कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !

विवेक ठाकूर's picture
विवेक ठाकूर in जनातलं, मनातलं
16 Apr 2016 - 2:53 pm

पैसा , वेळ आणि काम ही दैनंदिन टेंशनची तीन प्रमुख कारणं आहेत . काहीही आणि कितीही साधना केली तरी हे तीन प्रश्न सोडवल्याशिवाय जीवनात स्वास्थ येणं असंभव . आपल्या प्रत्येक दिवसाचा सगळा प्राईम टाईम याच तीन गोष्टींवर व्यतीत होत असतो . तस्मात , या तीन आयामात मजा आली तर जगण्यात आपसूक मजा येते .

या तीन डायमेंन्शसपैकी काम सेंट्रल आहे कारण वेळ आणि पैसा त्याच्याशी निगडित आहेत . थोडक्यात काम नसेल ( उदा . रविवार ) तर वेळ आणि पैसा दुय्यम ठरतात . आणि त्याही पुढे जाऊन काम आनंदाचं झालं तर वेळ आणि पैसा बहुतांशी परिणाम शून्य होतात .

कामाच्या बाबतीत एक सार्वत्रिक गैरसमज असाये की मनाजोगतं काम नाही त्यामुळे मजा येत नाही . या गैरसमजामुळे फार मोठा अनर्थ ओढवला आहे. कारण हे म्हणजे, पत्नी मनासारखी नाही त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख नाही म्हणण्यासारखं आहे . त्यात पत्नी निदान व्यक्ती तरी आहे त्यामुळे तिच्याबाबतीत काही प्रमाणात कलह संभव आणि स्वाभाविक आहे . पण काम तर सर्वस्वी न्यूट्रल आहे. ते पूर्णपणे व्यक्ती निरपेक्ष आहे. त्यामुळे कामाच्याबाबतीत, ते करणार्‍याचा दृष्टीकोनच कायम निर्णायक आहे .

थोडक्यात , एकदा का मनानं ठरवलंकी आपण करत असलेल्या कामात काही मजा नाही की जीवनाचा बाजा वाजलाच म्हणून समजा . मग त्या कामात व्यतीत केलेला वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा, फारसा आनंद देऊ शकत नाहीत .

तर सांगायची गोष्ट अशी की मनाजोगतं काम ही आयुष्यात मनासारखी पत्नी मिळण्यासारखी दुर्लभ घटना आहे .

बर्‍याच सायकॅट्रीस्टसनी यावर `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन '( किंवा वेल अॅडजस्टेड पर्सनॅलिटी ) हा एकमेव नामी पर्याय शोधला आहे . थोडक्यात , ` आहे त्याच्याशी विनातक्रार जुळवून घ्या , सुखी व्हाल', असा मनाला गप्प करण्याचा उपाय सुचवला आहे. आणि जगातल्या बहुतेक सर्व सो कॉल्ड हॅपी दिसणार्‍यांनी तोच आचरणात आणलेला दिसतो .

असे लोक मग ` रिटायरमंट नंतर मजा करू ' अशी मनाची समजूत काढून, स्वतःला नेटानं कामाला जुंपून घेतात . सुट्टीच्या दिवशी जमेल आणि झेपेल तेवढी मजा करतात . सोमवारची नकोनकोशी आठवण मनाला पुढची काही तरी स्वप्न दाखवत सुसह्य करतात. ही झाली कर्मयोगाची सायकिक ट्रिटमेंट .

आध्यात्मिक ट्रिटमेंट तर त्याहून भारी आहे आणि अर्थात असायलाच हवी !

आध्यात्मात `निष्काम कर्मयोग' किंवा ` फलापेक्षारहित कर्मयोग ' सांगितला जातो . थोडक्यात , पैशाकडे न बघता निव्वळ कामाचा आनंद घ्या हा तो राजमार्ग ! पण हा प्रकार जितका जोरात राबवाल तितका मानसिक दुफळी निर्माण करतो . कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ; पब्लिक सकाळी उठल्यापासून कामाचा गाडा ओढत असतं. त्यात आता ` कोणतीही अपेक्षा न करता' ही सगळी झकमारी करायची म्हणजे अवघड होऊन बसतं .

या कर्मयोगी विचारसरणीमुळे कामाला गौरव प्राप्त होणं तर दूरच, पैशाला अवाजवी महत्व मिळालंय. म्हणजे सरकारी कामात बेतहाशा भ्रष्टाचार आणि प्रायवेट सेक्टरमधे जीवघेणी स्पर्धा . सरकारी कार्यालयातला माणूस निब्बर झालायं आणि खाजगी क्षेत्रातला निव्वळ यंत्रवत काम करतोयं. कामाची मजा म्हणावी तर इकडेही नाही आणि तिकडेही नाही .

तर काय असेल कामाच्या आनंदाचं रहस्य ?

पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं .

दुसरी गोष्ट, या `ऑप्शन नॉट टू वर्क' मधे कामाची कंटीन्यूटी आणि सृजनात्मकता दोन्हीही अंतर्निहित आहेत . असा विकल्प असेल तर काम किती आनंदाचं होईल याची तुम्ही कल्पना करू शकता.

आणि तिसरी गोष्ट, अशा कामात मग वेळ आणि पैसा दोन्ही दुय्यम होतात . कामाची ऐच्छिकताच, कामाचा इतका आनंद देऊन जाते की फलप्राप्ती बोनस ठरते. आणि जिथे आनंद आहे तिथे तणाव अशक्य आहे.

काय आधार आहे या विचारामागे ? तर मुळात कार्य हा अस्तित्वाचा छंद आहे , कंपलशन नाही.

ज्या वेळी काम कंपलशन म्हणून केलं जातं त्यावेळी आपण अस्तित्वापासून वेगळे झाल्यासारखे वाटतो. आपली समग्रता हरवते. आपली सृजनात्मकता लयाला जाते. केवळ फलप्राप्तीच्या आशेनं आपण कामाचं ओझं वाहातो आणि त्यातून कालनिर्मिती होते. हा काल दुहेरी असतो, एकीकडे तो कालावधी संपण्याची इच्छा निर्माण करतो आणि दुसरीकडे काम वेळेत संपवण्याचं टेंशन तयार करतो .

या विकल्पाचा दुसरा पैलू तर त्याहूनही थोर आहे . अशा चित्तदशेत काम करणार्‍या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत ..... आणि हा `ऑप्शन नॉट टू वर्क' आपल्याला कायमच उपलब्ध होता! तुमचं कामच तुमचा छंद होतं, मग ते कुठलही काम असो. कामाच्या आनंदामुळे फलाशा दुय्यम होते आणि वेळेचं मनानं निर्माण केलेलं ओझं दूर होतं.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

16 Apr 2016 - 3:03 pm | उगा काहितरीच

खरं सांगायचं तर , लेख काही झेपला नाही. तस्मात आपला पास .

विवेक ठाकूर's picture

16 Apr 2016 - 10:22 pm | विवेक ठाकूर

काम न करण्याचा विकल्प निर्माण करणं हे साहस आहे. फक्त कल्पना करुन पाहा. एकदा मुद्दा कळला की त्या दिशेनं आयुष्यात बदल घडवणं सुरु होतं.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2016 - 7:34 am | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/confused/hypnotize.png

"पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं ."

काम बंद!

आध्यात्मात `निष्काम कर्मयोग' किंवा ` फलापेक्षारहित कर्मयोग ' सांगितला जातो . थोडक्यात , पैशाकडे न बघता निव्वळ कामाचा आनंद घ्या हा तो राजमार्ग ! पण हा प्रकार जितका जोरात राबवाल तितका मानसिक दुफळी निर्माण करतो . कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ; पब्लिक सकाळी उठल्यापासून कामाचा गाडा ओढत असतं. त्यात आता ` कोणतीही अपेक्षा न करता' ही सगळी झकमारी करायची म्हणजे अवघड होऊन बसतं .

लगे रहो..

अवांतर - आपल्याला कामापासून मुक्ती नसल्यामुळे आज पण कामच करत आहे. तस्मात पास.

प्रतिसाद दिला असता, पण सध्या काम बंद असल्याने देऊ शकत नाही.

पैसा's picture

17 Apr 2016 - 11:37 am | पैसा

मला पण स्वयंपाकाचं काम बंद करायचंय. घरातले दु दु लोक रोज उठून हॉटेलचं खायला तयार नाहीत!

थोड कळतय अस वाटेपर्यंत आमची गाडी रुळावरुन घसरली..

विवेक ठाकूर's picture

17 Apr 2016 - 12:20 pm | विवेक ठाकूर

म्हणजे काम बंद असं वाटतंय ! कारण आपल्याला फक्त दोनच पर्याय माहितीयेत, कामाला जुंपून घेणं किंवा काम बंद ! स्वतःच्या मर्जीनं काम करणं हा कामातल्या आनंदाचा फंडा आहे .

मग सोप्या भाषेत समजावा माऊली...

अशा चित्तदशेत काम करणार्‍या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत

"बटाट्याची चाळ" मध्ये पुलंनी एक प्रसंग रंगवला आहे. "...बाबांचा सूर असा काही लागला की बाबलीबाई समोरच्या ताटातल्या शेंगा वातीसारख्या वळू लागल्या. काही भगिनींना अशा वेळेला हमखास येणारी पेंग येऊ लागली."

वर दिलेल्यासारखं वाक्य वाचलं की त्या इफेक्टचं मिपा-व्हर्जन येतं.

कामात स्वच्छंद आला तर आणि तरच अकर्ता गवसण्याची शक्यता आहे.

It is really the other way round. In spirituality, people try a non-sense of reaching the Constant Steady State, which is also called the Presence or our True Nature by trying futile meditations.

To me Work is the Real Meditation. The Life is to be solved primarily at that stage. If one can bring this `Option Not to Work' in one's activity, one is most likely to stumble upon the Truth.

अर्थात, या फार दुरच्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा `ऑप्शन नॉट टू वर्क' हे साहस जमायला हवं तर मग ती पुढची पायरी आहे.

इथे मी काही तरी काल्पनिक लिहीतोयं असा समज व्हायला नको म्हणून अकर्ता किंवा साक्षी ही सर्वमान्य आध्यात्मिक वस्तुस्थिती नमूद केलीये इतकंच.

आदूबाळ's picture

17 Apr 2016 - 5:15 pm | आदूबाळ

ओके. काल्पनिकता नकोच. आणि तात्त्विक पातळीवर (अ‍ॅट अ प्रिन्सिपल्स लेव्हल) लिहिलेलं माझासारख्या अनेक सामान्य मिपाकरांना कळत नाही हे उघडच आहे.

आपण असं करूया का? आम्ही सगळे मिळून सगळ्यांच्या आयुष्यात घडणारी एक सिच्युएशन बनवतो. ती सिच्युएशन डोक्याला शॉट देणारी, ज्यात प्रचंड मनस्ताप होतो अशी बनवू. तो मिपाकरांचा लसावि आहे असं समजा. मग त्यावर ही सगळी तत्त्वं कशी लावायची हे तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगा.

या स्टेप्स सर्वसामान्य मिपाकराला आचरणात आणता येण्याजोग्या असल्या, आणि अंतिम रिझल्ट म्हणून डोक्याचा शॉट / मनस्ताप कमी झाला तर या तत्त्वांच्या उपयुक्ततेचं प्रात्यक्षिकच घडेल.

हे चालेल का? करूया का असं?

ती सिच्युएशन डोक्याला शॉट देणारी, ज्यात प्रचंड मनस्ताप होतो अशी बनवू. तो मिपाकरांचा लसावि आहे असं समजा.

कोणता धागा वगैरे का?

विवेक ठाकूर's picture

17 Apr 2016 - 5:26 pm | विवेक ठाकूर

फक्त सिच्युएशन दैनंदिन कामाशी संबंधित हवी .

हो अर्थातच. ओव्हर द टॉप किंवा लाखात एकदा घडणारी सिच्युएशन नक्कीच नाही.

त्यामुळे सर्जन असो, सुपरस्टार असो की अगदी भिक मागायचं काम असो, उत्तर एकच आणि निर्विवाद आहे. त्यामुळे माझ्याबाजूनं काहीच प्रश्न नाही.

अर्धवटराव's picture

18 Apr 2016 - 12:12 pm | अर्धवटराव

लसावी म्हणा कि मसावी... सगळ्या परिस्थितीत चालणारा एक फॉर्म्युला आहे.
"सद्यः परिस्थितीत मी काय करायला हवं" हे सांगणारं इंजीन प्रत्येक माणसाच्या मनात/मेंदुत निसर्गाने इन्स्टॉल केलं असतं. त्याचं ऐकुन शरीर, बुद्धीला त्या कामी जुंपायचं.
कधि कधि या इंजीनातुन अनेक स्वर उमटतात, गोंधळल्यासारखं होतं. मग थोडं नीट ऐकायचं. टाइम शेअरींग करुन त्यातल्या प्रत्येक स्वराला जस्टीस देणारी यंत्रणा बरोब्बर उत्तर देते.
कधि हे प्रकरण अव्यवहार्य वाटतं. पण तरिही तो कौल घ्यायचा. बेस्ट पॉसीबल रिजल्ट हमखास मिळतात. शिवाय इंजीन आपला फॉर्म्युल्यात अनुभवातुन करेक्शन करत असतं.

माणसाचं मन स्वभावतः स्वार्थी असतं. आपला इंट्रेस्ट ते कधि नजरेआड होऊ देत नाहि. त्यामुळे या फॉर्म्युल्याने आपलं नुकसान होत नाहि. इन फॅक्ट, कळत नकळत आपण याच फॉर्म्युलाने वागत असतो. त्यात डोळस सातत्य ठेऊन बघायचं बस.

विटेकर's picture

19 Apr 2016 - 12:14 pm | विटेकर

अर्धवट राव ,
केव्हा पासून असे होतेय ? काही डॉकटर , हकिम , वैद्य लोकांना दाखवले का ? तुमचा चक्क संक्षी होत चालला आहे !
उपचार घ्या हो लवकर !

आमच्या आय्डी पण पंख लागणार कि काय ?? :(

विटेकर's picture

20 Apr 2016 - 3:00 pm | विटेकर

ते सोडून सोडा ..तुम्हाला कोण पंख लावत नाही !

तुमच्या प्रतिसादावरुन असे वाट्ले की माता सरस्वती आपल्या अंगुलीत अवतीर्ण होऊन आपल्या कळ्फलकावर साल्सा करत आहे ! म्हणून एक्दम संक्षी आठ्वले !

वैभव जाधव's picture

20 Apr 2016 - 5:31 pm | वैभव जाधव

अर्धवटराव जर संक्षी असतील तर वि.ठा.(विटूकाका नव्हे) कोण असतील?

भीमाईचा पिपळ्या.'s picture

17 Apr 2016 - 12:28 pm | भीमाईचा पिपळ्या.

मी हे वाचलं का भास होत आहे. घंटा काय कळलं नाही.

चौथा कोनाडा's picture

17 Apr 2016 - 2:08 pm | चौथा कोनाडा

जगण्याच्याtतीन बेसिक गरजा अन्न, वायफाय अन मिपा हे कुणी तहहयात द्यायला तयार असेल तर आम्ही : नॉट टू वर्क: हा ऑप्शन स्वीकारायला तयार आहोत.i

अभ्या..'s picture

17 Apr 2016 - 2:19 pm | अभ्या..

अशा कामात मग वेळ आणि पैसा दोन्ही दुय्यम होतात . कामाची ऐच्छिकताच, कामाचा इतका आनंद देऊन जाते की फलप्राप्ती बोनस ठरते.

अहाहाहाहा. परफेक्ट विवेकजी.
अगदी इथलेच उदाहरण द्यायचे म्हणजे आपल्या मिपाचे बॅनर करायचे असते. रात्री हपिसातून यायलाच दहा अकरा वाजलेले असतात. एखाद दुसरे रिमाइंडर आलेले असते पण तगादा नसतो. पैसा हा म्याटर तर नसतोच. अगदी नाही केले तरी कुणी बोलणारे नसते. मनापासून करायच्या इच्छेने काम चालू करतो. अगदी पटकन होउन जाते हो. आपल्या त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन सोहळ्याचे बॅनर हो. माझे मलाच इतके आवडले की बस्स. शिवाय नंतर दाद मिळते ती तुम्ही म्हणता तशी बोनसच की.
तुम्च्या लेखातले सगळे काही कळले नाही मला पण जेवढे रिलेट करता आले ते भावले.
धन्यवाद.

विवेक ठाकूर's picture

17 Apr 2016 - 3:07 pm | विवेक ठाकूर

लेखावरचा पहिला सेंसिबल आणि मुख्य म्हणजे अनुभवातून आलेला प्रतिसाद!

अगदी नाही केले तरी कुणी बोलणारे नसते. मनापासून करायच्या इच्छेने काम चालू करतो.

कर्मयोगाचं हेच तर गमक आहे ! स्वच्छंद !

पण लोकांना कामाची बळजबरी झालीये. त्यामुळे त्यांना एकतर ते ओढावं लागतं किंवा करु नाही असं वाटतं. या दोन्हीही निरुपयोगी चित्तदशा आहेत. अशा मानसिकतेतून कामाचा आनंद कसा मिळेल?

आणि स्वच्छंद ही काही कल्पना नाही. अभ्या जे करतो तेच मॉडेल प्रत्यक्ष व्यावहारात पण आणता येतं, फक्त जिगर हवी ! आणि जिगर म्हणजे उर्मटपणा नाही. ती स्वतःच्या स्पेसमधे काम करण्याची हिंमत आहे.

आणि हे साहस एकदाच करावं लागतं . रोजरोज मरत जगण्यापेक्षा एकदा साहस करणं केंव्हाही श्रेयस. आणि काय आहे ते साहस? तर फक्त इतकंच की आपण प्राथमिक आहोत आणि काम दुय्यम आहे.

याचा अर्थ आपण कामच करणार नाही असा होत नाही. आपण आपल्या मर्जीनं काम करु. आणि जेंव्हा करु तेंव्हा इतकं समरसून करु की फलाकांक्षा आणि वेळ यांचा काही रिलेवंसच राहाणार नाही. मग कामात येणारी मजा आणि आपली पराकोटीला पोहोचलेली सृजनात्मकता, काम वेळेपूर्वीच संपवते.

याचा अर्थ काम झाल्यावर बिलींग होत नाही असा नाही. पण कामात मिळालेला आनंद बिलाची रक्कम हृदयाशी जोडत नाही. चेकच्या वाटेकडे डोळे लावून बसलोयं असं होत नाही.

गृहिणींच्या बाबतीत तर हे इतकं सोपं आणि उघड आहे की फक्त आपलं बुद्धी कौशल्य वापरायचा आवकाश. आणि तिथे तर फलप्राप्ती लगोलग आहे. आपण केलेल्या कामाचा आनंद स्वच्छ दिसणार्‍या घरात, उत्तम झालेल्या स्वयंपाकात, अनायसे झालेल्या शारिरिक कष्टात, आपल्या लोकांशी जोडले जाण्यात अंतर्निहित आहे. इन फॅक्ट, आपल्या आनंदात दुसर्‍यांना सामिल करुन घ्यायला गृहकृत्यासारखी दुसरी गोष्ट नाही.

पण लेखात म्हटलंय तसं पब्लिकला पैसा कामापेक्षा श्रेष्ठ वाटतो! त्यामुळे संसाराचा केंद्रबिंदू असलेल्या गृहकृत्याकडे सुद्धा एक ओझं आणि उगीच इतरांना उपकृत केल्याचा भाव आणल्यावर त्यातली मजाच हरवून जाते.

तर सांगायचं म्हणजे जगातलं कुठलंही काम व्यक्ती निरपेक्ष आहे. ऑल वर्क पर से इज न्यूट्रल. तस्मात, स्वच्छंद घरकामात आणला काय की व्यावहारिक कामात आणला काय, तो कामाची मजा देऊन जातोच. आणि हा खरा कर्मयोग आहे.

आनन्दा's picture

17 Apr 2016 - 3:31 pm | आनन्दा

वोक्के.. एकच प्रश्न पडलाय.
एक इंजिनीअर झालेला पोरगा आहे. पोरगा आहे हुशार, पण काही कारणाने त्याला नोकरी मिळत नाहीये. योगायोगाने त्याला कोणीतरी कामावर ठेवतो, पण ते काम आहे डेटा एंट्रीचे, म्हणजे त्याच्या क्षमतेचा, शिक्षणाचा शून्य वापर, आणि आवडीचा तर प्रश्नच नाही. पण पापी पेटका सवाल असल्यामुळे त्याला ते करावे लागतेय.
अश्या मुलाला आपण काय सल्ला द्याल?

अश्या मुलाला आपण काय सल्ला द्याल?

Poverty is a state of mind.

श्री श्री राहुलजी गांधी

डेटा एंट्री सोडा, मी तर घरकामात सुद्धा तितकीच मजा आहे हे अनुभवानं सांगतो. आपली नज़र कामाला असलेल्या सामाजिक प्रतिष्ठेकडे आणि खरं तर त्यातून मिळणार्‍या मोबदल्यावर आहे त्यामुळे कामाचं ओझं वाटतं.

If you can understand me the situation is exactly reverse. The least remunerative is the work, the most potential it has to give pleasure to the doer.

आणि एक गोष्ट नक्की, जो डेटा एंट्रीच काम उत्तम करेल त्याच्याकडे आपसूक जास्त कौशल्य लागणारी कामं येतील . जो त्यातच खळखळ करेल त्याची प्रगती होण्याची शक्यता कमी कारण कामचुकार अशी अपकिर्तीच त्याला अडसर ठरेल.

फार लांबच्या आणि काल्पनिक गोष्टी सध्या दूर ठेवा. अगदी साधी स्वतःची गाडी धुण्याची गोष्ट घ्या. ते कर्मच आहे, तिथे ही ते गाडी धुणार्‍याला सुपूर्द करण्याचा पर्याय आहे. पण कधी मन लावून ते काम करुन पाहा. कामाचा आनंद कामातच अंतर्भूत आहे. सदैव आपल्या दिमतीला असलेली गाडी, नुसती स्वच्छ होऊन चमकतांना बघितली तरी जीव हरखून जातो. कामाचा मोबदला हा कामातून मिळणार्‍या आनंदातच सामिल आहे.

चौथा कोनाडा's picture

17 Apr 2016 - 9:03 pm | चौथा कोनाडा

ठाकुर साहेब, तुम्ही फक्त कामाचा आनंद, स्वचछंद या बद्दलच बोलताय.

बेसिक उदर निर्वाहा साठी लागणारा पैसा व कष्ट व प्रचंड या बद्दल काहीच बोलत नाहीय. हे म्हंजे शुद्ध अध्यात्म झाले.!

सध्याच्या काळात वाढत्या गरजा महागाई या नुसार प्रत्येकाची आर्थिक गरज वेगवेगळी आहे अन त्या साठी करावा लागणारा जॉब हा आनंद देणारा नसेल तर काय करायचे ?

तुम्ही म्हणताहेत कामाचा आनंद (जॉय ऑफ वर्क ) ते सर्व भरल्या पोटी करायचे विचार आहेत.

विवेक ठाकूर's picture

17 Apr 2016 - 9:28 pm | विवेक ठाकूर

त्यामुळे सगळा फोकस त्याच्यावर आहे. एकदा काम उत्तम झालं की मोबदला मिळतोच. तस्मात, मी 'मा फलेशु कदाचन' असं कदापी म्हणणार नाही. जर तुम्ही लेखात विशद केलेली चितदशा कामापूर्वी निर्माण करु शकलात तर दोन्ही आयाम सार्थ होतील. म्हणजे कामाचा आनंद, जो पैशापेक्षा थोर आहे , तोही मिळेल आणि योग्य मोबदल्यावरही तुमचा अधिकार राहील कारण तो व्यावहार आहे .

आनन्दा's picture

18 Apr 2016 - 11:04 am | आनन्दा

हे ठीक आहे.. थोडं जास्तीच ऑप्टिमिस्टिक होतय. प्रत्यक्ष आयुष्यात हे घडायला नशीब लागते.

जो त्यातच खळखळ करेल त्याची प्रगती होण्याची शक्यता कमी कारण कामचुकार अशी अपकिर्तीच त्याला अडसर ठरेल.

याच्याशी अंशतः सहमत.

आपली नज़र कामाला असलेल्या सामाजिक प्रतिष्ठेकडे आणि खरं तर त्यातून मिळणार्‍या मोबदल्यावर आहे त्यामुळे कामाचं ओझं वाटतं.

माझ्या दृष्टीने हे साहजिक आहे, कारण माझ्या डोक्यावर किमान क्षक्ष लाखाचे कर्ज आहे, आणि त्याचा हप्ता जाईल एव्हढी तरी मासिक कमाई मला आवश्यक आहे.

असो - तात्विक पातळीवर या प्रतिसादाशी सहमत आहे, पण व्यावहारिक पातळीवर हे राबवताना बर्‍याच अडचणी येतात.

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2016 - 11:13 pm | चौथा कोनाडा

अगदी हेच ल्हायला आलोय.

Love like you've never been hurt
Dance like nobody's watching
Work like you don't need the money

हाच सर्वज्ञात विचार ठाकुर साहेबानी मांडलाय. हे सगळं भरल्यापोटी म्हणायचं ! तुमच्या सारखी ग्राउंड रियालिटी पाहिलीकी यातली दाहकता कळेल. बरेच एम टेक झालेले युवक काही बेसिक काम करत पैसे मिळवत राहतात हे जवळुन पाहतोय. नावडीचं काम पैसे बर्यापैकी मिळतात म्हणुन ओढावे लागतेय.
हं, आता हेच काम आवडुन घ्या व कर्मयोगाचा आनंद लुटा असे म्हणत असतील तर तो वेगळाच मुद्दा आहे.

आणि हो, उगाच काहीतरी म्हणतात त्यानुसार शब्दांचे पोकळ बुरुज उभा करत ठाकुर साहेबानी लेखाचा किल्ला लढवलाय.

लेख पाल्हाळिक झाल्यामुळे त्याच्या आशय व्यक्त करण्यातली धार गेलीय.

विवेक ठाकूर's picture

19 Apr 2016 - 1:19 pm | विवेक ठाकूर

त्यामुळे लेख किल्ला लढवल्यासारखा वाटतोयं. सुबोधजींचा प्रतिसाद वाचलात तर सगळं क्लिअर होईल.

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2016 - 8:20 pm | चौथा कोनाडा

विठासाहेब,
अर्धवटराव, भीमाईचा पिपळ्या, आनन्दा आणि माझा असे प्रतिसाद काळजीपुर्वक वाचा म्हंजे मला/आम्हाला काय म्हणायचंaआहे ते तुमच्या लक्ष्यात येइल.

बुरुज अन किल्ल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीच्या अन इतर काही प्रतिसादावरुन हे कसले बुरुज आहेत हे वेगेळे सांगायची गरज नाही.

उदा . अभ्या , सुबोधजी, काही प्रमाणात गॅरी ट्रुमन त्यांचे प्रतिसाद वाचले तर तुम्हाला लेख कळू शकेल . ज्यांना मुद्याच कळला नाही त्यांचे प्रतिसाद वाचून काय उपयोग ? शिवाय मी लेख अनुभवातूनच लिहीलायं आणि सर्व प्रामाणिक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत . तस्मात , मला किल्ला लढवण्याची गरजच नाही .

विवेक ठाकूर's picture

19 Apr 2016 - 10:30 pm | विवेक ठाकूर

चित्रगुप्तांचं नांव लिहायचं राहीलं . त्यांनी सृजनशील कामात येणाऱ्या अडचणी कामाची खुमारी कशी वाढवतात याचा समर्पक दाखला दिला आहे . आणि मुख्य म्हणजे ते 'ऑप्शन नॉट टू वर्क ' या चित्तदशेतून काम करतात !

विवेक ठाकूर's picture

19 Apr 2016 - 10:30 pm | विवेक ठाकूर

चित्रगुप्तांचं नांव लिहायचं राहीलं . त्यांनी सृजनशील कामात येणाऱ्या अडचणी कामाची खुमारी कशी वाढवतात याचा समर्पक दाखला दिला आहे . आणि मुख्य म्हणजे ते 'ऑप्शन नॉट टू वर्क ' या चित्तदशेतून काम करतात !

अप्पा जोगळेकर's picture

18 Apr 2016 - 5:16 pm | अप्पा जोगळेकर

याचा अर्थ आपण कामच करणार नाही असा होत नाही. आपण आपल्या मर्जीनं काम करु. आणि जेंव्हा करु तेंव्हा इतकं समरसून करु की फलाकांक्षा आणि वेळ यांचा काही रिलेवंसच राहाणार नाही. मग कामात येणारी मजा आणि आपली पराकोटीला पोहोचलेली सृजनात्मकता, काम वेळेपूर्वीच संपवते.
तुम्ही अशा पद्धतीने काम करता का ?

विवेक ठाकूर's picture

18 Apr 2016 - 8:52 pm | विवेक ठाकूर

अर्थात ! मी माझा अनुभव शेअर करतो. तस्मात, प्रश्नांची उत्तरं अनुभवातून येतात, कल्पनेतून नाही. आणि त्यामुळेच प्रश्नांची फिकीर नसते.

प्रश्नांची उत्तरं अनुभवातून येतात, कल्पनेतून नाही

नक्की का?

तर्राट जोकर's picture

17 Apr 2016 - 4:31 pm | तर्राट जोकर

कालच एक २०-२२ वर्षांचा उमदा तरुण भेटला. आपली ओळख देतांना बोलला मी ड्रायवर आहे आणि मला माझ्या कामाची कसलीही लाज वाटत नाही.

त्याच्या बॉसनेही अपरोक्ष त्याचे अनेक गुण सांगितले, उदा. सीटबेल्ट लावणे, गाडी सोडून कुठेही न जाणे, थोडक्यात इतर ड्रायवर जे अवगुण करतात त्यापेक्षा वेगळा आहे म्हणून.

त्याचे काम हेच त्याची मजा आहे आणी ते तो पुरेपुर उपभोगतो.

विवेक ठाकूर's picture

17 Apr 2016 - 5:08 pm | विवेक ठाकूर

कामाची दर्जेवार विभागणी मनात दुभंग निर्माण करते आणि मग कामातून मिळणारा आनंद नाहीसा होतो . एकदा प्रत्येक काम हे स्वभावतःच न्यूट्रल आहे हे लक्षात आलं की काम करणाऱ्याचा दृष्टीकोन महत्वाचा होतो, मग कोणत्याही कामात तुम्ही रंग भरु शकता .

भीमाईचा पिपळ्या.'s picture

17 Apr 2016 - 6:25 pm | भीमाईचा पिपळ्या.

याचा अर्थ आपण कामच करणार नाही असा होत नाही. आपण आपल्या मर्जीनं काम करु. आणि जेंव्हा करु तेंव्हा इतकं समरसून करु की फलाकांक्षा आणि वेळ यांचा काही रिलेवंसच राहाणार नाही.

मग कर्मन्यवाधिकारस्ते.....च झाले कि.....

विवेक ठाकूर's picture

17 Apr 2016 - 8:35 pm | विवेक ठाकूर

कर्मण्येवाधिकारस्ते या दोन अप्रोचेसमधे कमालीचा फरक आहे.

पण तुमचा पहिला प्रतिसाद असा आहे :

मी हे वाचलं का भास होत आहे. घंटा काय कळलं नाही.

त्यामुळे तुम्हाला कळेल की नाही याबद्दल साशंकता आहे. तस्मात, वेळ घालवू इच्छित नाही.

भीमाईचा पिपळ्या.'s picture

17 Apr 2016 - 9:04 pm | भीमाईचा पिपळ्या.

बरररररअरररर

या सर्व चक्रातुन मी गेलॉ आहे. नोकरी सोडण्यापुर्वी अनेक वर्षे इच्छा नसताना कामावर गेलो आहे मग केवळ जबाबदारीचा पगार मिळतो म्हणुन शिव्या खाल्या आहेत. हाताखालच्या माणसाने चुक केली पण तो साहेबांचा माणुस किंवा केवळ ज्युनीयर म्हणुन त्याला सोडुन मला " फायर करतो " अश्या धमक्या मिळाल्या आहेत.

शेवटी जेव्हा जबाबदार्‍या संपल्या तेव्हा मी स्वतःशीच झगडा करुन एक निर्णय घेतला की नोकरी करणार नाही आणि ज्यात आनंद आहे तेच काम करेन. नाही मिळाले तर ते गप्प बसीन. परीणाम असा आहे की नोकरी इतके पैसे मी व्यवसायात मिळवतो आणि आनंदी सुध्दा आहे.

कंजूस's picture

18 Apr 2016 - 3:20 pm | कंजूस

चला दोन तीन पुढच्या रांगेतल्या चेल्यांना कळलंय.शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचवाहो दोन टिंब आणि शोमनसाहेब.

राजाभाउ's picture

18 Apr 2016 - 4:39 pm | राजाभाउ

वरील प्रतिसादांवरुन मला समजलेला अर्थ असा कि

तुम्ही करत असलेले काम पुर्ण निष्ठेने, मनापासुन करा मग तुम्हाला त्यातुन आनंद मिळेल आणि तो इतका उच्चः दर्जाचा असेल कि इतर पैसा वगैरे गोष्टी तेव्हड्या महत्वाच्या राहणार नाहीत.

अर्थात याच्याशी सहमत आहे. पण मग हे `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन ' यापेक्षा वेगळे कसे ?

तर्राट जोकर's picture

18 Apr 2016 - 4:43 pm | तर्राट जोकर

जुळवून घेणे आणि समरस होणे ह्यात फरक आहे.

तजो सर दोन्हीतही जुळवून घेणे आलच की हो. म्हणजे मला आवडणारी गोष्ट मला काम म्हणुन मिळाले तर समरसता आपोआपच येणार. पण मला न आवडणारी गोष्ट मला काम म्हणुन मिळाले तर प्रथम जुळवून घेतल पाहीजे मग एकतर मी ते काम करताना सतत तक्रार करत राहिन आणि स्वताला त्रास करुन घेइन किंवा त्या कामात आनंद शोधुन समरस होइन, पण हे सुद्दा एक प्रकारच जुळवून घेणेच झाल नाही का ?

विवेक ठाकूर's picture

18 Apr 2016 - 10:43 pm | विवेक ठाकूर

१. पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं .

तस्मात, काम काय आहे हा मुद्दा गौण आहे. ते `न करण्याचा पर्याय' तुम्हाला उपलब्ध आहे का ? हा मुख्य मुद्दा आहे. आवडीचं काम निवडा, आवडेल तेच करा हे सल्ले फोल आहेत कारण ती ड्रीम सिचुएशन आहे. आणि त्यामुळे ती प्रत्येकाला उपलब्ध होईल असं नाही.

आपण एका सर्वोपयोगी तत्त्वाबद्दल बोलतोयं, मुद्दा नीट बघा, `काम न करण्याचा विकल्प'! फोकस काम न करण्याच्या विकल्पावर आहे, आवडीच्या किंवा न आवडीच्या कामावर नाही. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं अर्थ काढलात तर फोकस बदलेल. तो स्वतःवर राहाणार नाही, कामावर शिफ्ट होईल.

मग तुमचा कोअर पॉइंटच हुकेल. काम कायम न्यूट्रल आहे. तुम्ही तुमची आवड-निवडमधे आणली तर पुन्हा मनाच्या चकव्यात सापडाल. मनाची एकसंधता हरवेल.

तस्मात, आहे त्या कामाशी जुळवा ही तडजोड व्यर्थ आहे. काम कोणतंही असो, त्यानं काहीएक फरक पडत नाही. ते सुरु करण्यापूर्वी तुमच्याकडे `न करण्याचा पर्याय' प्रामाणिकपणे उपलब्ध हवा.

आणि हा पर्यायच लाजवाब आहे, तो मनाला पराभूत करतो. तुम्ही प्राथमिक आणि काम दुय्यम होतं. आणि त्या पर्याचा परिणाम म्हणजे जे आहे ते काम स्वच्छंद होतं. तुम्ही जेंव्हा ते करता तेंव्हा त्यात समरस होता. तुमची सर्जनशीलता जागरुत होते. त्या कामत तुम्हाला आनंद मिळतो. ते काम उत्तम होतं !

काम न करण्याचा पर्याय प्रामाणीकपणे उपलब्ध असणे हा नशीबाचा भाग म्हणावा काय ? आज माझी सेल्स ऑर्डर पूर्ण झाली नाहि तर एकदम रात्रीचं जेवण मिळणार नाहि असं होणार नाहि (काहि लोकांसाठी खरच अशी परिस्थिती येऊ शकते), पण कुटुंबाच्या आवष्यक खर्चाल कात्री लागेल मात्र (मुलांची फी वगैरे). आता हा आवष्यक खर्चच अनाठायी आहे असं पटवुन घ्यायचं असेल तर प्रश्न वेगळा.
पण काम न करण्याचा ऑप्शन असणं हे नशीब म्हणावं लागेल.

सतिश गावडे's picture

19 Apr 2016 - 10:52 pm | सतिश गावडे

काम न करण्याचा पर्याय प्रामाणीकपणे उपलब्ध असणे हा नशीबाचा भाग म्हणावा काय ?

काम न करण्याचा पर्याय प्रामाणीकपणे उपलब्ध असण्यासाठी एकतर गडगंज श्रीमंत असलेल्या घरात जन्म व्हायला हवा किंवा निवृत्ती नियोजन करून वयाच्या चाळीशीत वगैरे निवृत्त व्हायला हवे. हे दोन्ही पर्याय सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत.

अर्धवटराव's picture

19 Apr 2016 - 10:56 pm | अर्धवटराव

तुम्हाला सुद्धा "मुद्दा कळलाच नाहि" त्यामुळे जास्त काहि प्रतिसाद द्यायची गरज नाहि :)

सतिश गावडे's picture

19 Apr 2016 - 10:59 pm | सतिश गावडे

=))

पैसा's picture

19 Apr 2016 - 11:04 pm | पैसा

नियोजन करून नोकरीतून किंवा व्यवसायातून निवृत्त होता येईल. पण घरच्या कामातून निवृत्त होता येत नाही. त्या कामासाठी पैसे तर मिळत नाहीतच. म्हणजे तो प्रश्न निकालात निघाला. मला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. पण मुलाला आठ वाजता डबा द्यायलाच पाहिजे. स्वयंपाक न करण्याचा काही ऑप्शन माझ्याकडे नाही. कारण तेवढ्यासाठी कोणी स्वयंपाकीण घरात ठेवणे मला अनेक कारणांनी आवडत नाही.

मग आहे ते काम आवडीने करायचे, निदान त्यातला वैताग बाजूला काढायचा हा पर्याय आधीच जुन्या लोकांनी शिकवून ठेवलाय.

निव्वळ पैसे मिळतात म्हणून निर्विकारपणे चाळीस चाळीस वर्षे बंकेची नोकरी सुखदु:ख समे कृत्वा केलेले अनेक महाभाग पाहिलेत. त्यांना काम आवडत नाही म्हणून ते करत नाहीत. पण नोकरीतून त्याना कोणी काढू शकत नाही. अशा नोकर्‍यांमधे तुम्ही फक्त दहा ते पाच फिजिकली प्रेझेंट असले की झाले. या अवस्थेला काय म्हणावे? त्याना काम आवडत नाही पण काम न करण्याचा ऑप्शन ते लोक आधीच वापरत आहेत.

सतिश गावडे's picture

19 Apr 2016 - 11:12 pm | सतिश गावडे

निव्वळ पैसे मिळतात म्हणून निर्विकारपणे चाळीस चाळीस वर्षे बंकेची नोकरी सुखदु:ख समे कृत्वा केलेले अनेक महाभाग पाहिलेत.

आमच्या लाईनची वेगळीच तर्हा आहे. आयटी हमाल स्वतःला एक विशिष्ट उपमा देऊन अंगावर पडेल तितके आणि पडेल ते काम करतात. महिनाअखेरीस पगार मिळाल्याशी मतलब.

भारतीय आयटी कामगार जर काम आणि आनंद यांची सांगड घालू लागले तर अमेरीकेचे वांदे होतील. त्यांना आउटसोर्सिंगसाठी दुसरा देश शोधावा लागेल.

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2016 - 11:06 am | चौथा कोनाडा

हा... हा... हा... !
हा पर्याय भलताच आवडला.
कर्मयोग : ऑप्शन नॉट टू वर्क एण्ड गेटींग सॅलरी !

पैसातै, होवुन जाव दे या वर शेपरेट धागा !
हो ऊ द्या दंगा !

पैसा's picture

21 Apr 2016 - 11:15 am | पैसा

=)) खरंच एक धागा काय, पुस्तक लिहू शकेन! कर्मफलाची अपेक्षा नको. कारण पगार मिळणार हे माहीत आहे. कामही करायला नको. मज्जानु लाईफ! सरकारी बँकामधले काही लोक असतात तसे काही सरकारी बाबू लोक पण असे महान योगी बनलेले असतात.

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2016 - 12:08 pm | चौथा कोनाडा

:-)))

ते खरेच महान "कर्म"योगी आहेत.

अश्या घाउक कर्मयोगान्मुळे कित्येक सरकारी संस्था / खासगी कारखाने मोडुन गेले. गलथान पणा मुळे कार्यक्षमतेची वाट लागली. अन या उलट जागतिकीकरणा नंतर तरुण पिढीच्या समोर कॉंट्रॅक्ट रुपी राक्षस उभा राहिला. तासा वर मोजुन काम करावे लागते.
ही विषमता पाहण्याचा असला "कर्म"योग आपल्या नशिबी आलाय.
विठासाहेबानी हेच प्रबोधन आधी केले असते तर आपला भारत देश 2020 ऐवजी 2002 मध्येचमहासत्ता झाला असता.

काम करण्याचे कंप्लशन नसुन ते ऐछिक असेल तर ते सृजनात्मक होइल आणि तुम्ही म्हणता तसे ते लाजवाब असेल हे तर मान्य पण असे काम न करण्याचा विकल्प उपलब्ध प्रामाणिक पणे उपलब्ध असणे ही सुद्धा 'ड्रीम सिचुएशन' नाही का ? ती प्रत्येकाला उपलब्ध कशी उपलब्ध होईल ? तसेच मी काम न करण्याचा विकल्प वापरणे म्हणजे माझ्या कामावर अवलंबुन असणार्या बरोबर कुठलीही कमीटमेंट नसण असे नाही का ? हे फार तर एखाद्या कलाकाराला लागु पडेल कारण कला निर्मीती हि नेहमीच सृजनात्मक असती आणि ती ऐछिक असेल तरच ती चांगली होइल

पण सामान्य माणसांनी हे रोजच्या कामात कसे अवलंबायचे ह्यावर जरा प्रकाश टाकालात तर बरे होइल

विवेक ठाकूर's picture

19 Apr 2016 - 3:02 pm | विवेक ठाकूर

पण सामान्य माणसांनी हे रोजच्या कामात कसे अवलंबायचे ह्यावर जरा प्रकाश टाकालात तर बरे होइल

सामान्य आणि विशेष ही काल्पनिक विभागणी प्रथम मनातून काढून टाकायला हवी.

काम न करण्याचा विकल्प म्हणजे काम न करणं असा अर्थ घेतला जातोयं त्यामुळे गैरसमज होतोयं. तो विकल्प म्हणजे आपण प्राथमिक आहोत आणि काम दुय्यम आहे ही वस्तुस्थिती स्वीकारण्याचा आवकाश आहे. त्या वस्तुस्थितीचं विस्मरण कामाला अवाजवी महत्त्व निर्माण करतं.

रोजच्या आणि प्रत्येक कामाला हेच तत्त्व लागू आहे. एकदा ही खूणगाठ बांधली की पुढचं सगळं सोपं आहे. मग ओशो म्हणतात तसं समझ आचरणमे बदल जाती है !

राजाभाउ's picture

20 Apr 2016 - 10:27 am | राजाभाउ

ओके. थोडं थोडं समजतय. "आपण प्राथमिक आहोत आणि काम दुय्यम आहे" म्हणजे मी जे काम करतोय ते माझी इच्छा आहे म्हणुन करतोय, उद्या वाटले तर थांबवु शकेतो किंवा वेगळे काम करु शकतो असा ठाम विश्वास वाटणे. पण असा केवळ पोकळ विश्वास वाटुन उपयोग नाही तर प्रयत्नांनी असा पर्याय निर्माण केला पाहीजे. अर्थात हे सर्व करताना इतर काही गोष्टींवर परिणाम होउ शकतो म्हणजे पैसे कमी मिळणे, कुटुंबात अडचणी वगैरे होतीलही कदाचीत पण याची तयारी असेल तर आज काम करताना आनंद मिळेल.

अर्थात छोट्या छोट्या गोष्टी /कामां बाबत ती थांबवली तर काय आणिबाणीची परिस्थिती निर्माण होणार नसते, तेंव्हा या तत्वाप्रमाणे त्या कामातील आनंद मिळवणे तुलनेने सोपे असेल.

'If you love what you do, you won't have to work for a day in your life.'

तुम्ही जे काम करता त्यात तुम्हाला आनंद असेल, तर तुम्ही त्या कामाकडे कम्पलशन म्हणून नाही तर आनंदाचे साधन म्हणून पाहू शकता आणि ते मनापासून एन्जॉय करत पूर्ण करू शकता.

अर्थात बरेचदा असं असू शकतं की तुम्ही जिथे काम करता, तेथील तुमचे काम ही तुम्हाला आनंद देणारी एकमेव गोष्ट असते, बाकी सगळा उजेड असतो. अशावेळेस परिस्थिती कॉम्प्लीकेटेड होऊ शकते आणि तुम्ही त्या कामाविषयी, ऑफिसविषयी आणि इन जनरलही डीमॉरलाईझ होऊ शकता.

कामातील समाधान, आनंद आणि इतर बाह्य गोष्टीही जेव्हा एखाद्याला सर्वार्थाने अनुरूप अशा मिळतील तेव्हा तो माणूस खर्‍या अर्थाने सुदैवी म्हणावा लागेल.

कामातील समाधान, आनंद आणि इतर बाह्य गोष्टीही जेव्हा एखाद्याला सर्वार्थाने अनुरूप अशा मिळतील तेव्हा तो माणूस खर्‍या अर्थाने सुदैवी म्हणावा लागेल.

ही ड्रीम सिच्युएशन आहे आणि खरं तर समोर आहे ते काम नाकारण्यासाठी मनानं केलेली ती चलाखी आहे.

लेखाचा आशय या प्रतिसादात पुन्हा विस्तारनं उधृत केला आहे.

नीलमोहर's picture

19 Apr 2016 - 11:47 am | नीलमोहर

काम नाकारायचे नाहीच आहे, उलट एखाद्या कंपनीत वाईट बॉस, ढिसाळ कारभार, नकोसे सहकारी इ.गोष्टींकडे दुर्लक्ष करून टिकून राहण्यामागे काम हा एकमेव प्लस पॉइंट आहे, असेही होऊ शकते.

तुम्ही लेखात म्हणताय ती 'ऑप्शन नॉट टू वर्क' ही खरे तर ड्रीम सिच्युएशन आहे जी आयडियल आहे परंतु प्रत्येकास अवलंबिणे शक्य होईलच असे नाही. मग त्यात पुढचे प्लॅनिंग, स्वतः+फॅमिलीसाठी आर्थिक स्थैर्य कायम राहिल याची सोय करून ठेवणे इ. अनेक प्रश्न येतील.

तुम्ही लेखात म्हणताय ती 'ऑप्शन नॉट टू वर्क' ही खरे तर ड्रीम सिच्युएशन आहे

हा प्रतिसाद पाहा

काम नाकारायचे नाहीच आहे, उलट एखाद्या कंपनीत वाईट बॉस, ढिसाळ कारभार, नकोसे सहकारी इ.गोष्टींकडे दुर्लक्ष करून टिकून राहण्यामागे काम हा एकमेव प्लस पॉइंट आहे, असेही होऊ शकते.

काम टिकवण्याचा प्रश्न नाही, `ऑप्शन नॉट टू वर्क' जीवनात आणण्याचा आहे.

अद्द्या's picture

18 Apr 2016 - 5:26 pm | अद्द्या

एकुणात काय ,
काम नसलं कि असलं काही सुचायला लागतं ,
आनंद है , आनंद हि आनंद है

मराठी कथालेखक's picture

18 Apr 2016 - 6:13 pm | मराठी कथालेखक

:)

चित्रगुप्त's picture

18 Apr 2016 - 9:22 pm | चित्रगुप्त

लेख आवडला. गेली अनेक वर्षे काहीही न करण्याचा पर्याय उपलब्ध असूनही मी नाना उद्योग करत आलेलो आहे, त्यामुळे लेख भावला. अर्थात अश्या प्रकारे काम करण्यात नेहमीच निखळ आनंद असत नाही. मनासारखे काम न जमणे, करताना काहीही सुचेनासे होणे यातून तात्कालीन अस्वस्थता उद्भवते, परंतु सरतेशेवटी सर्व सुरळीत झाले, की मग मात्र त्या अडचणीही आवश्यकच होत्या, याची प्रचिती येते, कारण अश्या अडचणीतूनच नवीन दिशा सापडत असते.

सुबोध खरे's picture

19 Apr 2016 - 11:26 am | सुबोध खरे

कर्मयोग वगैरे काही कळत नाही.
परंतु मी जेंव्हा कॉर्पोरेट रुग्णालयातील मोठी नोकरी सोडून माझा स्वतःचा व्यवसाय सुरु केला त्याला एक वर्ष झाल्यावर मितरणे विचारले कि त्यात आणि यात फरक काय? त्यावर मी त्याला म्हणालो कि काम मी तेच करतो आहे पण आता मला MONDAY MORNING BLUE नाहीये. किंवा रविवारी संध्याकाळी येणारी उदासीनता अजिबात नाही.
कुणीही माझ्या डोक्यावर बसलेला नाही कि एवढे काम केलेच पाहिजे. जेवढे रुग्ण येतील तितके चांगले तेवढे पैसे मिळतात. आणी नसले तर शेजारीच बायकोचा दवाखाना आहे तेथे तिच्याबरोबर गप्पा मारा कॉफी प्या किंवा स्वतःच्या दवाखान्यात बसून मिपावर प्रतिसाद लिहा. जे मी आताही करतो आहे.
शिवाय कॉम्पुटर माझाच,विजेचे आणी जालाचे बिल मीच भरतो त्यामुळे कार्यालयीन काळात जालावर आलो हि टोचणी( जी काही जणांना आहे) तीही नाही.
शिवाय अमुक वयाला निवृत्त असेही नाही. जोवर हातपाय चालत आहेत तोवर काम करता येईल. नको तेंव्हा बंद हि करता येईल.
याला दि ऑप्शन नॉट टू वर्क म्हणता येईल का?

विवेक ठाकूर's picture

19 Apr 2016 - 12:28 pm | विवेक ठाकूर

त्यावर मी त्याला म्हणालो कि काम मी तेच करतो आहे पण आता मला MONDAY MORNING BLUE नाहीये. किंवा रविवारी संध्याकाळी येणारी उदासीनता अजिबात नाही.

करेक्ट !

हाच ऑप्शन कोणत्याही कामात आणता येतो. मग ती नोकरी असो की स्वतःचा व्यावसाय. कारण स्वतःचा व्यावसाय सुद्धा बहुतेक सर्वजण बळजबरी म्हणून करतांना दिसतात. थोडक्यात, आधी एक बॉस होता, आता क्लायंटच्या रुपात अनेक बॉस निर्माण होतात. मग ऑप्शन नॉट टू वर्क हरवून जातो. काम आणि पैसा प्राथमिक होऊन आपण दुय्यम होतो.

कुणीही माझ्या डोक्यावर बसलेला नाही कि एवढे काम केलेच पाहिजे. जेवढे रुग्ण येतील तितके चांगले तेवढे पैसे मिळतात. आणी नसले तर शेजारीच बायकोचा दवाखाना आहे तेथे तिच्याबरोबर गप्पा मारा कॉफी प्या किंवा स्वतःच्या दवाखान्यात बसून मिपावर प्रतिसाद लिहा. जे मी आताही करतो आहे.

हेच मी लेखात सांगतोयं !

शिवाय अमुक वयाला निवृत्त असेही नाही. जोवर हातपाय चालत आहेत तोवर काम करता येईल. नको तेंव्हा बंद हि करता येईल.

परफेक्ट ! काम बंद करण्याचा प्रश्नच नाही. कारण जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण काम करुच, पण त्याचं कोणतंही दडपण नाही.

याला दि ऑप्शन नॉट टू वर्क म्हणता येईल का?

मी लेख अनुभवातून शब्दबद्ध केलायं. तुम्ही अनुभव प्रतिसादातून शब्दबद्ध केलायं.

अप्पा जोगळेकर's picture

19 Apr 2016 - 1:32 pm | अप्पा जोगळेकर

कारण स्वतःचा व्यावसाय सुद्धा बहुतेक सर्वजण बळजबरी म्हणून करतांना दिसतात. थोडक्यात, आधी एक बॉस होता, आता क्लायंटच्या रुपात अनेक बॉस निर्माण होतात. मग ऑप्शन नॉट टू वर्क हरवून जातो. काम आणि पैसा प्राथमिक होऊन आपण दुय्यम होतो.
साहेब. हे जनरलायझेशन सोडून द्या. बहुतेक सर्व जण म्हणजे किती टक्के ? याचा काही विदा आहे का ?
इतर लोक बळजबरीने काम करतात, इतरांना रविवारी संध्याकाळी उदासीनता येते हे तुम्ही कसे ठरवले ?
संपूर्ण लिखाणात आणि प्रतिसादांमधे पब्लिक अमुक ढमुक आहे, ते यंव पद्धतीने काम करतात, त्यांना कामातून आनंद मिळत नाही असा तुच्छतावादी सूर आहे. लखू रिसबूड सारखा.

मी लेख अनुभवातून शब्दबद्ध केलायं.

दारु पिउन शब्दबद्ध केल्यासारखा वाटत आहे.

विवेक ठाकूर's picture

19 Apr 2016 - 2:47 pm | विवेक ठाकूर

असं नीलकांतनी सांगितलंय !

विवेकपटाईत's picture

18 Apr 2016 - 9:22 pm | विवेकपटाईत

कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ;
वेतन आयोग म्हणजे काय, माझ्या चार ओळी
चातक को मेघों की आस
बाबू को पे कमीशन की बाट
गरजा मेघ न बरसा पानी
आई रिपोर्ट न मिली चवन्नी
तरीही निष्काम भावनेने काम करतोच बाबू

मृत्युन्जय's picture

19 Apr 2016 - 11:30 am | मृत्युन्जय

लेख झेपला नाही. पुर्वी संक्षींचे लेख झेपायचे नाहित आता विठांचे झेपत नाहित. वैचारिक बैठक वाढवायची गरज आहे असे दिसते.

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 11:34 am | तर्राट जोकर

असे आडवे करणारे लेख असल्यावर बैठक कशी काय जमणार बुवा ;) =))

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2016 - 11:58 am | चौथा कोनाडा

:-)))

तजो, भारी सिक्सर !

मृत्युन्जय's picture

19 Apr 2016 - 12:18 pm | मृत्युन्जय

हाहाहा, खरे आह्हे

देशपांडे विनायक's picture

19 Apr 2016 - 12:41 pm | देशपांडे विनायक

फक्त इतकेच असते तर ----गोंधळ /समजणे वाढेल का कमी होईल !!

कामाच्या बाबतीत एक सार्वत्रिक गैरसमज असाये की मनाजोगतं काम नाही त्यामुळे मजा येत नाही . या गैरसमजामुळे फार मोठा अनर्थ ओढवला आहे. पण काम तर सर्वस्वी न्यूट्रल आहे. ते पूर्णपणे व्यक्ती निरपेक्ष आहे. त्यामुळे कामाच्याबाबतीत, ते करणार्‍याचा दृष्टीकोनच कायम निर्णायक आहे .
थोडक्यात , एकदा का मनानं ठरवलंकी आपण करत असलेल्या कामात काही मजा नाही की जीवनाचा बाजा वाजलाच म्हणून समजा . मग त्या कामात व्यतीत केलेला वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा, फारसा आनंद देऊ शकत नाहीत .

बर्‍याच सायकॅट्रीस्टसनी यावर `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन '( किंवा वेल अॅडजस्टेड पर्सनॅलिटी ) हा एकमेव नामी पर्याय शोधला आहे . थोडक्यात , ` आहे त्याच्याशी विनातक्रार जुळवून घ्या , सुखी व्हाल', असा मनाला गप्प करण्याचा उपाय सुचवला आहे

लोक मग ` रिटायरमंट नंतर मजा करू ' अशी मनाची समजूत काढून, स्वतःला नेटानं कामाला जुंपून घेतात . सुट्टीच्या दिवशी जमेल आणि झेपेल तेवढी मजा करतात . सोमवारची नकोनकोशी आठवण मनाला पुढची काही तरी स्वप्न दाखवत सुसह्य करतात.

या विचारसरणीमुळे कामाला गौरव प्राप्त होणं तर दूरच, पैशाला अवाजवी महत्व मिळालंय.

तर काय असेल कामाच्या आनंदाचं रहस्य ?

मुळात कार्य हा अस्तित्वाचा छंद आहे , कंपलशन नाही.

ज्या वेळी काम कंपलशन म्हणून केलं जातं त्यावेळी आपण अस्तित्वापासून वेगळे झाल्यासारखे वाटतो. आपली समग्रता हरवते. आपली सृजनात्मकता लयाला जाते. केवळ फलप्राप्तीच्या आशेनं आपण कामाचं ओझं वाहातो आणि त्यातून कालनिर्मिती होते. हा काल दुहेरी असतो, एकीकडे तो कालावधी संपण्याची इच्छा निर्माण करतो आणि दुसरीकडे काम वेळेत संपवण्याचं टेंशन तयार करतो .

कार्य म्हणजे छंद समजणारी चित्तदशा असलेल्या काम करणार्‍या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं.

मग एकूण लेख पुन्हा शांतपणे वाचला तर समजणार नाही का? कारण सर्व अनुषंगिक विचारांची लेखात एक सुसंगत आणि सविस्तर मांडणी केली आहे.

राघव's picture

19 Apr 2016 - 9:07 pm | राघव

तुम्ही म्हणता आहात त्यात तथ्य आहे.
अगदीच पैशाची निकड नसली तर असा प्रयोग करून बघायला हरकत नाही म्हणा.

काही अनुभवांनी आलेलं शहाणपणः
- जे [काही] काम आपण पोटापाण्यासाठी करतोय ते आवडो वा न आवडो, ते सोडून दुसरं काही करायला खरोखर कधी कुणी आपल्याला रोखू शकतं, स्वतःशिवाय? नाही. मग असा पर्याय असतांना आपण हेच काम जर करत असू तर आपल्याला काही तक्रार करायची जागा उरते? नाही.
नवरा-बायकोच्या भांडणांसारखा हा प्रकार आहे. गुंता जास्त सोडवण्याचा प्रयत्न करत बसण्यात अर्थ नसतो, तो अधिक गुंतत जातो. पुरेसा वेळ दिला की बर्‍याचवेळा मुळात गुंता नव्हताच असं समजून येतं.
याला मी अ‍ॅडजस्टमेंट म्हणत नाही. न मजबूरी. कारण त्यातून आपल्याला शेवटी दृष्यरूपानं काही न काही फायदा होतोच.
हा सरळ सरळ देवाण-घेवाणीचा मामला आहे.

- जे काही काम आपल्याला मनापासून आवडतं, आनंद देतं, ते करायला खरोखर कधी कुणी आपल्याला रोखू शकतं, स्वतःशिवाय? नाही. मग त्यासाठी जर आपण पुरेसा वेळ काढू शकत नसू तर तो मूळ अडचणीचा मुद्दा झाला, पोटापाण्याचा उद्योग हा मूळ अडचणीचा मुद्दा नाही. तेवढं सोडवलं की काम फत्ते.

- अडचणींवर विचार करत बसलो तर फक्त अडचणीच दिसत राहतात. त्यांना सोडवण्याच्या पर्यायांवर विचार केला तर जगणं बरंच सुखकर होत जातं.

- जसं केवळ एकाच गोष्टीनं दु:ख होत नाही, अनेक गोष्टींनी होऊ शकतं.. तसंच सुखाचंही आहे. मुळात आपण नक्की काय शोधतोय ते महत्त्वाचं - सुख, प्रेम की आनंद. एकात दुसरं गुंतलंय असं वाटेल वरवर.. पण थोडा विचार केला तर गहन होत जातं.

असो. बरंच पाल्हाळ लागलं.
राघव

विवेक ठाकूर's picture

19 Apr 2016 - 10:38 pm | विवेक ठाकूर

प्रश्न वरकरणी पैशाशी निगडीत वाटला तरी तो तसा नाही कारण नक्की किती पैसा पुरेसा आहे हे ठरवणं मुश्कील आहे . तस्मात , आहे त्या कामात आणि सांप्रत आर्थिक स्थितीत कुणीही जर सांगितलेला विकल्प उपलब्ध करू शकला तर त्याला कामाची मजा हमखास येईल हे नक्की !

प्रश्न पैशाशी निगडीत आहे असं मी म्हणत नाहीये. एखाद्याची प्रासंगिक प्राथमिकता आनंद नसून पैसा असेल तर त्या व्यक्तीसाठी हा विचार तात्पुरता बाजूला ठेवल्याबद्दल मी म्हणत होतो. आधी पोटोबा मग विठोबा.. तसं.

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 11:27 pm | तर्राट जोकर

लोकांना खरंच मुद्दा कळलेला नाही. घोर निराशा.

सोपंय हो. संभाजी विडीला क्युबन सिगार समजून प्यायचंय. ;-)
फुंकणे शाश्वत. धूराचा अवकाश. फिर विडी क्या सिगार क्या.

लोकांना वाटतंय ते विडीच पिऊ नये असं म्हणतायत.

चौथा कोनाडा's picture

20 Apr 2016 - 10:18 am | चौथा कोनाडा

ये लगा और एक सिक्सर ...... .... .... तजो क !

तजो, लैच फॉरमात हायसा !

:-)))))

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2016 - 10:37 am | अत्रुप्त आत्मा

@

संभाजी विडीला क्युबन सिगार समजून प्यायचंय. ;-)
फुंकणे शाश्वत. धूराचा अवकाश. फिर विडी क्या सिगार क्या.

>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif बाजार उठला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

अजया's picture

20 Apr 2016 - 12:07 pm | अजया

=))))

पण तो पहिल्या प्रतिसादातल्या, तुमच्या स्वतःच्याच अनुभवाशी विसंगत आहे.

कालच एक २०-२२ वर्षांचा उमदा तरुण भेटला. आपली ओळख देतांना बोलला मी ड्रायवर आहे आणि मला माझ्या कामाची कसलीही लाज वाटत नाही.

त्याच्या बॉसनेही अपरोक्ष त्याचे अनेक गुण सांगितले, उदा. सीटबेल्ट लावणे, गाडी सोडून कुठेही न जाणे, थोडक्यात इतर ड्रायवर जे अवगुण करतात त्यापेक्षा वेगळा आहे म्हणून.

त्याचे काम हेच त्याची मजा आहे आणी ते तो पुरेपुर उपभोगतो.

हे इतकं सही लिहीलंय की मुद्दा तुम्हाला नक्कीच कळला आहे. पण तो आयुष्यात उतरवता येत नाही या उद्विग्नतेतून, आता चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न होतोयं.

तर्राट जोकर's picture

20 Apr 2016 - 12:33 pm | तर्राट जोकर

ओ सर, तुमचा मुद्दा मला पुरेपुर कळलाय हो, ते माझ्या पहिल्याच प्रतिसादात टंकलंय. हा प्रतिसाद फक्त ज्यांना अजुनही समजलं नाय त्यांच्यासाठी विनोदनिर्मितीचा प्रयत्न होता.

चर्चा भरकटवण्यात माझा नक्कीच सहभाग नाही. टेक इट लाइटली. प्लीज.