BS - III गाड्यांवर भरपूर सवलती!
आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती झालंच असेल कि BS - III असणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या विक्रीवर आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल पासून बंदी घातली आहे.
त्यामुळे वाहन क्षेत्राला भरपूर तोटा होण्याचे दिसत आहे पण हा तोटा सामान्य ग्राहकाला फायदा मिळवून देऊ शकतो.
आता बऱ्याच वाहन विक्रेत्यांनी आपल्या गाड्या लवकरात लवकर विकल्या जाव्यात म्हणून अगदी १५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत सवलत दिलेली आहे!!
होंडा नवी सारखी गाडी जिचा खप आधीच कमी आहे तिच्यावर २५हजारापर्यंत सूट आहे! म्हणजे जवळपास अर्ध्या किमतीला गाडी मिळू शकते.
पण अशा गाड्या घेतल्याने भविष्यात काही तोटा आहे का?