नव्वदीच्या दशकात जी व्यक्ती इंग्रजी गाणी ऐकत असेल तिला जॉर्ज मायकल हे नाव अपरिचित असणं शक्य नाही. काहीसा पॉप, डान्स किंवा डिस्कोचा बाज असलेली या गायकाची गाणी अतिशय प्रसिद्ध झाली.
१९८७ ला आलेला त्याचा पहिला म्यूझिक अल्बम फेथ. याच्या २ अब्जाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. तिथपासून अनेकवेळा आपल्या गाण्यांमुळे किंवा इतर वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत राहिला. २५ जून १९६३ रोजी लंडनमधे जन्मलेला, ३० वर्षाची सांगितिक वाटचाल केलेला हा कलाकार काल म्हणजेच २५ डिसेंबर २०१६ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.
त्यानिमित्ताने त्याच्या काही अप्रतिम गाण्यांचे दुवे इथे द्यावेसे वाटतात.
केअरलेस व्हिस्पर - गाण्याच्या सुरुवातीच्या सॅक्सॉफोन पीसवरून कुणीही कुठूनही हे गाणं ओळखेल. प्रेमभंगाच्या भावनेची प्रभावी मांडणी.
फेथ - जॉर्ज मायकलचं अस्तित्व बॉलिवूडमधे प्रत्यक्षपणे नसलं, तरी 'पायल मेरी, जादू जगाती है' या गाण्याच्या रुपात फेथ हे त्याचं गाणं बॉलिवूडमधे आहे आणि पर्यायाने जॉर्ज मायकलही.
लास्ट ख्रिसमस - अतिशय उत्कृष्ट मेलडी. अगदी परवाच आर्चीज च्या दुकानात लास्ट ख्रिसमस ऐकलं. अजरामर गाणं. हे गाणं इतरही लोकांनी गायलं. जसं की व्हिगफील्ड या बँडने. पण लक्षात राहिलं ते जॉर्ज चंच. याचीही नक्कल झाली. अकेले हम अकेले तुम मधलं, 'दिल मेरा चुराया क्यूं'. हुबेहूब.
वेक मी अप बिफोर यू गो गो - व्हॅम या त्याच्या अँड्र्यू रिजली सोबतच्या बँडमधलं गे गाणं. अँड्र्यू ने त्याच्या पालकांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवताना वेक मी अप बिफोर यू गो या वाक्यात चुकून 'अप' दोन वेळा लिहिलं होतं. पुढे हे गाणं झालं आणि त्यात मुद्दाम 'गो' हा शब्दही दोनवेळा केला गेला.
याव्यतिरिक्त काही निवडक गाणी:
फ्रीडम ९०
वन मोअर ट्राय
मंकी
आय वाँट युअर सेक्स
प्रेइंग फॉर टाईम
जॉर्ज मायकल उत्तम गायक होता, रिबेल होता, त्याच्या बायसेक्शुअल असण्यामुळे बरीच चर्चा झाली, कॉन्ट्रोव्हर्सी झाली. अॅन्सेल्मो फेलेपा या ब्राझिलियन ड्रेस डिझायनर बरोबर त्याचे संबंध होते, पण पुढे फेलेपाला एचाअयव्ही आहे हे जॉर्जला कळल्यावर ते संपले. फेलेपा एड्स रिलेटेड ब्रेन हॅमरेजने गेला. जॉर्जचं 'जीसस टू अ चाइल्ड' हे गाणं हे त्याला समर्पित होतं. हे आणि असं बरंच काही त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जरी घडलेलं असलं, तरी एक गायक म्हणून तो नक्कीच विशेष होता. हा ख्रिसमस जरी त्याचा लास्ट ख्रिसमस ठरला असला, तरी पूर्ण फेथ निशी म्हणता येईल की त्याचं केअरलेस व्हिस्पर नेहमीच त्याच्या फ्रीडमची ग्वाही देत राहील.
प्रतिक्रिया
26 Dec 2016 - 5:40 pm | गवि
आज अतिशय दुःख झालं सकाळी बातमी वाचल्यावर. नव्वदीच्या दशकात मनावर प्रचंड प्रभाव टाकणारा गायक.
कोणीतरी धागा काढावा अशी इच्छा होतीच.
धाग्यात दिलेली सर्व गाणी अगदी "मस्ट लिसन" गटातलीच आहेत. प्रेइंग फॉर टाईम सर्वात आवडणारं.
पूर्वी कॅसिओच्या SA सीरीज कीबोर्ड्समधे SA-1 मधे वेक "मी अप बिफोर यू गो" या गाण्याचा ट्रॅक इनबिल्ट डेमो ट्यून म्हणून वापरला होता.
उल्लेख राहिलेली काही गाणी.
फादर फिगर
समबडी टू लव्ह
किलर/ पापा वॉज अ रोलिंग स्टोन
शेवटची दोन त्याने फ्रेडी मर्क्युरी (क्वीन) स्मरणार्थ लाईव्ह कॉन्सर्टमधे गायलेली.
पापा वॉज अ रोलिंग स्टोन हे मूळ "किलर" गाण्यात जोडलं आहे.
त्याचा म्युझिक व्हिडिओ वेगवेगळे डमी ट्रेडमार्क्स वापरुन बनवला आहे.
यूट्यूब लिंका जमल्या तर जोडाव्यात वेल्लाभट याही गाण्यांच्या. तुम्ही नक्कीच जाणता ही तिन्ही गाणी.
समबडी टू लव्ह या लाईव्ह व्हर्शनमधे शेवटी तो अर्धी ओळ म्हणून माईक ऑडियन्सकडे वळवतो आणि आख्खं स्टेडियम कल्लोळ करत ओळ पूर्ण करतं.
बरेच क्षण या गायकाने दाखवले.
रेस्ट इन पीस.
27 Dec 2016 - 3:18 pm | वेल्लाभट
हो गविकाका, जोडतो लिंका जरा अवधीने.
बाकी या गायकाच्या काही गाण्यांनी फार भक्कम घर केलं ह्रदयात हे मात्र खरं बोललात. बरेच क्षण दाखवले.
27 Dec 2016 - 5:30 pm | अजया
अगदी सहमत.
माझ्या काॅलेजच्या काळात आम्ही दिवाने होतो जाॅर्ज मायकेलचे.
केअरलेस व्हिस्पर्स ने वेड लावलेले दिवस ते.
काॅलेज सोशलला कायम हे गाणं वाजवायला नव्या नव्या हार्टब्रोकन लोकांना हवेच असे! तो अगदी आतून केवळ आपल्याचसाठी गातोय असं वाटायचं!
माझ्या त्या काळातल्या आठवणी लास्ट ख्रिसमस,फ्रिडम,केअरलेस व्हिस्पर्स शिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत :(
Rip George.
26 Dec 2016 - 8:25 pm | अनिरुद्ध.वैद्य
शेवटी ख्रिसमसलाच गेला :(
आर आय पी
27 Dec 2016 - 3:18 pm | वेल्लाभट
ह्म्म्म्म्म्म
27 Dec 2016 - 4:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
:(
30 Dec 2016 - 8:07 pm | मदनबाण
फार वाईट वाटलं... :(
केअरलेस व्हिस्पर - गाण्याच्या सुरुवातीच्या सॅक्सॉफोन पीसवरून कुणीही कुठूनही हे गाणं ओळखेल.
१००% सहमत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Heathens (from Suicide Squad: The Album) [OFFICIAL VIDEO]