गझल

वाट वेगळी तिथेच नक्की झाली

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
15 Aug 2016 - 9:56 am

जगात साऱ्या ओळख पक्की झाली
या देशाची खूप तरक्की झाली

हाती मोठे घबाड आल्यावरती
नियत आपली चोरउचक्की झाली

दोन दिशांनी आलो होतो आपण
वाट वेगळी तिथेच नक्की झाली

दाणादाणा जमवीत आली जनता:
पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली

पाउल माझे तेव्हा चुकले आहे
नजर तुझी जेव्हाही शक्की झाली

डॉ. सुनील अहिरराव

gazalहे ठिकाणकलाकवितागझल

बेशिस्त

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
14 Aug 2016 - 11:58 am

पाहून वाट शेवटी पुढे निघून गेलो
मी माझे आयुष्य थोडे जगून गेलो

थांबण्याचा शब्द होता जरी दिलेला
पावलांचे ऐकून बेवफा वागुन गेलो

गुस्ताख आठवणींचे वादळ आंधळे
आधार काडीचा घेऊन तगून गेलो

शब्दांत माझी शिस्त मी सांभाळलेली
पण आज बेशिस्त थोडी भोगून गेलो

- शैलेंद्र

gazalगझल

कोणते माझे वतन होते

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
11 Aug 2016 - 7:21 pm

रोज थोडे उत्खनन होते
ऱोज नात्याचे पतन होते

आळ हा गंभीरही नाही
पण चरित्राचे हनन होते

दोष वणव्याला कसा द्यावा
जर इथे गाफील वन होते

कोणत्या दुनियेत मी आलो
कोणते माझे वतन होते

कोठल्या मातीतुनी येते
जिंदगी कोठे दफन होते

डॉ.सुनील अहिरराव

gajhalgazalमराठी गझलहे ठिकाणकवितागझल

मला आवडलेला शायर- राहत इंदोरी

सुंड्या's picture
सुंड्या in जनातलं, मनातलं
28 Jul 2016 - 12:03 am

रात्रीचा एक वाजला होता दिल्लीच्या जीयासराय मधील अष्टशीला निवासाच्या २ऱ्या तळावरील चवथ्या रूममध्ये मी, माझा रूम पार्टनर संतोष, आणि दोन ‘शेजारी’- बाजूचे ‘प्रधानजी’ आणि वरच्या रूममधला संदीप असे तिघे चकाट्या पिटत होतो (संतोष फक्त ऐकायचा).प्रधानजींनी संदीपची काहीतरी चिमटी काढली आणि संदीपने सहज उत्स्फूर्त आवाजात हे म्हणन सुरु केलं-

उसकी कत्थई आंखो मे है जंतर-मंतर सब,
चाकू-वाकू छुरीया-वूरीया खंजर-वंजर सब

जबसे तुम रुठी हो मुझसे रुठे रुठे से राहते है,
तकिया-वकीया चादर-वादर बिस्तर-विस्तर सब

गझलआस्वादअनुभव

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
19 Jul 2016 - 1:36 am

गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे... गोड मानून घ्यावी.

***********************

तुमचे शेतकरी नेते, तुमच्याच तोंडास पुसती पाने | दोष सगळे मात्र, असंवेदनशील शहरी लोकांचे |
शेतीतून मंत्र्यास होती, कोटींचा फायदा | तुला नाही वावडे, अशा दांभिकपणाचे |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, फुकट सहानुभुती मिळवण्याचे ||

अभय-काव्यअभय-गझलअभय-लेखनकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागपुरी तडकाभूछत्रीमराठी गझलवाङ्मयशेतीनाट्यगझलविनोद

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
6 Jul 2016 - 9:00 pm

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे
मोक्षाकडे निघावे ठरवून माणसाने

gajhalअभय-काव्यमराठी गझलकवितागझल

गझल - आणि हा खेळ झाला

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
27 Jun 2016 - 11:24 am

जरा हासलो आणि हा खेळ झाला
तुझा भासलो आणि हा खेळ झाला

तसा संयमी नित्य मी राहणारा
जरा त्रासलो आणि हा खेळ झाला

मला वाटले वेळ आलीच होती
तरी वाचलो आणि हा खेळ झाला

मला मोडणे मान्य होते तरीही
पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला

जरा शेवटी हात जोडावयाला
उभा ठाकलो आणि हा खेळ झाला

अता थांबता येत नाही अपूर्व
जरा धावलो आणि हा खेळ झाला

- अपूर्व ओक

मराठी गझलकवितागझल

.मला मात्र पत्नी गोरी हवी..

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
11 Jun 2016 - 2:12 pm

..मला मात्र पत्नी गोरी हवी..
-------------------------------------
तशी शक्यतोही कोरी हवी.
मला मात्र पत्नी गोरी हवी

जरा घेऊ वीम्याचा फायदा.
घरी एक साधी चोरी हवी.

( मला चोर अट्टल मानेन मी.
तिच्या स्पंदनांची चोरी हवी..)

असे एक संधी निसटायची.
जवळ फक्त बळकट दोरी हवी.

तुला भोगतो मी की तू मला?
कशाला हि मग शिरजोरी हवी?

हुश्श..आत घुसलो मी शेवटी
नको आणखी घुसखोरी हवी

किती प्रेम त्याचे काट्यांवरी
सरण म्हणुन बाभळिबोरी हवी.
---------------------------
+ कानडाऊ योगेशु

कवितागझल

..तुझे टाळतो मी अताशा शहर..

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
4 Jun 2016 - 10:00 pm

++तुझे टाळतो मी अताशा शहर++
---------------------------------------------------
सुशोभीत केली जुनीशी कबर.!
स्वतः मीच केली स्वतःची कदर.

जसा बोललो आरश्याशी जुन्या
तशी घेतली मी स्वतःची खबर!

किती जीव घेतील शस्त्रे तुझी
कधी ओढणी वा कधी तो पदर

म्हणे फार होती पवित्र अधी
तिची मग बनवलीच नंतर गटर

ठरवताच पार्टी मनाने कधी
तिथे सर्व दु:खे सुखेही हजर

तसा तोच रस्ता जवळचा तरिहि
तुझे टाळतो मी अताशा शहर

दवा बनुनी येताच मृत्यु असा
उतरते तिथे जीवनाचे जहर

कवितागझल

गझल :- जंगलातले नियम इथे लावायचे

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
2 Jun 2016 - 7:35 am

मानवांस खूळ लागले धावायचे
जाणतील ते कधी, कुठे थांबायचे?

घाबरून राहिले सदा काठावरी
सांगतात आज ते, कसे पोहायचे!

'माज' जो समाज मिरवतो आभूषणे
नम्र राहुनी तिथे कसे चालायचे?

गोंधळात यारहो , तलत मी ऐकतो
शान्तिदूत रोज रोज का शोधायचे?

कोणत्या युगात ते मला नेतील रे?
'काम फ़क्त आपले खुळ्या चालायचे'

टांगतील? जाळतील? भोसकतील का?
ठरवतील आज ते, कसे मारायचे

कोण तू? विचारतो कुणाला प्रश्न तू?
तो म्हणेल 'नाच!' आणि तू नाचायचे

शायरास त्या म्हणे मिळाली सूचना
शेर आपले लिहायचे, फाडायचे

गझल