहीत म्हणून .....

शिक्षण सोडणारे पावलोपावली भेटतात .

पण .....

पैसे नाहीत म्हणून .....

दारू , जुगार , गुटखा , तंबाखू सोडणारा एकजण

सुद्धा भेटला नाही .

_____________________________________

तुम्हांला असं कुणी भेटलंय का ?

समाजजीवनमानविचार

आम्ही व्ही एस एल वाले

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
9 Jan 2016 - 8:39 am

आम्ही व्ही एस एल वाले
मी गेली २ वर्षे मिपा चा वाचक आहे.पण लिहितो पहिल्यांदाच आहे. काही चुकलं तर सांभाळून घ्या.
शीर्षकातून काही बोध झाला नसल्यास उलगडून सांगतो.व्ही एस एल म्हणजे Visual spatial Learner (याला मराठीत काय म्हणतात?)

शिकण्याच्या ३ शैली आहेत.

कोणतीही व्यक्ती एखादी गोष्ट शिकताना खालील ३ पैकी एका शैलीद्वारे शिकत असते.

व्हिज्युअल स्पेशिअल: यांना कोणत्याही संकल्पनेचं,माहितीचं आकलन द्रुश्य माध्यमाद्वारे सर्वात चांगलं होतं.

ऒडिटरी सिक्वेंन्शिअल: यांना कोणत्याही संकल्पनेचं,माहितीचं आकलन ऎकण्याच्या माध्यमाद्वारे सर्वात चांगलं होतं.

जीवनमान

गप्पा संस्कृती

अश्विनी वैद्य's picture
अश्विनी वैद्य in जनातलं, मनातलं
8 Jan 2016 - 7:31 pm

"अगं अगं…समोर बघ…लागलं ना गुडघ्याला…!" गप्पांमध्ये रमली ना कि कशाचं म्हणून भान नसतं मिनू ला….अगदी डोळ्यांची बटणं होतात, हाताची बोटं दुखून येतात, खांदे, मान भरून येते…पण जरा म्हणून शुद्ध नाही या मुलीला. काकूंची हल्ली ही नेहमीची कानावर पडणारी तक्रार…चालता चालता हातातल्या mobile वर गुंतलेल्या नजर आणि मनामुळे समोरचं भलं मोठ्ठं टेबलही मिनुला त्या ४.५ इंच mobile स्क्रीन च्या प्रकाशात दिसलं नव्हतं.

जीवनमानविचार

टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
7 Jan 2016 - 3:32 pm

टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन. चालावं की धावावं हा सवाल आहे. हा सवाल अनेकांना पडतो. मग हा सवाल ते अनेकांना विचारतात. आणि शेवटी आपल्या सोयीनुसार, इच्छेनुसार, इच्छेच्या तीव्रतेनुसार याचं उत्तर आपल्यापुरतं निश्चित करून या सवालावर पडदा टाकतात.

समाजजीवनमानविचारलेख

दोन मनिष

सनईचौघडा's picture
सनईचौघडा in जनातलं, मनातलं
6 Jan 2016 - 5:03 pm

ही कहांणी आहे माझ्या समोर घडलेल्या समान नावे असणार्‍या दोन मुलांची.

त्यापैकी आज शेजारी (माझ्या आईच्या शेजारी) राहणार्‍या मनिषची ही कथा. माझ्यापेक्षा मनिष ४/५ वर्षेच लहान होता. या कुटंबाची घडी कधी नीट बसलीच नाही. सारखे काही ना काही संकट त्यांच्यावर येत गेले.

जीवनमानसद्भावना