..कुणी दार माझे ठोठावले..
उगा आग्रहाने बोलावले.
किती आज तेही सोकावले.
कुठे चोर दडला अकस्मात तो?
कुणी दार माझे ठोठावले..!!!
पुन्हा झूळुकिशि सख्य सांधले
पुन्हा एक वादळ घोंघावले.
तिचे बेत होते,तिला धार्जिणे.
तिने बेत माझे धुडकावले.
चितेला म्हणालो आईच तू!
किती छान मजला जोजावले.!
थव्यामागुनि निघाले थवे
कुणी दगड आत भिरकावले?
असो देव वा तू तत्सम कुणी.
असे कोण मजला रे पावले?
किती काळ मजला झुंजावले
अता दु:ख माझे थंडावले.!
जुन्या वेदनेने लळा लावला
सुखाला नव्या मी हुसकावले!