पैसा , वेळ आणि काम ही दैनंदिन टेंशनची तीन प्रमुख कारणं आहेत . काहीही आणि कितीही साधना केली तरी हे तीन प्रश्न सोडवल्याशिवाय जीवनात स्वास्थ येणं असंभव . आपल्या प्रत्येक दिवसाचा सगळा प्राईम टाईम याच तीन गोष्टींवर व्यतीत होत असतो . तस्मात , या तीन आयामात मजा आली तर जगण्यात आपसूक मजा येते .
या तीन डायमेंन्शसपैकी काम सेंट्रल आहे कारण वेळ आणि पैसा त्याच्याशी निगडित आहेत . थोडक्यात काम नसेल ( उदा . रविवार ) तर वेळ आणि पैसा दुय्यम ठरतात . आणि त्याही पुढे जाऊन काम आनंदाचं झालं तर वेळ आणि पैसा बहुतांशी परिणाम शून्य होतात .
कामाच्या बाबतीत एक सार्वत्रिक गैरसमज असाये की मनाजोगतं काम नाही त्यामुळे मजा येत नाही . या गैरसमजामुळे फार मोठा अनर्थ ओढवला आहे. कारण हे म्हणजे, पत्नी मनासारखी नाही त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख नाही म्हणण्यासारखं आहे . त्यात पत्नी निदान व्यक्ती तरी आहे त्यामुळे तिच्याबाबतीत काही प्रमाणात कलह संभव आणि स्वाभाविक आहे . पण काम तर सर्वस्वी न्यूट्रल आहे. ते पूर्णपणे व्यक्ती निरपेक्ष आहे. त्यामुळे कामाच्याबाबतीत, ते करणार्याचा दृष्टीकोनच कायम निर्णायक आहे .
थोडक्यात , एकदा का मनानं ठरवलंकी आपण करत असलेल्या कामात काही मजा नाही की जीवनाचा बाजा वाजलाच म्हणून समजा . मग त्या कामात व्यतीत केलेला वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा, फारसा आनंद देऊ शकत नाहीत .
तर सांगायची गोष्ट अशी की मनाजोगतं काम ही आयुष्यात मनासारखी पत्नी मिळण्यासारखी दुर्लभ घटना आहे .
बर्याच सायकॅट्रीस्टसनी यावर `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन '( किंवा वेल अॅडजस्टेड पर्सनॅलिटी ) हा एकमेव नामी पर्याय शोधला आहे . थोडक्यात , ` आहे त्याच्याशी विनातक्रार जुळवून घ्या , सुखी व्हाल', असा मनाला गप्प करण्याचा उपाय सुचवला आहे. आणि जगातल्या बहुतेक सर्व सो कॉल्ड हॅपी दिसणार्यांनी तोच आचरणात आणलेला दिसतो .
असे लोक मग ` रिटायरमंट नंतर मजा करू ' अशी मनाची समजूत काढून, स्वतःला नेटानं कामाला जुंपून घेतात . सुट्टीच्या दिवशी जमेल आणि झेपेल तेवढी मजा करतात . सोमवारची नकोनकोशी आठवण मनाला पुढची काही तरी स्वप्न दाखवत सुसह्य करतात. ही झाली कर्मयोगाची सायकिक ट्रिटमेंट .
आध्यात्मिक ट्रिटमेंट तर त्याहून भारी आहे आणि अर्थात असायलाच हवी !
आध्यात्मात `निष्काम कर्मयोग' किंवा ` फलापेक्षारहित कर्मयोग ' सांगितला जातो . थोडक्यात , पैशाकडे न बघता निव्वळ कामाचा आनंद घ्या हा तो राजमार्ग ! पण हा प्रकार जितका जोरात राबवाल तितका मानसिक दुफळी निर्माण करतो . कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ; पब्लिक सकाळी उठल्यापासून कामाचा गाडा ओढत असतं. त्यात आता ` कोणतीही अपेक्षा न करता' ही सगळी झकमारी करायची म्हणजे अवघड होऊन बसतं .
या कर्मयोगी विचारसरणीमुळे कामाला गौरव प्राप्त होणं तर दूरच, पैशाला अवाजवी महत्व मिळालंय. म्हणजे सरकारी कामात बेतहाशा भ्रष्टाचार आणि प्रायवेट सेक्टरमधे जीवघेणी स्पर्धा . सरकारी कार्यालयातला माणूस निब्बर झालायं आणि खाजगी क्षेत्रातला निव्वळ यंत्रवत काम करतोयं. कामाची मजा म्हणावी तर इकडेही नाही आणि तिकडेही नाही .
तर काय असेल कामाच्या आनंदाचं रहस्य ?
पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं .
दुसरी गोष्ट, या `ऑप्शन नॉट टू वर्क' मधे कामाची कंटीन्यूटी आणि सृजनात्मकता दोन्हीही अंतर्निहित आहेत . असा विकल्प असेल तर काम किती आनंदाचं होईल याची तुम्ही कल्पना करू शकता.
आणि तिसरी गोष्ट, अशा कामात मग वेळ आणि पैसा दोन्ही दुय्यम होतात . कामाची ऐच्छिकताच, कामाचा इतका आनंद देऊन जाते की फलप्राप्ती बोनस ठरते. आणि जिथे आनंद आहे तिथे तणाव अशक्य आहे.
काय आधार आहे या विचारामागे ? तर मुळात कार्य हा अस्तित्वाचा छंद आहे , कंपलशन नाही.
ज्या वेळी काम कंपलशन म्हणून केलं जातं त्यावेळी आपण अस्तित्वापासून वेगळे झाल्यासारखे वाटतो. आपली समग्रता हरवते. आपली सृजनात्मकता लयाला जाते. केवळ फलप्राप्तीच्या आशेनं आपण कामाचं ओझं वाहातो आणि त्यातून कालनिर्मिती होते. हा काल दुहेरी असतो, एकीकडे तो कालावधी संपण्याची इच्छा निर्माण करतो आणि दुसरीकडे काम वेळेत संपवण्याचं टेंशन तयार करतो .
या विकल्पाचा दुसरा पैलू तर त्याहूनही थोर आहे . अशा चित्तदशेत काम करणार्या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत ..... आणि हा `ऑप्शन नॉट टू वर्क' आपल्याला कायमच उपलब्ध होता! तुमचं कामच तुमचा छंद होतं, मग ते कुठलही काम असो. कामाच्या आनंदामुळे फलाशा दुय्यम होते आणि वेळेचं मनानं निर्माण केलेलं ओझं दूर होतं.
प्रतिक्रिया
20 Apr 2016 - 2:01 pm | विवेक ठाकूर
तुमचा मुद्दा मला पुरेपुर कळलाय हो. ते माझ्या पहिल्याच प्रतिसादात टंकलंय.
म्हणून तर माझा गैरसमज झाला.
हा प्रतिसाद फक्त ज्यांना अजुनही समजलं नाय त्यांच्यासाठी विनोदनिर्मितीचा प्रयत्न होता.
पण अशा `न समजलेल्यांना' बाजार ऊठला वगैरे भ्रम व्हायला लागले ना!
चर्चा भरकटवण्यात माझा नक्कीच सहभाग नाही. टेक इट लाइटली. प्लीज.
धन्यवाद !
20 Apr 2016 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा
काही जणांना लोक आपल्याला 'सिरियसली-घेतात!' ,असा भ्रम का होतो कोण जाणे!?
20 Apr 2016 - 10:01 am | असंका
मा ते सङ्गोस्त्वकर्मणि|
काम न करायचा ऑप्शन आहे. फक्त तो आवडून घेउ नकोस असं भगवंत सांगत असावेत.
20 Apr 2016 - 10:40 am | विवेक ठाकूर
काम न करायचा ऑप्शन आहे. फक्त तो आवडून घेउ नकोस असं भगवंत सांगत असावेत.
काम न करण्याच्या विकल्पाबद्दल श्लोकात काहीएक म्हटलेलं नाही. तस्मात, काम न करण्याचा ऑप्शन आहे असं म्हणता येत नाही. कृष्ण कर्म पराङमुखतेबद्दल सांगतोयं. थोडक्यात, कर्मनिवृत्तीची आसक्ती नको असं श्लोकात म्हटलंय. आणि ते उघड आहे. एकतर कर्म न करण्याची वृत्ती व्यक्तीला आळशी बनवते आणि दुसरी गोष्ट तितकीच ऑबवियस आहे, काम केलंच नाही तर कामाची मजा कशी येणार ?
20 Apr 2016 - 10:48 am | असंका
एखाद्या गोष्टीबद्दल आवड नावड असण्यासाठी मुळात तिचं अस्तित्व मान्य करावं लागतं. काम न करणं ही शक्यता (ऑप्शन) असल्याशिवाय ती गोष्ट आवडून घेउ नकोस असं म्हणताच येणार नाही.
मा- नको
ते- तुझी
सङ्गो: - प्रिती
(मा)अस्तु- - (न) होवो
अकर्मणि- कर्म न करण्यात
20 Apr 2016 - 12:03 pm | विवेक ठाकूर
आणि कृष्ण फलाकांक्षा, फलाकांक्षेच्या हेतूनं प्रेरित कर्म किंवा कर्म पराङमुखता नको असं सांगतोयं. अगदी साधा सरळ अर्थ आहे :
Your right is to work only, But never to its fruits; Let not the fruits of action be thy motive, Nor let thy attachment be to inaction.
काम सुरु करण्यापूर्वी ते न करण्याचा विकल्प असणं याबद्दल तो बोलत नाही. शिवाय तुम्ही प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, कामाच्या आवडी-निवडीबद्दलचा श्लोकात काहीच उल्लेख नाही.
20 Apr 2016 - 1:02 pm | असंका
सर,
फलाकांक्षेच्या हेतूने कर्म पराङ्गमुखता!! ही कल्पना मुळ श्लोकात मला दिसत नाही. माझ्या दृष्टीने श्लोकाच्या दुसर्या ओळीत येणारी दोन्ही वाक्य वेगवेगळी आहेत. फलाकांक्षा नको हे वेगळं वाक्य आहे, आणि अकर्मणि बद्दल आवड बाळगू नकोस हे वेगळं वाक्य आहे. काम न करण्यात फलाकांक्षा असेल, तर तेव्हा काम न करणे म्हणजेच काम करणे होइल.
मुद्दाम वेगळं सांगितलंय कारण, कामावर अधिकार आहे, फळावर नाही तर काम करूच कशाला असं वाटू नये म्हणून.
"काम सुरु करण्यापूर्वी" हे शब्द आपण काही विशेष अर्थाने वापरत आहात असं वाटतंय. कारण असे शब्द श्लोकात नाहीतच. त्यामुळे ही चर्चा कुठे चालली आहे हे मला कळत नाहि आहे.
हे वाक्य थोडें गुंतागुंतीचं झालंय...आपल्याला असं म्हणायचंय का मी प्रतिसादात कामाच्या आवडी निवडीबद्दल जे बोललो ते श्लोकात नाहीये? कारण मुळात श्लोकात काय किंवा भाषांतर करताना मी काय कामाच्या आवडी निवडीबद्दल काहीच बोललेलो नाही.
काम न करण्याच्या शक्यतेच्या आवडून न घेण्याबद्दल श्लोकात मुळातच उल्लेख आहेत, एवढेच मी म्हणलो.
20 Apr 2016 - 1:50 pm | विवेक ठाकूर
काम न करण्याच्या शक्यतेच्या आवडून न घेण्याबद्दल श्लोकात मुळातच उल्लेख आहेत, एवढेच मी म्हणलो.
`काम न करण्याची शक्यता आवडून न घेणं' असा श्लोकाचा कोणत्याही प्रकारे अर्थ होत नाही. श्लोकाचा अर्थ अकर्माप्रती प्रिती, थोडक्यात `काम न करण्यात रस घेऊ नकोस' असा अर्थ आहे.
मा- नको
ते- तुझी
सङ्गो: - प्रिती
(मा)अस्तु- - (न) होवो
अकर्मणि- कर्म न करण्यात.
सरळ अर्थ : तुझी प्रिती कर्म न करण्यात (न) होवो.
अकर्मण्यता किंवा कामचुकारपणा आणि ऑप्शन नॉट टू वर्क यात तुमची गल्लत होतेयं. काम न करण्याप्रती प्रिती आणि स्वतःच्या मर्जीनुसार काम करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत.
20 Apr 2016 - 1:58 pm | असंका
क्लोज लूप...
माझा दुसराच प्रतिसाद याचं उत्तर असेल. शब्द थोडे इकडे तिकडे झाले असतील, अभिप्रेत अर्थ बदलत नाही.
20 Apr 2016 - 2:11 pm | विवेक ठाकूर
काम न करण्याप्रती प्रिती आणि स्वतःच्या मर्जीनुसार काम करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत.
कृष्णाला पहिला अर्थ अभिप्रेत आहे आणि मला दुसरा. त्याचा फोकस अर्जुनाला युद्धप्रवण करण्यावर आहे, माझा कामातून आनंद मिळवण्यावर. हे अँगल्स लक्षात घेतले तर `कर्मण्येवाधीकारस्ते मां फलेषु कदाचन्' आणि दि ऑप्शन नॉट टू वर्क यातला फरक स्पष्ट होईल.
20 Apr 2016 - 1:30 pm | सस्नेह
काल एक इंजिनिअर बेकार भेटला होता. त्याला वरील लेख ऐकवला. तो म्हणाला, 'मिपावर option to any work असं काही आहे का ?...'
21 Apr 2016 - 3:39 pm | चौथा कोनाडा
:-))) मस्त !
आता, काय म्हणायचं या बेकार योगींच्या कर्माला ! :-)))
20 Apr 2016 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले
संक्षी सर , सादर नमस्कार विनंती विशेष !
लेख निवांतपणे वाचला. आवडला !
आमचा सातार्यात एक मित्र आहे , तो माझ्याच वयाचा असला तरीही सातार्यातील अत्यंत सुप्रसिध्द डॉक्टर ऑलरेडी झालेला आहे !! त्याला मी म्हाणालेलो कि मुंबई पुण्यात चल , खोर्याने पैसे ओढशील. त्यावर तो म्हणालेला की कशाला ? मी इथे खुष आहे , नित्यनेमाने ९ तास काम करतो, रोज घरी येवुन आईच्या हातचे जेवण करतो , शनिवार रविवारी तुम्ही आलात की पार्टी करतो , काही टेंशन नाही , बस्स मजा आहे !
माझ्या आकलना नुसार आपण म्हणत आहात तो हा कर्मयोग आहे ! हाच मित्र आजिबात कंटाळा न करता रविवारीही क्लिनिकला जाऊन ९ तास काम करतो अन आम्ही ट्रिपला गोव्याला वगैरे जायचे मनात आणले की आठवडाभर आधीच प्लन करुन दि ऑप्शन नॉट टू वर्क आचरणात आणतो !!
आता तोडे तात्विक बोलु:
आपण वर्क हा शब्द वापरल्याने थोडासा घोळ झाला . काम , कर्म आणि कर्तव्य ह्यात नेहमीच लोकांचा घोळ होतो. स्वामी विवेकानंद काय म्हणाले की एका सच्च्या कर्मयोग्याला कर्तव्य (केलेच पाहिजे असे) असे काहीच नसते ! तो जे काही करत असतो तो ते त्याच्या इच्छेने. काहीही कंपल्शन नाही ! म्हणूनच तो कर्मयोगी ठरतो.
पण हे सर्वसामान्य आयुष्यात , प्रपंचात, घडणे अवघड आहे : प्रपंच आला कि अन्न वस्त्र निवारा ह्यांची सोय करणे भाग आहे , प्रपंचात घर घेणे भाग आहे , घर घेतले की त्याचे कर्ज फेडणे भाग आहे , मग काम ( कर्म नव्हे) करणे भाग आहे . तर एकुणच दि ऑप्शन नॉट टू वर्क सर्वसामान्य आयुष्यात प्रापंचिक जनांना सहसा उपलब्द नसतो ! बहुतांश लोकं कायम गुलामासारखेच काम करत आयुष्य काढत असतात
मग आता ह्याला उपाय काय ?
ह्याचे उत्तर आपणास भगवद्गीता ज्ञानेश्वरी मध्ये सापडते : गीता काय मह्णते की एकदा फलाकांशा सोडली की कर्माशीही आपला संबंध तुटतो !! मनात आलेले काही श्लोक खाली क्वोट करीत आहे
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५ ॥
आपण कर्म करत नाहीच आहोत , आपण केवळ साक्षीस्वरुप आहोत , ही सारी प्रकृतीची सर्कस आहे जी आपण वर्चुअल रीयालीटी ( ऑक्युलस ) लाऊन पहात आहोत , पण ती एतकी खरी वाटत आहे की आपण त्यात पार अडकुन गेलो आहोत
तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निपजती प्रकृतिधर्में ।
तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥
मात्र हे सारे समजणे अवघड आहे , पण एकदा का समष्टी झाली की सारीच व्यामिष्रता लयाला जाईल , एकदा का ही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली की मग आपण मोकळे !!
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२ ॥
आता होणार ते होयेना का | अन जाणार ते जायेना का |
तुटली मनातील आशंका | जन्ममृत्याची |
संसारी पुंडावे चुकले | देवाभक्ता ऐक्य झाले |
मुख्य देवास ओळखले | सत्संगे करुनी || श्रीराम||
ही अशी काहीशी स्थिती आहे ती ! हाच तो कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !!
असो .
आता सरते शेवटी मला ओशोचा एक अप्रतिम व्हिडियो आठवला The Day I Became Enlightened - OSHO
ह्यातील ओशोचे हे वाक्य फार सुरेख आहे -
I became enlightened when I realised , there is nothing to do , there is no where to go, you are already perfect and you are already complete !!
कर्तव्य असे काहीच नाहीये , आपण जे काही करीत आहोत असे आपल्याला वाटत आहे तो केवळ भास आहे , आणि म्हणुनच दि ऑप्शन नॉट टू वर्क हा आपल्या कडे कायमच आहे .... you just have to wake up from this dream !!
चुकभुल देणेघेणे
कळावे.
आपला विनम्र
प्रगो
20 Apr 2016 - 2:27 pm | विवेक ठाकूर
धन्यवाद.
I became enlightened when I realised , there is nothing to do , there is no where to go, you are already perfect and you are already complete !! OSHO
ऑप्शन नॉट टू वर्क ही व्यक्तीत्वाकडून स्थितीकडे जाण्याची प्रोसेस आहे. तो आध्यात्मिक पैलू आहे. त्याविषयी लेखात शेवटी लिहीलंय :
या विकल्पाचा दुसरा पैलू तर त्याहूनही थोर आहे . अशा चित्तदशेत काम करणार्या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत ..... आणि हा `ऑप्शन नॉट टू वर्क' आपल्याला कायमच उपलब्ध होता!
तस्मात, ओशो आणि मी एकच सांगतोयं. ते सिद्धाची अवस्था सांगतायंत, मी त्या अवस्थेला पोहोचण्यासाठी कर्मयोग सांगतोयं. कारण काम (त्याला कर्म म्हणा की कर्तव्य) हे जाणीवेचा रोख खेचणारं सर्वात प्रमुख व्यावधान आहे. आणि जाणीवेचा रोख स्वतःकडे वळणं म्हणजे ध्यान आहे.
20 Apr 2016 - 3:40 pm | प्रसाद गोडबोले
+१०० अगदी शंभर टक्के खरे आहे. पण इथे एक छोटीशी आशंका आहे : बर्याचदा जाणीवेचा रोख स्वतःकडे वळवणं सोप्पं नसतं कारण १. जाणीवाच एतक्या सुक्ष्म असतात कि त्यांचा रोख समजणे हेच आवाक्याबाहेरचे असते आणि २.स्वतःकडे म्हणजे नक्की कोठे हे बर्याच जणांना समजत नाही कारण स्वतः म्हणजे शरीर असा काहीसा समज असतो.
अशा स्थितीत कर्मयोग , राजयोग आणि ज्ञानयोग हे सारेच ( मला) दुष्प्राप्य वाटतात . भक्तीयोग मात्र ह्या सार्यातुन अलगद सोप्पा मार्ग काढतो असे मला वाटते. कर्मयोग कोणत्याही अर्थाने कमी आहे असे मी म्हणत नाही , तो फक्त थोडा क्लेषकर आहे ( असे मला वाटते )
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥
हे आचरणात आणणे जास्त सोप्पे आहे आणि एकदा का मी अकर्ता आहे ह्या भावनेने सारेच कर्म भगवंताला परमात्म्याला अर्पण करायची सवय लागली की भगवंताने म्हणल्याप्रमाणे (ददामि बुधियोगं तं तेन मांमुपयान्ति ते) ज्ञानप्राप्ती होते आणि मग परमात्मा हा दुसरा तिसरा कोणी नसुन आपण स्वतःच आहोत हे अनुभवाला येते. अशा प्रकारे जाणिवांचे रोख खेचणारे , ववधाने निर्माण करणारे कर्म भगवंताचरणी अर्पण करुन आपण मोकळे रहाणे हा जाणिवांचा रोख स्वतःकडे वळवणेचा जास्त सोप्पा मार्ग आहे असे मला वाटते.
असो .
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥
बाकी एकदा का मी अकर्ता आहे हे लक्षात आले की सन्तुष्टो येन केनचित् ही अवस्था अनायासे प्राप्त होतेच् ... ही अवस्था फारच मस्त आहे ह्यात तिळमात्र शंका नाही. :)
मनःपुर्वक धन्यवाद :)
20 Apr 2016 - 3:48 pm | विटेकर
भक्तियोग तुलनेने सोपा आहे असे आपण विधान केले आहे , तसे तर सोपे काहीच नाही , भक्तिमार्गात कमालीची अनन्यता लागते , आणि त्याला गुरुकृपा / संचित असायला हवे .
मी म्हणेन कर्म योग ही सोपाच आहे ! एकदा हे मजचिस्तव जाहले | परि म्या नाही केले || हे कळायला हवे! आणि हे अकर्तेपण येण्यासाठी एकतर " राम कर्ता" हा भाव दृढ व्हायला हवा आणि कर्तेपणाचा अह्ंकार गळून पडायला हवा. म्हणजेच मी करतो ते काम { माझ्यापेक्षाही} महत्वाचे आहे हा भाव यायला हवा, work is worship.
20 Apr 2016 - 9:24 pm | विवेक ठाकूर
यापूर्वीच्या प्रतिसादात तुम्ही म्हटलंय ....
अध्यात्म सोप्या शब्दातही सांगता येते , नव्हे त्यात अवघड आणि शब्दबंबाळ करण्याचे काहीच कारण नाही हे आपल्या प्रतिसादावरुन सपष्ट होत आहे ...
त्यामुळे सोपं करण्याचं तुमचं कौशल्य जाणण्याची फार इच्छा होती, ती पूर्ण केल्याबद्दल आभार!
भक्तिमार्गात कमालीची अनन्यता लागते, आणि त्याला गुरुकृपा / संचित असायला हवे .
सॉलीड! म्हणजे आधी कामानं जीव चाललायं त्यात आता `संचित तपासणं' आणि `गुरुकृपा प्राप्त करणं' हे दोन नवे व्याप आले. अर्थात, तुम्हीच म्हटल्यामुळे तो पर्याय अवघड आहे, तस्मात बाद!
आता कर्मयोगाबद्दल तुम्ही म्हणतायं ...
हे मजचिस्तव जाहले | परि म्या नाही केले || हे कळायला हवे!
ग्रेट ! आणि त्यासाठी निवडलेला हा मार्ग तर त्याहून ग्रेट ....
हे अकर्तेपण येण्यासाठी एकतर " राम-कर्ता" हा भाव दृढ व्हायला हवा आणि कर्तेपणाचा अह्ंकार गळून पडायला हवा.
म्हणजे आधी राम आहे हे मान्य करा. मग तोच काम करतोयं हा भ्रम सघन करा. आणि नंतर अहंकार संपण्याची वाट बघा. त्यात पुन्हा राम हा भक्तीमार्गीयांचा शोध आहे याचं विस्मरण झालेलं दिसतंय. शिवाय तो लोकल आयडॉल आहे याची तुमच्या सारख्या सूज्ञाला कल्पना असेलच.
हा मार्ग तुम्ही अनुसरलायं का? असेल तर `राम कर्ता' हा भाव दृढ व्हायला किती काळ गेला? आणि सद्यस्थितीत अहंकाराची काय परिस्थिती आहे ?
हो आणि हा मार्ग `कर्मयोगाचा' असेल तर तो भक्तीमार्गाला छेदत नाही काय?
21 Apr 2016 - 3:17 pm | विटेकर
श्याप , काहिही कळले नाही ,
जरा वाईच इस्कटून सांगाल का ?
21 Apr 2016 - 4:17 pm | विवेक ठाकूर
कारण प्रश्न सरळ आहेः
हा मार्ग तुम्ही अनुसरलायं का? असेल तर `राम कर्ता' हा भाव दृढ व्हायला किती काळ गेला? आणि सद्यस्थितीत अहंकाराची काय परिस्थिती आहे ?
21 Apr 2016 - 4:30 pm | विटेकर
खरेच काहीही कळत नाही आहे , तुम्ही दोनदा सांगितले तरीही !!
जरा उलगडून सांगाल का ? आणु अहंकार म्हणाल तर फार म्हणजे फारच झाला आहे , काही उपाव आहे का तुमच्याकडे ?
21 Apr 2016 - 4:17 pm | विवेक ठाकूर
कारण प्रश्न सरळ आहेः
हा मार्ग तुम्ही अनुसरलायं का? असेल तर `राम कर्ता' हा भाव दृढ व्हायला किती काळ गेला? आणि सद्यस्थितीत अहंकाराची काय परिस्थिती आहे ?
21 Apr 2016 - 4:30 pm | विटेकर
खरेच काहीही कळत नाही आहे , तुम्ही दोनदा सांगितले तरीही !!
जरा उलगडून सांगाल का ? आणु अहंकार म्हणाल तर फार म्हणजे फारच झाला आहे , काही उपाव आहे का तुमच्याकडे ?
21 Apr 2016 - 1:23 pm | प्रसाद गोडबोले
नमस्कार विटेकर बुवा ,
आपल्या मताचा आदर आहे. पण मला जितके काही आकलन झाले त्यानुसार तर भक्तीयोगच सर्वात सोप्पा आहे. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी किंव्वा नाम घेता उठा उठी वगैरे अभंग आठवतात.
फक्त एकच प्रोब्लेम आहे की लोकं नवविधा भक्तीतल्या सातव्या , दास्यभक्ती च्या पुढे जायलाच तयार नसतात ! लोकांना सख्य आणि आत्मनिवेदन हे अशक्य आहे अशी काही धारणा करुन दास्यात रहाणे सोप्पे वाटते. पण मग त्यांच्यात आणि सेमेटिक धर्मात फरक काय राहिला ? सख्य आणि आत्मनिवेदन जमले नाही तर समर्थ म्हणतात तसे - भोळी भक्ती भोळा भाव कैचा पाविजे देवाधिदेव || किंवा संक्षी म्हणतात तसे - व्यक्ती मुक्त होण्याच्या ऐवजी गुंतण्याची शक्यताच जास्त.' हेच खरे ठरेल !!
अगदी दास्यभक्तीचा आदर्श आपला मारुतीरायाही म्हणाला आहे की - -'देहबुध्द्या तु दासोSहं जीवबुध्द्या त्वदंशकः| आत्मबुध्द्या त्वमेवाहमिति मे निश्चिता मति:|| पण लोकं त्याच्याकडे रीतसर दुर्लक्ष करतात असे आजवर पाहण्यात आलेले आहे.
मागे एका चर्चेत मी एकनाथ महाराजांचा एका अभंगाचा संदर्भ दिला होता तेव्हा आपण म्हणाला होता की " आपण कोण , एकनाथ महाराज कोण , आपली लेव्हल काय त्यांची लेव्हल काय " वगैरे वगैरे !
वस्तुतः आपण आणि एकनाथ महाराज भिन्न नाहीच , भिन्न आहोत असे जे काही वाटते तो संदेह आहे ! आणि संदेह हेचि अज्ञान | नि:शेष तुटला तेचि ज्ञान | नि:संदेहि समान | होय आपैसे ||
आणि त्यापुढे जाऊन राम दुसरा तिसरा कोणी नसुन मीच आहे हा भावही दृढ झाला तरच भक्ती मार्गात यश आहे अन्यथा नव्हे !!
दास्यभक्तीत सारे कर्म देवाला अर्पण करायचा अभ्यास करावा , पुढे सख्य भक्तीत तो आपला मित्रच आहे ह्याचा अभ्यास करावा आणि पुढे आत्मनिवेदनात ज्याला आपण देव देव म्हणतो तो दुसरा तिसरा कोणी नसुन आपणच आहोत असे 'जाणले' की झाले , मग जे काही कर्म कराल ते बंधनकारक नाही ... आणि मग तुमच्याकडे असेल ऑप्शन नॉट टू वर्क !!
( एकदा ही नवमी साधली कि पुढ्चे दशमी चे विसर्जन आणि एकादशीची ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती हे ऑप्शनल आहे ! जिथे कर्माशी संबंध तुटला तो माणुस पुढे काहीही करो त्याला ते बंधनकारक नाही कारण त्या माणसाकडे ऑप्शन आहे काम करण्याचा किंवा न करण्याचा {कारण अॅक्चुअल मध्ये तो काहीच करत नाहीये !!!} -
योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः। यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव ॥19॥ !)
असो. आपल्या मताचा आदर आहेच.
अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व संक्षी सर
कळावे. लोभ असावा
आपला विनम्र
प्रगो
21 Apr 2016 - 2:06 pm | विवेक ठाकूर
की त्यात आवांतर काही नाही.
पहिली गोष्ट, हा मार्ग तुला भावला असेल आणि उपयोगी होत असेल तर तो योग्य आहे. आनंदी माणसाला दु:खी करण्याचा माझा तरी स्वभाव नाही. तस्मात, गो अहेड .
आता माझा स्टँड काय आहे ते लिहीतो.
आत्मनिवेदनात ज्याला आपण देव देव म्हणतो तो दुसरा तिसरा कोणी नसुन आपणच आहोत असे 'जाणले' की झाले , मग जे काही कर्म कराल ते बंधनकारक नाही
सांख्ययोगात किंवा अद्वैतवादात ही सुरुवात आहे. तिथे देवाला स्थानच नाही. जे काय आहे ते तुम्ही, तुमची मानसिकता आणि आकलन आहे. त्यामुळे कामावर असलेला जाणीवेचा रोख स्वतःकडे वळवला की झालं ! म्हणून `दि ऑप्शन नॉट टू वर्क ' हे साहस एकदाच करावं लागतं . त्यात कोणत्याही धारणेचा किंवा मान्यतेचा प्रश्न नाही. हल्लीच्या प्रगत विज्ञानयुगात धारणा अवघड आहे आणि समर्पण तर त्याहून कठीण.
जिथे कर्माशी संबंध तुटला तो माणुस पुढे काहीही करो त्याला ते बंधनकारक नाही कारण त्या माणसाकडे ऑप्शन आहे काम करण्याचा किंवा न करण्याचा {कारण अॅक्चुअल मध्ये तो काहीच करत नाहीये !!!} -
हे एकदम बरोबरे ! कारण काम हे कायम शारिरिक आणि मानसिक पातळीवरच चालू आहे. स्वरुपाला (किंवा आपल्याला) त्याची जाणीव होते पण स्पर्श होत नाही. तस्मात, कर्मबंध किंवा कर्मलेपाचा संबंधच उरत नाही.
21 Apr 2016 - 3:21 pm | विटेकर
न लगे मुक्ति आणि संपदा , संतसंग देई सदा !
तुका म्हणे गर्भवासी , सुखे घालावे आम्हांसी !
22 Apr 2016 - 12:59 pm | प्रसाद गोडबोले
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
...
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
22 Apr 2016 - 1:01 pm | प्रचेतस
दत्त ही एक आधुनिक देवता आहे. तुमच्यासारख्या टनाटनी लोकांनी तिचे ध्यान करणे म्हणजे असोच्च.
22 Apr 2016 - 1:05 pm | स्पा
=)_)
22 Apr 2016 - 5:06 pm | पैसा
मी तर "सबाह्य अभ्यंतरी तू एक दुत्त" वाचते आहे. बुवां, आजचा चहा मिळाला असला तर या! =))
21 Apr 2016 - 4:17 pm | सतिश गावडे
सेकंड करीयरचा कधी मनात विचार आला तर प्रवचनकार किंवा कीर्तनकार या पर्यायांचा अवश्य विचार करा. :)
21 Apr 2016 - 4:27 pm | विटेकर
हा सल्ला नेमका कुणाला दिला आहे ? गल्ली चुकली काय?
21 Apr 2016 - 4:34 pm | सतिश गावडे
हा सल्ला प्रगोजी यांना दिला आहे. गल्ली चुकन्याचे दुष्परीनाम माहीती असल्याने आम्ही सहसा गल्ली चुकवत नाही. :)
21 Apr 2016 - 4:36 pm | विटेकर
इथे काम न करण्याबद्दल चर्चा सुरु आहे , तुम्ही सेकन्ड करियर म्हणून अजून काम करायला सांगताहात !
भारीच !
21 Apr 2016 - 4:55 pm | सतिश गावडे
चर्चा कशाबद्दल आहे हे कळलं असतं मग काय देवा.
21 Apr 2016 - 4:46 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद गावडेसर !
कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क हा ऑप्शन एकदा कळाला की करीयर असे काहीच रहात नाही , सच्च्या कर्मयोग्याला काहीही काम करण्यात आनंद येतो कारण तो काहीच करत नसतो !
एकदा का जाणीवांचा रोख आत स्वतःकडे वळाला की माणुस तिथेच मोकळा झाला , मग करीयर असे काही रहात नाही !
हेंच मराठे परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी ।
योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनु ॥ ५२ ॥
21 Apr 2016 - 5:00 pm | सतिश गावडे
तुम्हाला सल्ला दिला त्याचा बदला घेण्यासाठी चावू नका. ;)
शब्दांना कितीही गोल गोल फिरवलं तरी काम करणं चुकणार नाही. तुम्ही त्यात सुख माना, दु:ख माना किंवा अजून भारदस्त लेबल लावा. :)
21 Apr 2016 - 5:21 pm | प्रसाद गोडबोले
मुद्दा शब्दांना फिरवायचा नसुन मनोवृतीला फिरवायचा आहे. काम करणं चुकणार नाहीच पण जाणीवांचा रोख कामावरुन स्वतःकडे वळवण्यात आला की काम केवळ शारिरिक पातळीवर घडत आहे आणि आपण केवळ साक्षीस्वरुप आहोत हे लक्षात येईल. हाच कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क आहे !
एकदा प्रयत्न तर करुन बघा राव. गाजराची पुंगी , वाजली तर वाजली नाहीतर मोडुन खाल्ली. आणि महत्वाचे म्हणजे आम्ही काय तुमच्याकडुन सुधारित सत्यनारायणाची विचारसरणीची दक्षिणा मागणार नाय =))))
असो ,आपल्या मताचा आदर आहेच :)
21 Apr 2016 - 7:44 pm | विवेक ठाकूर
मुद्दा शब्दांना फिरवायचा नसुन मनोवृतीला फिरवायचा आहे. काम करणं चुकणार नाहीच पण जाणीवांचा रोख कामावरुन स्वतःकडे वळवण्यात आला की काम केवळ शारिरिक पातळीवर घडत आहे आणि आपण केवळ साक्षीस्वरुप आहोत हे लक्षात येईल. हाच कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क आहे !
बरोबर ! यात न समजण्यासारखं काही नाही पण सदस्य मूळ मुद्दा सोडून उगीच चर्चा भरकटवतायंत.
21 Apr 2016 - 6:13 pm | अद्द्या
हे बघा उगीच माझे नाव मध्ये अनु नका ,
तुम्ही आणि गावडे सर काय ते सोडवा आपल्या आपल्यात
20 Apr 2016 - 5:38 pm | विवेक ठाकूर
अशा प्रकारे जाणिवांचे रोख खेचणारे , ववधाने निर्माण करणारे कर्म भगवंताचरणी अर्पण करुन आपण मोकळे रहाणे हा जाणिवांचा रोख स्वतःकडे वळवणेचा जास्त सोप्पा मार्ग आहे असे मला वाटते.
हा मार्ग अनुसरायला भगवंत आहे(च) अशी धारणा प्रथम पक्की करायला लागते. त्यातून पुन्हा कामाची जवाबदारी स्वतःकडे घेण्याची वृत्ती लयाला जाण्याचा धोका आहे. सगळेच भगवंत करतो म्हटल्यावर मोबदल्याच्या बाबतीत संदिग्धता निर्माण होते ती वेगळीच ! तस्मात, व्यक्ती मुक्त होण्याच्या ऐवजी गुंतण्याची शक्यताच जास्त.
भारतात कर्मगौरव लयाला जाण्याचं मुख्य कारण लोकांचा वैचारिक गोंधळ आहे. पाश्चात्य देशात मॉलमधला साधा हेल्प असिस्टंट सुद्धा समरसून काम करतांना दिसतो आणि आपल्याकडला राजपत्रित अधिकारी सुद्धा पैश्यासाठी लाचार दिसतो. तस्मात, .....
सारेच कर्म भगवंताला परमात्म्याला अर्पण करायची सवय लागली की भगवंताने म्हणल्याप्रमाणे (ददामि बुधियोगं तं तेन मांमुपयान्ति ते) ज्ञानप्राप्ती होते आणि मग परमात्मा हा दुसरा तिसरा कोणी नसुन आपण स्वतःच आहोत हे अनुभवाला येते.
इतका उच्च परिणाम साधलेला माझ्या तरी पाहाण्यात नाही. शिवाय मानशास्त्राचा जो काही आभ्यास आहे त्यावरनं, सध्याच्या युगात माणूस `फलकामनामुक्त' काम करण्याची शक्यता शून्य.
थोडक्यात, कर्म भगवंताला अर्पून एखादा निर्धास्त झाला आणि त्याच्या जाणीवेचा रोख कामाकडून स्वतःकडे वळला हे होणं सध्याच्या काळात तरी असंभव आहे. विज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की सर्वांप्रती भगवंत म्हणून पाहात काम करणारा संत व्यावाहारिक जीवनात टिकाव धरु शकणार नाही. मग इतक्या लोच्यात, आपल्या अकर्ता स्थितीची जाणीव होण्याची शक्यता, तर्क कितीही खेचला तरी दृष्टीपथात येत नाही.
20 Apr 2016 - 6:03 pm | तर्राट जोकर
व्वा!!
20 Apr 2016 - 8:45 pm | ईश्वरसर्वसाक्षी
धन्यवाद प्रगो :))
विठा सर माफ करा पण तुमचा लेख प्रगो च्या प्रतिसादा नंतर आता पुर्ण समजला आहे आणि पटला आहे.
20 Apr 2016 - 3:06 pm | विटेकर
विठा उपाख्य संक्षी यांना ओशो -२ असा सन्मान द्यावा असा प्रस्ताव मांडतो , किमानपक्षी त्यांना मिपाचे ओशो हा सन्मान तातडीने द्यावा अशी संपादक मंडळाला इणंती करतो, हानुमोदन देणारे कुणी हाय का ?
20 Apr 2016 - 3:17 pm | तर्राट जोकर
ओशो ला विठा २ म्हणत असाल तर कचकून अनुमोदन. आमचे संक्षी ओशो, बुद्ध, सगळ्या ऐर्यागैर्या संतांची फार धुवुन टाकतात. आहात कुठं?
20 Apr 2016 - 3:10 pm | विटेकर
प्रगो ,
खूपच छान , आवडले ! अध्यात्म सोप्या शब्दातही सांगता येते , नव्हे त्यात अवघड आणि शब्दबंबाळ करण्याचे काहीच कारण नाही हे आपल्या प्रतिसादावरुन सपष्ट होत आहे ...
पण असं सोप्प सोप्प करुन सांगितले तर काहिंचा बाजार उठेल ! हे वागणं बरं नव्ह !
20 Apr 2016 - 3:19 pm | तर्राट जोकर
चला, शंभर निमित्त सगळ्या नासमझ कामकर्या माशांना एक एक क्युबन सिगार देऊन सन्मानित करण्यात येत आहे, तुमच्या योगदानामुळे सेंचुरी शक्य झाली.
20 Apr 2016 - 4:58 pm | अजया
प्रगो, प्रतिसाद आवडला!
20 Apr 2016 - 8:37 pm | वीणा३
तुम्ही म्हणताय तो पर्याय मी चाळीशी-पन्नाशी ला गेल्यावर वापरू शकते, शक्य आहे . जेव्हा माझ्या बऱ्याच आर्थिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतील.
वरती ज्या लोकांनी मान्य केलंय (सुबोध खरे, चित्रगुप्त ) ते लोक सुद्द्धा हा पर्याय आधी २०-२५ वर्ष नोकरी (कदाचित व्यवसाय) केल्यावर मग आनंदाने स्वीकारतात.
जे आत्ता शेक्षणिक कर्ज फेडत आहेत, आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे, नुकताच गृहकर्ज घेत आहेत त्यांना "काम नसणं / काम न करण " हा विकल्प आहे असं मनाशी म्हणणं बरेचदा शक्य नसतं.
तुम्ही आत्ता विचार करून बघा कि कुठल्याही कारणाने तुमची सर्व मिळकत अचानक संपली (घर तुमच्या मालकीचा नाही, एकही रुपया खर्च करायला शिल्लक नाही ), उद्या डॉक्टर कडे जायचं पण पैसे नाहीत, भूक लागलीये पण खिशातले पैसे बघून केळं खाऊन घेताय. आणि मग वरचं लॉजिक लावायचा प्रयत्न करायला जमलं तर बघा.
21 Apr 2016 - 10:23 am | विवेक ठाकूर
तुम्ही म्हणताय तो पर्याय मी चाळीशी-पन्नाशी ला गेल्यावर वापरू शकते, शक्य आहे . जेव्हा माझ्या बऱ्याच आर्थिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतील.
साहसाचं एक तत्व आहे, ते नेहेमी आत्ताच कारावं लागतं. भविष्यकालीन साहसाची खात्री नाही. शिवाय वाढत्या वयाबरोबर साहसी वृत्ती कमी होते. आणि मुख्य म्हणजे काम बहरात असतांनाच त्याची मजा येते.
वरती ज्या लोकांनी मान्य केलंय (सुबोध खरे, चित्रगुप्त ) ते लोक सुद्द्धा हा पर्याय आधी २०-२५ वर्ष नोकरी (कदाचित व्यवसाय) केल्यावर मग आनंदाने स्वीकारतात.
जीवनाच्या उत्तरार्धात त्यांना संधी मिळाली इतकाच त्याचा अर्थ होतो. मी ऐन तारुण्यात साहस केलं आहे.
जे आत्ता शेक्षणिक कर्ज फेडत आहेत, आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे, नुकताच गृहकर्ज घेत आहेत त्यांना "काम नसणं / काम न करण " हा विकल्प आहे असं मनाशी म्हणणं बरेचदा शक्य नसतं.
आर्थिक परिस्थिती आणि द ऑप्शन नॉट टू वर्कचा वरकरणी संबंध वाटतो. पण वर म्हटल्याप्रमाणे साहस वर्तमानात करावं लागतं. आणि साहस करुन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता शून्य कारण आपण काम थांबवत नाही. ते फक्त आपल्या मर्जीनं करतो.
तुम्ही आत्ता विचार करून बघा कि कुठल्याही कारणाने तुमची सर्व मिळकत अचानक संपली (घर तुमच्या मालकीचा नाही, एकही रुपया खर्च करायला शिल्लक नाही ), उद्या डॉक्टर कडे जायचं पण पैसे नाहीत, भूक लागलीये पण खिशातले पैसे बघून केळं खाऊन घेताय. आणि मग वरचं लॉजिक लावायचा प्रयत्न करायला जमलं तर बघा.
मी सर्वस्वी वर्तमानात जगतो. तस्मात, कल्पना आणि भीती कधीच सतावत नाही. थोडक्यात, तुम्ही वर्णन केलेली नेगटिविटी साहसापुढे टिकाव धरत नाही. प्रसंग आला तर त्याला सामोरं जाण्याची क्षमता असली की झालं !
20 Apr 2016 - 9:51 pm | निराकार गाढव
मला वायफळ गप्पा मारण्याचं काम करायला खूप आवडतं. त्यात इतका आणंद होतो म्हणून सांगू...
काय कर्माचा योग दडलेला आहे त्यात बघा:
वायफळ = Why + फळ ?
21 Apr 2016 - 8:13 pm | अनुप ढेरे
गुरुजींचा धागा आणि पट्टशिष्य आलेच! स्वागत!
21 Apr 2016 - 6:15 am | राघव
तुमचा विचार चांगला आहे आणि त्यावरचे मत मी याच धाग्यावर आधीच नोंदवलेले आहे.
पण साधारण चर्चेचा रोख बघता काही गोष्टी विचाराव्याशा वाटतात -
१. लोकांच्या सरळ वा तिरकस प्रतिसादांवर तिरकस प्रतिसाद देण्याची गरज आहे का? मृदु अथवा सौम्य भाषेत स्वत:चा प्रतिसाद देता येणार नाही का?
२. साधनेचे अनेक मार्ग असतात आणि प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे, विचारप्रक्रियेप्रमाणे, अनुभवांप्रमाणे मार्गक्रमण करत असतो. पण धाग्याच्या विषयापासून फारकत घेऊन दुसया मार्गावर कुणी काहीही लिहिले तरी त्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही का?
३. ही चर्चा आहे, तेव्हा त्यातून भांडणे होण्यासाठी हातभार लावण्यापेक्षा, काहीतरी चांगले निष्पन्न निघण्यावर तुम्ही भर देणे हे धागाकर्त्याच्या जबाबदारीतून जास्त योग्य नाही का? अगदीच काही ठोस निष्पन्न निघाले नाही तरीही चांगले ब्रेन स्टॊर्मिंग होणे हेही नसे थोडके?
21 Apr 2016 - 10:42 am | विवेक ठाकूर
१. लोकांच्या सरळ वा तिरकस प्रतिसादांवर तिरकस प्रतिसाद देण्याची गरज आहे का? मृदु अथवा सौम्य भाषेत स्वत:चा प्रतिसाद देता येणार नाही का?
जिथे चर्चा भरकटवण्याचा किंवा बाष्कळ प्रतिसाद देण्याचा प्रयत्न होतो (उदा. वरचा नादान प्रतिसाद), तिथे चर्चा लाईनवर आणण्यासाठी भाषा अणखर केल्याशिवाय इलाज नसतो.
तुमचा इंटनेटवरचा अनुभव असेलच. एकदा धुळवड सुरु झाल्यावर, चांगल्या चाललेल्या चर्चेत सुद्धा कुणीही विधायक बाजू उचलून धरण्याच्या भानगडीत पडत नाही.
२. साधनेचे अनेक मार्ग असतात आणि प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे, विचारप्रक्रियेप्रमाणे, अनुभवांप्रमाणे मार्गक्रमण करत असतो. पण धाग्याच्या विषयापासून फारकत घेऊन दुसया मार्गावर कुणी काहीही लिहिले तरी त्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही का?
भक्तीमार्गावर इथे चर्चा झाली आहे आणि मी माझे मुद्दे मांडलेत. कामाचा आनंद मिळवण्याविषयी इतर कुठलाही मार्ग कुणी सांगितलेला नाही. तसा मुद्दा कुणी मांडला तर त्यावरही विधायक चर्चा होईल.
३. ही चर्चा आहे, तेव्हा त्यातून भांडणे होण्यासाठी हातभार लावण्यापेक्षा, काहीतरी चांगले निष्पन्न निघण्यावर तुम्ही भर देणे हे धागाकर्त्याच्या जबाबदारीतून जास्त योग्य नाही का? अगदीच काही ठोस निष्पन्न निघाले नाही तरीही चांगले ब्रेन स्टॊर्मिंग होणे हेही नसे थोडके?
अर्थात ! पण एक समंजस सदस्य म्हणून असंबद्ध, व्यक्तिगत किंवा निव्वळ बाष्कळ प्रतिसाद देणार्यांना समजावण्याची जवाबदारी तुम्हीही घेऊ शकाल का ?
21 Apr 2016 - 5:46 pm | राघव
ह्म्म. मीही वरचे सगळे वाचल्यावरच हे प्रश्न विचारलेत. त्यामुळं ते सगळं पुन्हा इथे मांडणं अनावश्यक आहे. असो.
पण एक समंजस सदस्य म्हणून असंबद्ध, व्यक्तिगत किंवा निव्वळ बाष्कळ प्रतिसाद देणार्यांना समजावण्याची जवाबदारी तुम्हीही घेऊ शकाल का ?
ही अट नाही असं मी गृहित धरतो. माझ्यापरीनं मला ज्यांना कुणाला सांगावसं वाटतं तसं मी सांगतोच. पण मुळातच तिरकस प्रतिसाद कमी झालेत तर बर्याच अनावश्यक गोष्टी टळतात हे मी अनुभवानं नमूद करू इच्छितो. बाकी आपण सूज्ञ आहातच.
21 Apr 2016 - 2:40 pm | शाम भागवत
ऑप्शन नॉट टू वर्क सारखे ऑप्शन नॉट टू रीड
किंवा
ऑप्शन टू इग्नोअर अस काही करता येणार नाही का?
21 Apr 2016 - 3:18 pm | तिमा
लेडीज टेलर कायम सुखी असतो असे गृहीत धरले तर ते
फळाची अपेक्षा न ठेवल्यामुळे
की ठेवल्यामुळे ?
21 Apr 2016 - 5:51 pm | चौथा कोनाडा
लेडीज टेलर कायम सुखी असतो असं का गृहित धरायचं ? काही विदा उपलब्ध आहे ?
जेन्ट्स टेलर, होजियरीवाले, अंतर्वस्त्रवाले यांचं काय ?
21 Apr 2016 - 4:22 pm | पिलीयन रायडर
काम "न" करण्याबद्दल धागा आला म्हणुन १० वेळा इथे येऊन गेले. वाचायचा खुप प्रयत्नही केलाय. पण मला काहीही समजलेले नाही.
कुणी ह्या लेखाचा कळेल असा सारांश देऊ शकेल का? १-२ ओळीत पुरे. संक्षी तुम्ही सुद्धा दिलात तरी चालेल.
21 Apr 2016 - 6:14 pm | शाम भागवत
मला काय कळलेय त्याचा सारांश देतोय. पण..
विठांना तसेच म्हणायचे असेल याची खात्री नाही.
भक्ति व ज्ञानोत्तर भक्ति असे काही असते तसेच
कर्म व ज्ञानोत्तर कर्म असे पण असते.
ह्यातले ज्ञानोत्तर कर्म म्हणजे विठांचे ऑप्शन नॉट टू वर्क. मात्र ह्याबद्दल मी फार काही बोलणार नाहीय्ये.
कामाला स्वतःची गोडी नसते. आपणच त्यात आपली आवड अथवा नावड किंवा असे बरेच काहीतरी घालतो. मग ते काम आनंददायी अथवा त्रासदायक वगैरे होते आणि तसे ते होण्याचे मूळ कारण आपणच आहोत. ते काम नव्हे.
जर प्राप्त परिस्थितीत एखादे काम करायलाच लागणार असेल तर ते त्यात गोडी घालून करा. अशी सवय लागली की, हळूहळू आपल्याला ते काम आवडायला लागते व त्यात आपण समरस होऊ लागतो. आणि मग कधितरी आपल्या लक्षात येते हे काम करताना आपले वेळ काळाचे भान हरपले आहे. तसेच आपल्याला कोणताही थकवा आलेला नाही. जणू दुसरेच कोणीतरी ते काम करतेय व आपण ते फक्त पाहातोय.
या स्थितीत मात्र काम हे निव्वळ काम असते त्यात आवडी नावडीचे कोणतेही मिश्रण झालेले नसते. आपण ते करत नसतो तर आपल्याकडून ते होत असते. अशी स्थिती होणे म्हणजे ऑप्शन नॉट टू वर्क.
एकदाका हा अनुभव आला की मग कोणत्याही कामात आपली आवड निवड न घालता आपल्याला काम करता येऊ लागते.
हुश्श...
21 Apr 2016 - 6:18 pm | रेवती
हा प्रतिसाद वाचल्यावर पिलियन रायडरला नक्की कळेल.........................की मूळ लेखच समजायला सोपा होता. (हलके घ्या.)
21 Apr 2016 - 6:20 pm | शाम भागवत
_/\_
21 Apr 2016 - 6:21 pm | शाम भागवत
केला की नाही मूळ लेख सोपा.
21 Apr 2016 - 6:50 pm | रेवती
येस्स! हलके घेतल्याबद्दल धन्यवाद.
21 Apr 2016 - 6:20 pm | पैसा
तुम्ही नेहमी का लिहीत नाही?
21 Apr 2016 - 6:23 pm | पिलीयन रायडर
बरं पण म्हणजे जे आहे त्यात आनंद माना किंवा रादर काहीच मानु नकात.. आनंद ना दु:ख.. मग कामच काय एकंदरित आयुष्यात तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही.
पण हे ओव्हर सिम्प्लिफिकेशन नाही वाटत का?
समजा एखादा कामगार आत्ता उन्हात रस्त्यावर मजुरी करत आहे. तुम्ही म्हणा की "तो" म्हणजे त्याचे शरीर नाही वगैरे वगैरे.. पण त्याला कामाचा जो त्रास व्हायचाय तो होणारच आहे. उन लागणारच.. अंग दुखणारच आणि त्याचे दु:ख होणारच की..
शिवाय... हे फक्त भावनांना बंद करणे झाले.. कामाला नाही.. काम तर करावेच लागते की हो.. "आपण" करत नसुन आपले "शरीर" करत असले किंवा अजुन काहीही फंडे लावले तरी ह्या देहाला उठुन काम करावे लागतेच. तेव्हा तुम्ही म्हणतात तसला काही लेखात मुद्दा असेल तर "ऑप्शन नॉट टु वर्क" हे फसवे शीर्षक आहे.
"ठेविले अनंते तैसेची रहावे.. चित्ती असु द्यावे समाधान" ह्या पेक्षा काही वेगळं सांगितलय का ह्या लेखात?
21 Apr 2016 - 8:02 pm | शाम भागवत
अगदी खरेय. हे सगळे होणारच होते हो. पण आपण आपली नावड त्यात जास्तीची म्हणून घालतो त्यामुळे तो त्रास आणखीन वाढवून ठेवतो. यालाच भोग भोगताना तो वाढवून ठेवणे असे म्हणतात.
उदाहरण देऊन हवे तर स्पष्ट करतो.
कोणीतरी वरती म्हटलेय की,
"सकाळी उठून की स्वयंपाक करायलाच लागतो. डबे तयार करायलाच लागतात." वगैरे वगैरे. ते श्रम आहेत याबद्दल वादच नाही. ते काम नसते तर आणखीन एक डुलकी काढता आली असती हेही मान्य. पण उठावे लागतेच. आता काही जणी रेडिओ लावतात तर काही जणी गाणी गुणगुणतात व त्या नादात काम कधी संपते ते कळतच नाही.
थोडक्यात मुद्दा असा आहे की काम करण्यासाठी जेवढे श्रम व्हायला पाहिजेत तेवढेच झाले पाहिजेत त्यापेक्षा थोडेसे सुध्दा जास्त श्रम झाले नाही पाहिजेत.
21 Apr 2016 - 6:41 pm | मूकवाचक
ज्ञानेश्वरी नित्यपाठातला हा भाग आठवला:
दीपाचेनी प्रकाशे | गृहींचे व्यापार जैसे | देही कर्मजाता तैसे | योगयुक्ता ||
तो कर्में करी सकळें | परी कर्मबंधा नाकळे | जैसें न सिंपे जळीं जळें | पद्मपत्र ||
तयाही देह एकु कीर आथी | लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती | परी आम्हांतें ऐसी प्रतीती | परब्रह्मचि हा ||
देह तरी वरिचिलीकडे | आपुलिया परी हिंडे | परी बैसका न मोडे | मानसींची ||
अर्जुना समत्व चित्ताचें | तेंचि सार जाणैं योगाचें | जेथ मन आणि बुद्धीचें | ऐक्य आथी ||
देखैं अखंडित प्रसन्नता| आथी जेथ चित्ता| तेथ रिगणें नाहीं समस्तां| संसारदुःखां ||
21 Apr 2016 - 6:58 pm | राघव
@शाम भागवत यांचा प्रतिसाद आवडला.
@मुवा: उद्धृत भाग खूपच छान आहे. धन्यवाद! :-)
22 Apr 2016 - 11:14 pm | अर्धवटराव
गोडी घालुन करा म्हणजे नेमकं काय करायचं म्ह्णताय ?
एखादं काम गोड वाटतं म्हणजे काय असतं?
माणासाचा मेंदु एखाद्या प्रचंड गुंतागुंतीच्या इलेक्ट्रॉनीक सर्कीट सारखा असतो. एखादं काम करताना या सर्कीटमधील एक विशिष्ट प्रणाली कार्यान्वीत होते. त्याकरता आवष्यक तेव्हढी ऊर्जा आणि प्राणवायु उपलब्ध असला तर ते मेंदुला शीण वाटत नाहि व ते काम गोड वाटतं. मेंदुला शीण न जाणावता काम करणं म्हणजेच त्यात गोडी असणं. उदा., संध्याकाळी अभ्यासाचा कंटाळा येत असेल कारण मेंदु शिणला असतो. व्यवस्थीत झोप, व्यायाम, नाश्ता करुन अभ्यासाला बसा, त्याच कामात गोडी वाटते. हे फार सिंपल उदाहरण झालं. पण सर्वप्रकारच्या कामात हिच प्रोसेस असते. मग ते पाठांतर असो, प्रोग्रामींग असो, टॅक्स फाइल करणं असो कि कार चालवणं. काम करताना ते नकोसं वाटणं, जांभया येणं, लक्ष्यात न येणं हे सर्व मेंदुला त्याचं इंधन न मिळाल्याची लक्षणं असतात.
प्रत्येक मनुष्याच्या शरीरघडणीनुसार मेंदुचे काहि सर्कीट आपसुक स्ट्रीमलाइन असतात. त्यालाच आपण माणसाची आवड/ स्वभाव म्हणतो किंवा त्याचा कल अमुक गोष्टीत आहे असं म्हणतो. मेंदुचे इतर सर्कीट अभ्यासाने सेट केले तर त्यातही गती येते व कालांतराने त्यात परिश्रम जाणवत नाहि. या सर्वांमागे सरळ सरळ शरीरशास्त्र आहे बाकी काहि नाहि.
निराकार वगैरे कल्पनांविषयी नंतर कधितरी :)
22 Apr 2016 - 11:32 pm | विवेक ठाकूर
त्यांचा लेखात मांडलेल्या `दि ऑप्शन नॉट टू वर्क'या बेसिक विचाराशी काहीएक संबंध नाही.
22 Apr 2016 - 11:51 pm | अर्धवटराव
पण हे सर्व शरीरशास्त्राशीच संबंधीत आहे एव्हढं नक्की.
बाकी `दि ऑप्शन नॉट टू वर्क'या बेसिक विचारांवर विचारलेल्या प्रश्नाला इग्नोर करण्यात आलं आहे. असो.
24 Apr 2016 - 8:28 pm | शाम भागवत
खरे म्हणजे मी ऑप्शन नॉट टू वर्क याबाबत बोलणार नव्हतो. पण माझे निरीक्षण व अनुभव यानुसार,
१) एखादे काम करत असताना, अंगीकृत कामाशी काहीही संबंध नसलेले विचार मनात येत आहेत हेच मुळी आपल्या लक्षात येत नाही. कारण आपण विचारांबरोबर वाहत जात असतो.
२) यासाठी विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला साधायला लागते. ही कला थोडीफार साधायला लागल्यावर मग हळूहळू आपल्या मनात आत्ता या क्षणी कोणते विचार येत आहेत हे जाणवणे जमायला लागते.
३) यानंतरच नकारात्मक विचार जे कामाचा ताण तणाव वाढवतात किंवा कामाबद्दल नावड निर्माण करतात असे विचार मनात आल्या आल्या ते धरणे मग ते थांबवणे / थोपवणे शक्य होऊ शकते किंवा त्यादृष्टीने प्रयत्न करणे जमू लागते.
४) हाच विचारांचा प्रवाह सकारात्मक मार्गाने वळवता येणे ही त्यानंतरची पुढची पायरी होय. ही पायरी फार महत्त्वाची असते. कारण विचार थोपवले तरी परत कधीतरी अनुकूलता प्राप्त होताच उसळी मारून हजर होतात. पण ते वळविण्याची कला साधायला लागल्यावर मात्र ही भिती कमी कमी होत जाते.
५) मग मात्र आपण व काम येवढेच शिल्लक राहते. कामातील समरसता हळूहळू वाढत जाते आणि कधीतरी आपण काम करत नसून आपणाकडून काम होतेय याचा अनुभव येतो. कामापासून आपण पूर्णपणे भिन्न झालेलो असतो. हेच ऑप्शन नॉट टू वर्क
कामाचे मुख्यत्वे करून दोन प्रकार संभवतात. पहिला म्हणजे ज्यात डोक्याचा वापर फारसा नसतो. कामात टोचतोच पणा असतो. दुसऱ्या प्रकारात मात्र डोक्याचा वापर जास्त व अंगमेहनत कमी असते.
क्रमांक ५ मध्ये दिलेला अनुभव हा पहिल्या प्रकारच्या कामात प्रथम येतो. दुसऱ्या प्रकारच्या कामात हा अनुभव येणे ही खूपच पुढची पायरी आहे.
24 Apr 2016 - 10:49 pm | विवेक ठाकूर
बरोब्बर!
तुम्हाला ऑप्शन नॉट टू वर्कची काहीही कल्पना नाही. भरकटलेले विचार कामाकडे कसे वळवावेत वगैरे तुम्ही लिहीलेल्या तपशीलाचा आणि लेखाचा काहीएक संबंध नाही.
25 Apr 2016 - 12:05 am | शाम भागवत
:-))
23 Apr 2016 - 3:50 pm | शाम भागवत
"जर प्राप्त परिस्थितीत एखादे काम करायलाच लागणार असेल तर"
ह्या गृहितकावर मी विचार मांडले होते. मात्र प्राप्त परिस्थिती बदलून कामात गोडी कशी आणता येते याबद्दल तुम्ही लिहीत आहात असे वाटतेय कारण;
तुमच्या सिंपल उदाहरणात "व्यवस्थीत झोप, व्यायाम, नाश्ता करुन अभ्यासाला बसा" असे सागत आहात म्हणजे चक्क परिस्थितीच बदला असे सांगताय असेच माझे मत बनले आहे. आपल्या दोघाच्या दृष्टिकोनातच फरक असल्याने मला या विषयावर बोलण्यास फारसा वावच राहिलेला नाही.
तरीपण परिस्थिती न बदलता, (म्हणजे झोप घेणे व्यायाम करणे व नाश्ता करणे हे पर्याय उपलब्ध नसताना) अभ्यासात गोडी कशी आणायचे याची शरीरशास्त्रात एखादी प्रोसेस असेल तर ती वाचायला मला आवडेल. असो.
एकदम मान्य.
पण सकारात्मक विचार करून म्हणजेच कामात गोडी आणण्याचा प्रयत्न करून ही मेंदूतील सर्कीट का बरे सेट करता येत नसावीत ते काही कळले नाही. याबाबत माहिती मिळाल्यास आभारी होईन.
जर प्राप्त परिस्थितीत आपली नावड अथवा कामाबद्दलची तक्रार यावरच विचार करत करत काम केल्यास आपल्यालाच त्रास होतो किंवा काम बिघडते. तसेच आपली होणारी चिडचीड ही आपल्या हातून चुका होण्याची शक्यता वाढ्वते असा जर पूर्वानुभव असेल तर आपणच आपल्या मनाचे समुपदेशन करणे योग्य ठरणार नाही का?
कामात गोडी घालणे ही फार पुढची गोष्ट झाली हो. त्या अगोदर कामाबद्दलचा कडवटपणा काढणे ही पहिली पायरी पण बरेच जण ओलांडू शकत नाहीत असे माझे निरिक्षण आहे व या निरिक्षणावर आधारित मी माझ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
थोडक्यात मुद्दा असा आहे की काम करण्यासाठी जेवढे श्रम व्हायला पाहिजेत तेवढेच झाले पाहिजेत त्यापेक्षा थोडेसे सुध्दा जास्त श्रम झाले नाही पाहिजेत. मग हे शरीरशास्त्राने साधो अथवा ऑप्शन नॉट टू वर्क ने साधो. साधणे महत्वाचे.
23 Apr 2016 - 9:25 pm | अर्धवटराव
अहो, एखादं काम करण्याची गरज/इच्छा/भावना निर्माण होणं हेच मुळी परिस्थिती बदलण्याचं निर्देशक आहे. ज्याला आपण काम करणं म्हणतो, कर्म म्हणतो, ते परिस्थिती बदलण्याव्यतिरीक्त आहे तरी काय?
याबद्दल पुर्वी टंकलं आहे. प्राप्त परिस्थितीत काय करायला हवं याचं उत्तर देणारं इंजीन माणसाच्या मनात/मेंदुत नेहेमी उपलब्ध असतं. त्याचा कौल घेणे हा सर्वोत्तम मार्ग. जर आत्ता अभ्यासाची निकड असेल आणि मेंदु शिणला असेल तर ते इंजीन तुम्हाला अर्धा तास पॉवर नॅप घेऊन अभ्यासाला बसायचा कौल देईल (याचा काहि एक सेट फॉर्मुला नाहि. प्रत्येकाची तर्हा वेगळी असणार). इन फॅक्ट, ताजंतवानं होऊन अभ्यासाला बसणं हे त्या अभ्यासकर्मातच इन्क्लुडेड असेल. इट्स ऑल अबौट कॉर्डीनेशन बिट्वीन मन अॅण्ड शरीर.
हि सकारात्मकता जर प्रामाणीकपणे मनाला पटली, त्यात सत्य/तथ्य वाटलं तर डेफिनेटली मेंदु त्यानुसार काम करेल. किंबहुना, कामाची निकड खरच निर्माण झाली असेल तर त्यात सकारात्मकतेचं तेल ओतण्याची गरजच राहात नाहि. आणि मनाला तशी गरज नसेल वाटत तर लाख सकारात्मक विचार करा, मनाला त्यातला फोलपणा जाणवत राहिल.
नक्कीच ते काम बिघडेल. पण जर तक्रार करण्याजोगं काम आपल्या वाट्याला असेल तर ते डेफिनेटली कुठल्यातरी गरजेतुन निर्माण झालं असेल. त्या गरजेला ते काम ड्राइव्ह करु देणं सगळ्यात बेष्ट. काम आवडीचं असो वा गरजेतुन निर्माण झालेलं, त्याच्या परिणामात मन गुंतलं कि कार्यनाश होण्याचे चान्सेस असतातच. त्यापेक्षा "काय करायला हवं" या इंजीनचा सतत कौल घेत राहिल्यास बेस्ट पॉसिबल कर्म देखील साध्य होतं आणि त्याचा त्राचा त्रास देखील होत नाहि.
"आपल्या" हातुन चुका होणं, "मनाचं" समुपदेशन करणं... हि मनाची विभागणी मूळातच चुकीची आहे. चिडचीड मनाचीच होते, समुपदेशन सुद्धा मन मनाचच करतं. चिडचिड होण्यामागे शारीरीक कारण म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे मेंदुचं सर्कीट सेट नसणं. मानसीक कारण म्हणजे मन परिणामात गुंतलं असणं. त्या परिणामात गुंतण्याऐवजी मनाने जर आपल्या "प्राप्त परिस्थितीत काय करायला हवं" या कर्मात गुंतलं तर शरीर-मनाचं नेमकं कॉर्डीनेशन करुन कार्य साध्य करण्याचा प्रॉग्राम मनासमोर आपसुक येतो. देन जस्ट डु इट. त्याचा जो काहि परिणाम होईल त्यावर रिएक्शन म्हणुन परत नवीन प्रोग्राम मनासमोर येतोच. दॅट्स लाइफ.
त्यात काहि वाद नाहि. मी पण माझे निरीक्षणच नोंदोवतो आहे :)
मला ते ऑप्शन नॉट टु वर्क म्हणजे नेमकं काय हेच कळलं नाहि. काम करताना त्यात गोडी निर्माण करायला ऑप्शन नॉट टु वर्क नशीबाने उपलब्ध असतं, कि ते निर्माण करावं लागतं हे ही कळलं नाहि. निर्माण करणं म्हणजे अजुन एक कर्म अॅड झालं. त्यात काहि अध्यात्मीक वगैरे आहे हेही मला पटलं नाहि. हा सगळा शरीर आणि मानसशास्त्राचा प्रांत आहे असं माझं प्रामाणीक मत आहे. धागाकर्त्याला विचारलं तर त्यांनी सरळ प्रश्न इग्नोर केला. असो. आपापली मर्जी.
23 Apr 2016 - 10:38 pm | विवेक ठाकूर
फारकत घेऊन चर्चा निष्कारण मनाच्या गुंत्यात नेतायेत. या प्रकारे काम स्वच्छंद होणं असंभव आहे.
23 Apr 2016 - 10:58 pm | विवेक ठाकूर
काम न करण्याचा किंवा ते थांबवण्याचा विकल्प कायम उपलब्ध आहे ...अशी तुमची निश्चल चित्तदशा आहे. आणि या चितदशेतून तुम्ही काम सुरू केलंय. आता काम हा तुमचा स्वच्छंद असल्यानं त्यात रस आपसूक निर्माण होईल, मनाची एकाग्रता विनासायास साधेल, काम स्वभावतःच सम्यक होईल (म्हणजे कामाचं शरीर किंवा मनाला ओझं वाटणार नाही), तुमची सृजनात्मकता साथ देईल , ते शक्यतो वेळेतच पूर्ण होईल आणि मुख्य म्हणजे ..... त्या कामातून कमालीचा आनंद मिळेल !
लेखाचा मूळ अर्थ असा आहे .
23 Apr 2016 - 11:38 pm | अर्धवटराव
ज्या क्षणी काम करण्याची प्रेरणा मनात उत्पन्न झाली त्याच क्षणी ते न करण्याचं ऑप्शन बाद झालं. आत ते न करण्याचं किंवा थांबवण्याचं ऑप्शन त्याच कामांतर्गत आलं तरच शक्य आहे. काम करत असताना ते न करण्याच्या ऑप्शनकडे बघणं म्हणजे एकतर द्विधा मन:स्थिती झाली किंवा कामाच्या परिणामांपासुन फारकत घेण्याची इन्शोरन्स पॉलिसी झाली. म्हणजे कसं, कि मी काम तर करतोय, त्याचे परिणाम कसेही असले, अॅज गुड अॅस ते काम केलच नाहि तरि, त्या परिणामांचा माझ्यावर काहिही परिणाम होणार नाहि याची सोय उपलब्ध असणे म्हणजे नॉट टु वर्क ऑप्शन. आता अशी परिणामरहितता नशीबाने तरी मिळाली असेल किंवा ति कमवली तरी असेल (डॉ. खरे, गॅरी ट्रुमन वगैरे मंडळींनी कमवली तशी)
23 Apr 2016 - 11:41 pm | अर्धवटराव
आम्हि मुद्दाम चर्चा भलतीकडे नेत आहोत असं वाटत असल्यास चर्चेत काहि पॉइंट नाहि. आणि कामाचा स्वच्छंद यथेच्च उपभोगत असल्यामुळेच त्याबद्दलचे विचार टंकतो आहे.
21 Apr 2016 - 4:51 pm | अप्पा जोगळेकर
श्री गणेश लेखमाला आणि हे 'ऑप्शन नॉट टू वर्क' एकदमच प्रकाशित झाले असते तर मजा आली असती.
21 Apr 2016 - 5:42 pm | भीमाईचा पिपळ्या.
जगी कर्मयोगाचे हे सार
घ्यावे जाणून सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देई ×× सर.
जाणकारांनी भर घालावी.
21 Apr 2016 - 5:58 pm | रेवती
लेख वाचला, आवडला. काही टक्के पटला नाही, कारण प्रत्येकजण वाचताना आपापल्या परिस्थितीचा मापदंड लावत असतो. अंतर्निहित हा शब्द फार अवघड आहे. चित्तदशा वगैरे वाचले की हापिसच्या कामापासून लांब गेल्यासारखे वाटते. काही प्रतिसाद वाचले, त्यातील काही पटले नाहीत.
सरळ साध्या लेखाचे प्रतिसादांमुळे उगीच अवघड प्रकरण करून ठेवण्यात अर्थ नाही.
लेख १०० टक्के नाही तरी काही टक्के नक्कीच आचरणात आणता येण्यासारखा आहे.
बरेचजण आचरणात आणतही असतील.
नोकरी करताना प्रत्येक दिवस एकसारखा आनंदी, उत्साही असेल या आशेवर राहणे वेडेपणा आहे, तसेच रोजचा दिवस तुम्ही कसाबस ओढता हेही खोटे असेल, जरा लक्ष ठेवा व बघा की मनुष्य काही ना काही आनंद शोधूनच काढतो, चुकीच्या ठिकाणी का असेना! अनेक उदाहरणे हापिसच्या बाहेर फुंकत उभी असलेली दिसतील. ;)
मला घराच्या कर्जाचा हप्ता द्यायचाय, अमक्याचे बिल भरायचेय असेही काही प्रतिसादांमध्ये आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही एकटेच आहात सगळी बिले भरणारे! बॉस त्रास देतो आहे, तर हो, तुमचा एकट्याचाच बॉस त्रास देतोय बाकी कुण्णाचा देत नाही. फक्त तुम्ही एकटेच या जगात प्रॉब्लेममध्ये फसलेले आहात असल्या प्रतिसादांनी लेखाचे भजे करून ठेवण्याने उपयोग नाही. सगळाच्या सगळा लेख हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल असे नाही.
विठामाऊली, लेखाबद्दल धन्यवाद. त्यातून, प्रतिसादामधून एक या लेखाशी संबंधित नसलेला विचार मनात आला व माझा लहानसा प्रश्न (मीच निर्माण करून ठेवलेला) सुटला असे म्हणता येणार नाही पण सुटू शकेल अशी आशा निर्माण झाली.
21 Apr 2016 - 6:04 pm | अभ्या..
हेहेहेहेहे रेवाक्का रॉक्स अगेन. अॅज ऑलवेज.
कसं जमतं असं परफेक्ट लिहायला?
22 Apr 2016 - 5:12 pm | सस्नेह
रेवतीजी, तुम्हाला लेखाचे मर्म बरोबर समजले आहे. (जे बऱ्याच मूढ मिपाकरांना कळलेले नाही. त्यात मीपण आहे )
तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करालच. कदाचित तुम्हाला त्यात यशही मिळेल. पण नाहीच मिळाले तरी काम न करण्याचा पर्याय कधीही विसरू नका. कधी ना कधी तुम्ही नक्की काम करायचे सोडाल, अशी खात्री आहे.
धन्यवाद ! :)
22 Apr 2016 - 6:26 pm | रेवती
काय स्णेहातै, आज मी सापडले का?
21 Apr 2016 - 6:38 pm | प्रचेतस
उत्तम लेख व सुरेख प्रतिसाद.
21 Apr 2016 - 6:44 pm | प्रसाद गोडबोले
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
21 Apr 2016 - 7:57 pm | होकाका
या धाग्याचा टिआरपी चांगला असल्यामुळे हा सगळ्यांनी बघावा असा एक मेसेज इथे टाकत आहे. (हा मला व्हॉट्सअॅपवर आलेला आहे, त्यामुळे काही लोकांनी तो आधीच पाहिलेला असू शकतो.) याचा विषयाशी संबंध नाही याबद्द्ल चूभूमाअ.
"We need help from India to free us. Why is India silent?" — Baloch woman
What Nazis did to Jews, Pakistan is doing to our people, says a Baloch woman with tears in her eyes.
Demanding help from India to free her country from Pakistan's actrocious occupation, she urges India not to remain a silent spectator when her neighbors, the Balochs, are suffering.
22 Apr 2016 - 8:41 am | चौथा कोनाडा
धन्यवाद, हो काका, इथे शेअर केल्याबद्दल !
हृदय द्रावक परिस्थिती आहे. भारता कडे केवढ्या आशेने बघतायत ते ! पुढील पाच वर्षे या विषयाचीच असली तर आशचर्य वाटायला नको.
बिचारयांच्या बाबतीत कर्मयोग: नो ऑप्शन टू फाईट हेच लिहिले असावे.