जीवनमान
यत्नशीलांची कधीही हार होत नाही
लाटांना घाबरून नौका पार होत नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही
छोटीशी मुंगी दाणा घेऊन चालत असते
चढते भींतींवर, शत शतदा घसरत असते
मनातील विश्वास नसांत साहस भरतो
चढून पडणे, पडून चढणे, व्यर्थ होत नाही
अखेरीस तिची मेहनत वाया जात नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही
पाणबुडे समुद्रात डुबकी घेत असतात
खोलवर बुडी घेऊनही रिकामे परततात
तिथे मोती सहज का सापडत नाहीत
ह्या आश्चर्यानेच उत्साह दुप्पट होतो
मूठ नेहमीच काही रिकामी राहत नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही
जि. प. प्रा.
"पाटीवर तुमचं आवडतं चित्रं काढा" गुर्जी मनले.
मी समद्यात पुढं. म्हंजी बसायला. बसलो 'टरक' काढत. दोन आडव्या रेघा. मग ऊभ्या. मग कॅबिन. मग चाकं. गेलो गढून. म्हागं समदी ऊभी राहिली. नान्या वाकून माझ्या पाटीत बघाय लागला.
"थांबा रं, त्यला आधी टरक काढू द्या" खुडचीवर बसलेल्या 'बाई' माझ्या डोक्यात टुपक्कन छडी मारत मनल्या. ही तर जगदंबाच. माझ्या ओझरतं कानावर आलं पण सुटून गेलं. डोक्यावर काय पडलं म्हणुन हात बी फिरवला.
नान्या माझ्या म्होरनं वर्गाभाईर जायला लागला.
बुलेट ट्रेन ला काही पर्याय
लेख थोडा छोटा झाला आहे त्याबद्दल मिपाकर क्षमा करतील अशी आशा आहे .
----------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक राज्यात आपल्या देश कि रेल ने विकासाची नक्कीच नवी गंगा आणायला हातभार लावला आहे ह्याबद्दल शंका नाही. विविध प्रगत देशात जलदगती गाड्या पाहून आपल्या नेत्यांना त्याची स्वप्ने पडू लागली. France-SNCF , ब्रिटीश रेलची इंटरसिटी १२५ तर अमेरिकेची Acela express. पण ह्या सगळ्यांना मागे टाकून जपान रेल ची बुलेट ट्रेन मोदिजींच्या मनात बसली. आता विकास हा व्हायलाच हवा. पण तो कधी करायचा हे आपण ठरवायचे आहे.
मीना (पुस्तक परिचय)
काबूलमध्ये रहात असताना तिथल्या स्त्रियांच्या स्थितीविषयी विश्वसनीय माहिती जाणून घेण्यासाठी एक उत्तम संकेतस्थळ मला सापडलं होतं: ते होतं www.rawa.org. ‘रावा’ हा शब्द ‘Revolutionary Association of Women of Afghanistan’ या संघटनेच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांना घेऊन बनवलेला शब्द. (स्थानिक भाषेतलं नाव आहे: Jamiat-E-Inqalabi Zanan-E-Afghanistan). या संकेतस्थळावर एक महत्त्वाचं वाक्य लक्ष वेधून घेत. “जर तुम्ही स्वातंत्र्यप्रेमी असाल, आणि मूलत्त्ववाद्यांच्या विरोधात असाल, तर तुम्ही ‘रावा’सोबत आहात!
वय वर्ष ९३
ताबडतोब गूगला. नारायण महाजन. #respect #साष्टांग कोटी कोटी नमस्कार
असा संदेश व्हॉट्सॅपवर एका भावाने पाठवला. काहीतरी जबर असणार अशी खात्री होतीच त्यामुळे ताबडतोब गूगललं गेलं. आणि जी माहिती मिळाली ती पराकोटीची प्रेरणादायी होती.
या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे
मला
बाबा आमटेंच्या 'आनंदवनात',
अभय बंगाच्या 'मेळघाटात',
कोकणकड्याच्या सावलीत वसलेल्या 'बेलपाड्यात',
पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या 'कश्मीर' च्या एखाद्या सफरचंदाच्या बागेत,
जगात भारी पोहे आणि मालपुआ भेंटणार्या इंदोरच्या खाऊगल्ली मधे,
दिलवालो की 'दिल्ली' च्या ' पराठेंवाली की गली' मध्ये,
वाईन चा एक एक घोट घेत पॅरिसमधे,
अगदी प्रेमाने 'पास्ता: आणि वुडफायर्ड 'पिझ्झा' खाऊ घालणार्या आजीबाईच्या 'इटली' मधल्या एखाद्या दुरच्या खेड्यात,
चॉकलेट च माहेरघर असलेल्या 'स्विस' मधल्या एखाद्या चॉकलेट फॅक्टरी मधे,
देवाचं अज्ञान, कुतुहल आणि विज्ञान
शीर्षक वाचून देव आणि वि़ज्ञान ह्यावर दंगा करून पॉपकॉर्न उधळायला मिळतील असा गोड गैरसमज करून घेवू नये. कारण हा लेख एका पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी आहे. ह्या पुस्तकाचं नाव आहे "God's Debris". आणि लेखक आहेत "Dilbert" चे निर्माते Scott Adams. ह्या पुस्तकाविषयी सविस्तर लिहले तर वाचण्यातील मज्जा निघून जाईल कारण हा एक विचार प्रयोग आहे.
विश्वभरातील अन्याय्य विचार आणि वर्तन करणार्या 'त्या' पुरुषांनो- आणि 'त्या' स्त्रीया सुद्धा तुमचा जाहीर निषेध
"वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता" या धागा लेखात गोवेकर महिलांनी " 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या (गोव्याबाहेरच्या) लोकांची दृष्टी जेव्हा बदलतात.." अशा स्वरुपाची नाराजी व्यक्त केली आहे; मी महाराष्ट्रातल्या ज्या भागतून येतो तेथे मी गोवेकर मुली अथवा स्त्रीयांबद्द्ल कोणतीही नकारात्मक अयोग्य भावना कधी ऐकली अथवा पाहिली नाही, परंतु एका स्त्रीला जेव्हा दुसरी स्त्री अनुमोदन देते आहे तेव्हा काही शहरातील काही समुह गटांकडून असा त्रास होत असला पाहीजे.
गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा
घरात माणसे कमी
अन लोक वाढतात
तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते!
घरात नव्याला सूज येते
अन जुन्याचे कुपोषण होते
तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!
घरात वाचणारे कमी
अन वाचाळ जास्त होतात
तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो!
घरात आवाज कमी
अन गोंगाट जास्त होतो
तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो!
घरात हवे ते कमी
अन नको ते जास्त येते
तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते!
घरात दिवस कमी
अन रात्री जास्त होतात
तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?)