मध्यरात्रीची वेळ .मित्राबरोबर दुकानाच्या पायरीवर गप्पा मारत बसलेलो. दुरूनच एक पांढरी स्कॉर्पिओ येताना दिसली."जरा जास्तच वेडीवाकडी चाललीये " मित्राला बोललो तोवर खाड ..माझ्या गाडीचा बंपर उखडून स्कॉर्पिओ पुढे गेलीसुद्धा.ताडकन उठून मित्राच्या बाईकला किक मारली आणि एकदोन चौक टाकून स्कॉर्पिओ गाठलीच. बाईक आडवी लावली आणि ड्रायव्हरला एकदोन शिव्या हासडल्या.तेव्हढ्यात मागची काच खाली झाली आतमध्ये एक दाढीवाला ,सफेद कपडे ,हातात,गळ्यात जाड चेन घालून ,तो पण फुल टाईट. "कोण रे? काय पायजे? " जरा फाटलीच . तरीपण उसने अवसान आणून गाडी ठोकल्याबद्दल नुकसान भरपाई मागितली."पैशे पायजे तुला?" त्याने मांडीवरचा टॉवेल बाजूला केला.
------------
टॉवेल खाली एक बोट रिवॉल्वरच्या ट्रिगरवर ठेवलेले.विषयच संपला.
प्रतिक्रिया
13 Apr 2016 - 3:53 pm | मराठी कथालेखक
वाढती गुंडागर्दी :(
13 Apr 2016 - 3:57 pm | मी-सौरभ
अपेक्शित शेवट
13 Apr 2016 - 7:54 pm | होबासराव
का कोण जाणे पण मला वाटत कि ह्या कथेचि पेरना आपल्याला इथुन मिळालि असावि
http://www.misalpav.com/node/16142
14 Apr 2016 - 6:18 pm | राजेंद्र मेहेंदळे
हा धागा वाचला होता पुर्वी. पण ही कथा माझ्या ऑफिसमधल्या मित्राबाबत घडली आहे.
13 Apr 2016 - 8:07 pm | जव्हेरगंज
आर्र तिच्या!!
असं झालं होत तर !!
शेवटची दोन वाक्ये नसती तर कथा यकदमच भयंकर झाली असती :(
14 Apr 2016 - 6:19 pm | राजेंद्र मेहेंदळे
मग तशा प्रकारे वाचा!! आवड आपली आपली.
13 Apr 2016 - 8:13 pm | पैसा
बापरे
13 Apr 2016 - 8:20 pm | रातराणी
ऑइ. खरी आहे?
13 Apr 2016 - 8:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खत्तरनाक जमली आहे.
-दिलीप बिरुटे
14 Apr 2016 - 6:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
शंभर शब्दात बसवायची असल्याने शेवट जमतोय की नाही असे वाटत होते. बरीच काटछाट करुन बसला एकदाचा!!
14 Apr 2016 - 10:04 pm | बोका-ए-आझम
मित्राला काय वाटलं देव जाणे. त्याने बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि या बाबाच्या डोक्यावर मारला. भळ्कन रक्ताची धार लागली. तिरीमिरीत दरवाजा उघडून तो बाहेर आला. मित्र तयारीतच होता. काही कळायच्या आत त्याने बाबाची गन त्याच्याच पोटावर रोखून ट्रिगर दाबला. बाबा गाडीतच कोसळला. त्याच्या हातून गन खेचून घेत मित्राने दरवाजा उघडून पळू पाहणाऱ्या ड्रायव्हरला डोक्यात गोळी घातली. बाबाचा टाॅवेल गनवर दाबलेला असल्यामुळे आवाज आला नव्हता आणि तसंही इथल्या भेदरट वस्तीत फटाक्यांच्या आवाजाने पण लोक घाबरतात. गोळ्यांचा आवाज ऐकून त्यातले कितीजण कपडे खराब करतील या विचाराने मला तिथेही हसू आलं.
" चला हो किरवंत. अंतिम संस्कार करु या यांचा." मित्राच्या आवाजाने मी भानावर आलो.
बाबा आणि ड्रायव्हर दोघांना जागच्या जागी बसवत आम्ही गाडीवर बसलो. बाबाच्या गळ्यातली सोन्याची चेन काढून घेतली होतीच. मी गरुडपुराणातला मला आठवत असलेला श्लोक म्हटला. क्षणभर वडलांच्या आठवणीने कसंसंच झालं. मग मित्राने फ्युएल टँकवर गोळी मारली आणि आम्ही सुसाट सुटलो. निघताना ती गन आगीत फेकली होतीच.
" ड्रायव्हरला का मारलंस? " मी विचारलं, " टिप तर त्यानेच दिलेली ना?"
" म्हणून तर मारलं. विश्वासघाताला मृत्यू हीच शिक्षा!बरं, कुठे विकायची ही चेन?"
" मध्य प्रदेशात. गेल्या वेळी कर्नाटकात विकली होती ना!"
"
14 Apr 2016 - 10:11 pm | आनंदयात्री
दंडवत घ्या _/\_
15 Apr 2016 - 12:48 pm | अजया
जोडकाम मस्त जमलंय!
15 Apr 2016 - 12:36 pm | मराठी कथालेखक
extension आवडलं..
वास्तव जीवनात घाबरुनच जगावं लागतं निदान कल्पनेत तरी full to धडाडी दाखवायला काय हरकत आहे ना :)
15 Apr 2016 - 12:42 pm | बोका-ए-आझम
आणि अशा लोकांच्या प्रतिक्रिया एकदम वेगळ्या असतात. Corner केलेलं मांजर जसं समोरच्यावर झेप घेतं तसा. शेवटी हिंसा ही प्रत्येकात असते.
15 Apr 2016 - 2:08 pm | राजेंद्र मेहेंदळे
जोडकाम जमलंय एकदम. तुम्ही म्हणता ते खरं आहे. कोपर्यात सापडलेली मांजर पंजा उगारतेच.
16 Apr 2016 - 5:23 pm | भरत्_पलुसकर
खतरनाक!
16 Apr 2016 - 8:13 pm | रेवती
मूळ कथेला दिलेला जोड आवडला पण यापुढे कथा विनोदी बनवायची असेल तर जळती गाडी कोकणातल्या पुलावर गेली पाहिजे. इकडून तिकडून कोणीतरी बाईकस्वारही आला पाहिजे. ;)
17 Apr 2016 - 10:13 am | रातराणी
हे राहून गेलेलं वाचायच! _/\_ भारीच ट्विस्ट!
15 Apr 2016 - 6:07 pm | विजय पुरोहित
मुळ कथा व बोकोपंतांचे जोडकाम दोन्ही आवडले. शेवटी बोकोपंतांचा खुलासा पण अतिशय आवडला.
16 Apr 2016 - 5:22 pm | भरत्_पलुसकर
जबरदस्त!
18 Apr 2016 - 12:24 pm | सविता००१
दोन्ही कथा सुरेख