झाडीबोली गझल - " बदल "
किती कोसावर कोनाची कहानी बदलते
नदी वाह्यत जाते सयरात पानी बदलते
कई बदलन का रस्ता आपला वैनगंगा?
बदलते चुलबन, चन्दन अन् कठानी बदलते
तुयी ताकत काउन त्याच्या गुलामीत जाते?
इस्यारा कर तू बाप्पू, राजधानी बदलते
उधारीची जिनगी जगला तई थो समजला
उधारीच्या जिनगीवर का जवानी बदलते?
इस्यारा समजन का थो पारधी, जंगलाचा?
निस्याना हुकला होता, थो मचानी बदलते
* कई = कधी
* थो = तो
* चंदन, कठानी आणि चुलबन(चुलबंद) ह्या वैनगंगेच्या उपनद्या आहेत. बाकी सगळे सोपे आहेच.
