कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !
पैसा , वेळ आणि काम ही दैनंदिन टेंशनची तीन प्रमुख कारणं आहेत . काहीही आणि कितीही साधना केली तरी हे तीन प्रश्न सोडवल्याशिवाय जीवनात स्वास्थ येणं असंभव . आपल्या प्रत्येक दिवसाचा सगळा प्राईम टाईम याच तीन गोष्टींवर व्यतीत होत असतो . तस्मात , या तीन आयामात मजा आली तर जगण्यात आपसूक मजा येते .
या तीन डायमेंन्शसपैकी काम सेंट्रल आहे कारण वेळ आणि पैसा त्याच्याशी निगडित आहेत . थोडक्यात काम नसेल ( उदा . रविवार ) तर वेळ आणि पैसा दुय्यम ठरतात . आणि त्याही पुढे जाऊन काम आनंदाचं झालं तर वेळ आणि पैसा बहुतांशी परिणाम शून्य होतात .