माझ्या मराठी भाषेची ......
माझ्या मराठी भाषेची किती अभेद्य बांधणी
किती तोडाल लचके ही तर रणाची रागिणी
माझ्या मराठी भाषेची करा एकदा भेट
तुम्हा गवसेल जगण्याची नवी पायवाट
माझ्या मराठी भाषेत साऱ्या भावनांचे रंग
खोली सागराची गोडव्यात वर प्रेमाचा तरंग
माझ्या मराठी भाषेत भक्ती शक्तीचा मिलाप
अभंग भारुडा संगे गुंजतो पोवाड्याचा आलाप
माझ्या मराठी भाषेची माया तुम्हा काय सांगू
आई माझ्या सोबती जगी काय मांगु