जीवनमान

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
22 Feb 2016 - 9:33 am

गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

हे ठिकाणधोरणसमाजजीवनमानप्रकटनविचारलेखबातमीअनुभवमाहितीसंदर्भमदत

शोध उत्तरांचा : आपण सारे गुलाम आहोत का?

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जनातलं, मनातलं
22 Feb 2016 - 12:44 am

आपण सारे गुलाम आहोत का? हा धागा वाचला आणि लक्षात आलं की यातील काही प्रश्न मलाही सतावत असतात. गेले काही वर्ष मी माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. ही उत्तरे शोधताना मी जमेल तितके वाचले. त्यावर विचार केला. आणि आपल्याला थोडं फार कळत आहे असं वाटू लागले. त्याआधारे मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे माझे आकलन चुकीचे असेल तिथे नक्की सुधारणा सुचवा.

आपण सारे गुलाम आहोत का?

आपण या प्रश्नाला मुख्य प्रश्न समजू या.

जीवनमानप्रकटन

(अशी कबुतरे येती)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
18 Feb 2016 - 9:53 pm

अशी कबुतरे येती;
आणिक घाण ठेवुनी जाती
दोन घरांची पुण्यकमाई
दहा घरांच्या खाती

कपोत आला, पहिला वहिला
खिड़कीमागे उभा राहिला
तया मागे, येई साजणी
गूटर्गूच्या साथी...

दुरून येती थवे देखिले
मी ग्याल्रीचे दार लोटिले
धड़क मारती तरी निरंतर
गंधित झाल्या भिंती

पंख दोन ते हळु फ़डफ़डले
खोलीभर मायेने फिरले
हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि
लागेना मज हाती

'पुण्यवान' तो येता गाठी
शिव्या पाच मोहरल्या ओठी
त्या तुटल्या दातांची गाथा
क्रूर कबुतरे गाती

-- स्वामी कपोतगावकर

करुणजीवनमान

प्रसार माध्यमे आणि टिपिंग पॉईंट - एक रोचक संशोधन

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
18 Feb 2016 - 9:27 pm

दि न्यूयॉर्कर साप्ताहीकाचा पत्रकार माल्कम ग्लाडवेल, याने २००० मधे एक पुस्तक लिहीले होते - "The Tipping Point - How Little Things Can Make a Big Difference". कुठलिही गोष्ट अचानक मोठी होण्याआधी कशा घटना घडत असतात त्या एकमेकांना कशा लागलेल्या असतात, याचा अन्वयार्थ लावताना या पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. असा टिपिंग पॉईंट हा रोगराई, युद्धे, गुन्हेवारी वाढ इथपासून ते राजकीय बदल या सर्वत्रच दिसू शकतो. उदा. "ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राचा खून हे पहील्या महायुद्धाचे तात्कालीक कारण" समजले जाते. पण त्याआधी घडलेल्या घटना या एकमेकांना लागलेल्या असतात...

समाजजीवनमानतंत्रराजकारणशिक्षणप्रकटनविचारसमीक्षा

"नाही" चा महिमा!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
17 Feb 2016 - 5:23 pm

विश्वासघात त्याचाच केला जातो जो विश्वास ठेवतो. म्हणून जास्त आणि पटकन कुणावर विश्वास ठेवत जाऊ नका. इमोशनल ब्लॅकमेल त्यालाच केले जाते जो इमोशनल असतो. म्हणून आजच्या जगात जास्त इमोशनल राहून चालत नाही. भिडस्त राहून सुद्धा चालत नाही. नाहीतर भिडस्त माणसाचा सर्वात प्रथम बळी जातो. तुम्ही दाबले जाल तर दुनिया तुम्हाला आणखी दाबेल. आजकालच्या जगात जो सगळ्यांचा मनाचा विचार करतो त्याच्या मनाचा विचार कुणीच करत नाही. जो सगळ्यांच्या स्वभावाला सांभाळून घेतो, त्याच्या स्वभावाला मात्र कुणीच सांभाळताना दिसत नाही. अशा व्यक्तीला दुखवणे आपला हक्कच आहे असे लोक मानतात कारण अशा व्यक्तीला गृहीत धरले जाते.

समाजजीवनमानविचार

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

गणेश उमाजी पाजवे's picture
गणेश उमाजी पाजवे in जे न देखे रवी...
16 Feb 2016 - 7:00 pm

गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.वाचा, श्यामसुंदर सोन्नर यांची कविताशेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
.....................................

समाजजीवनमानराजकारण

प्रेम !!! ???

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 8:20 pm

प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण!

आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो.

मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला.

वावरवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधलेखप्रतिभाविरंगुळा

सेकंड ओपिनीयन

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जनातलं, मनातलं
14 Feb 2016 - 10:50 pm

वाकडेवाडीचा जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरचा भुयारी मार्ग दृष्टीपथात येताच मी गाडी डाव्या मार्गिकेत वळवली. वेग कमी करत करत भुयारी मार्गाच्या तोंडाच्या थोडंसं अलिकडे थांबलो.

जीवनमानप्रकटन

मला कुठे मरायचं आहे?

एनिग्मा's picture
एनिग्मा in जनातलं, मनातलं
14 Feb 2016 - 7:08 am

मला कुठे मरायचं आहे?

जिवंतपणी आपण नेहमी हा विचार करत असतो कि मला कुठे जायचं आहे? मला कस जगायचं आहे? मला काय हवा आहे? पण कुठे मारायचं आहे हा विचार फार क्वचितच आपल्या मनात येतो. तसही आजकालच्या ददागीच्या जमान्यात जगायला फुरसत मिळत नाही, तर मारायची चिंता पडलीये कुणाला.

आपला दिवस जातो तो काम, कष्ट आणि फावल्या वेळात करमणूक ह्यामध्ये, त्यात आपण आपल्या मनाला थोडं शांत करेल असा काही शोधतच असतो. त्यासाठी कित्येकदा आपण सहलीला जातो आणि रोजचा तणावातून मुक्त होता येते का हे पाहतो. पण ती चीर्र्शांती आपल्याला सापडेलच असा नसत.

जीवनमानविचार