जाऊ शकते-तीच जात!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
16 Mar 2017 - 11:33 am

म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते
अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे.
https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17310118_1814617218860381_2113214286324950828_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dd09ddc726cae9ec913d2f3f4c972085&oe=59586BDB
पण.....
'अंतर्जातीय विवाहितांच्या अपत्यांना (सरकारी कागदावर ) जात शिल्लक रहाणार नाही..किंवा आईवडिलांची अशी एकत्र मिळून त्याला ति सांगावी/नोंदवावी लागेल' असा तो आणखि वाढायलाही हवा आहे..कारण अंतर्जातीय विवाहाचा प्रमुख उद्देश जाती संस्था नष्ट करणे हाच आहे. पण सदर विवाहितांतंही आजपर्यंत अपत्त्याला फक्त बापाची जात लाउन दिली.. व आइच्या जातिला त्यात न येउ देण्याचा अप्रामाणिकपणा केलेला आहे. वास्तविक अश्या पालकांनी अपत्त्याची जात आपणहुन 'संमिश्र' सांगायला हवी. (आणी अपत्त्यातला बापाप्रमाणे "आईचाही वाटा" स्विकारायला हवा. )

आणी संमिश्र सांगायला हवी म्हणजे समाजात तरी 'तसं बोलायला' सुरवात करायला हवी. कायद्यानी कागदावर ती कधी तशी लागायची तशी लागो. कारण तसा कायदा झाला, तरी तो आपल्या 'मनात आला' तर जात मोडेल. आणी माझ्या अपत्त्याला 'मी कोकणस्थब्राम्हणपांचाळसुतार जातिचा आहे' असं सांगता येइल. पुढे त्याचाही विवाह अंतर्जातीयच घडला तर त्याच्या अपत्त्याची जात 'कोकणस्थब्राम्हणपांचाळसुतार+पुढे जो जोडिदार असेल त्याची जात' अशी सांगावी लागेल. आणी त्याचाही विवाह बहुश: आपोआप अंतर्जातीयच घडेल कारण त्याला 'कोकणस्थब्राम्हणपांचाळसुतार' असा दुसरा नामातसमानजातीजोडिदार (लगेच¡) मिळणारच नाही.आणी आपोआप किंवा पर्याय न राहिल्यामुळे विवाह अंतर्जातीयच घडेल.आणी जातीसंस्थेचं हे लचांड वाय्रावर उडणाय्रा धुळीसारखं सहज उडून जाइल. शिवाय जात सांगायला जड आणी समाज व्यवहारात निरर्थक झाल्यामुळे अश्या अपत्त्याला 'फक्त हिंदू' म्हणून सहजपणे रहाता/जगता येइल. (कारण जात हा घटक अनैसर्गिक/क्रुत्रिम पण सांस्कृतिक आहे. आणी हिंदूसमाजात तरी संस्कृति किंवा सांस्कृतिकता भरपूरप्रमाणात 'एकसमान' आहे)
शिवाय यामुळे हिंद्वेतर धर्मसमूहांना या 'फक्त हिंदू'ची दखलंही घ्यावी लागेल.
तद्वतच फुर्रोगामी आणी डाव्याउजव्या विचारवंतांचे-›दंभाचे (भारतीय)मार्केटंही बरेचसे आपोआप कोसळून पडेल. आणी
जातीनिर्मूलनाचा हा असा नवीन पायंडा पडला, तर आंम्हिही अभिमानाने म्हणू शकू.. "जाऊ शकते-तीच जात!"

संस्कृतीधर्मसमाजविचारबातमीमत

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 Mar 2017 - 12:03 pm | प्रचेतस

ओक्के.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2017 - 12:08 pm | अत्रुप्त आत्मा

ठिक्के!

शैलेन्द्र's picture

16 Mar 2017 - 12:08 pm | शैलेन्द्र

काढा जाती,
चागला कायदा

विशुमित's picture

16 Mar 2017 - 12:26 pm | विशुमित

मी तर म्हणतो जातीचे आरक्षण कमी करून अंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आरक्षण द्या. काय म्हणताय?

(खंत : आरक्षण नसले तरी चालेल पण जात काही सोडणार नाहीत बरेच महाभाग. असो!! )

हेमंत८२'s picture

16 Mar 2017 - 12:34 pm | हेमंत८२

कितीही कोणी काही केले तर जात काही जात नाही..आपण फक्त म्हणतो.

आणि आरक्षण बंद केले तर चालणार नाही का?

जे अंतरजातीय विवाह स्वत:हुन करतात त्यांच्यासाठी ठिक आहे, परंतु जे लोक हे करण्यास तयार होणार नाहीत त्यांच्यासाठी जात नामशेष करण्या आधी पोट-जात हा भेद नष्ट करणे सोप्पे आहे, म्हणजे असं कि प्रत्येक जातिला चारदोन पोटजाती आहेत आणि त्यांच्यामधे विवाह संबंध होत नाहीत व उच्चनिचता सुद्धा पाळली जाते, तर अशा लोकांना जातीअंतर्गत पोटजातीमधे विवाह करण्यास प्रोत्साहित केले जावे. म्हणजे पोटजातभेद मिटले जातील व त्या पुढची पायरी असेल जात निर्मुलनाची.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2017 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा

@तर अशा लोकांना जातीअंतर्गत पोटजातीमधे विवाह करण्यास प्रोत्साहित केले जावे. म्हणजे पोटजातभेद मिटले जातील व त्या पुढची पायरी असेल जात निर्मुलनाची. ››› हे घडतंही आहे.. पण मग जाती अंतर्गत जाती नष्टतेसाठी अश्या जोडप्यांनी तीच वरील समाजात संमिश्र जात सांगण्याची अट पाळायला हवी. कारण जातीचं मी केलेलं प्रकटन, हेच तीच अस्तित्व आहे. म्हणून ही नवी काला घडवून आणणारी जात सांगितली जायला हवी. उदा- को. ब्रा+ दे. ब्रा जोडप्यानी आपल्या अपत्याची जात 'कोकणस्थदेशस्धब्राम्हण' अशी सांगायला हवी. त्यालाही हीच जात सांगण्याची सवय लावायला हवी. इतेकच नव्हे तर अश्या जातीनिर्मूलन इच्छूक जोडप्यांनी अपत्त्यांना आंण्णाव देखील आईबापांच्यातलं अर्ध+अर्ध= एक करून लावायला द्यायला हवं. मग ते हास्यास्पद अगर कसंही वाटो/होवो. मी माझ्या अपत्त्याला तू तुझं अण्णाव दिवेराव किंवा भालेकर असं हवं ते निवड ,असं जरूर सुचवेन.

प्रचेतस's picture

17 Mar 2017 - 7:57 am | प्रचेतस

आंण्णाव / अण्णाव म्हणजे काय?

सतिश गावडे's picture

17 Mar 2017 - 11:15 am | सतिश गावडे

स्वताच्या मनात आलं म्हणून काहीही अण्णाव लावून चालत नाही, बदलायचं असेल तर तसं प्रतिज्ञापत्र करावं लागतं कोर्टात.

फ्लेक्सवरच्या हायफन पाटलांनाही कागदोपत्री आपले आहे तेच आडनाव वापरावे लागते. :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2017 - 12:00 pm | अत्रुप्त आत्मा

@ प्रतिज्ञापत्र करावं लागतं कोर्टात.››› बरोब्बर! ते केलं जाणारच.

त्याने नेमके काय साध्य होईल?

लोकांना कळेल की आपण किती पुढारलेल्या विचारांचे आहोत.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2017 - 5:16 pm | अत्रुप्त आत्मा

वैचारिक आणी आचरिक दळिद्री आहोत,हे असं दाखवून देण्यापेक्षा ते बरं!

वैचारिक आणी आचरिक दळिद्री आहोत,हे असं दाखवून देण्यापेक्षा ते बरं!

काय सांगता!! आम्हाला तुमच्या या स्वघोषित हिंदुधर्मसुधारकभावनेचा नेहमीच आदर वाटत आलेला आहे. बाकी सर्व मिपाला माहित आहे, कोण किती पुढारलेलं आहे ते. =))

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2017 - 6:36 pm | अत्रुप्त आत्मा

@बाकी सर्व मिपाला माहित आहे, कोण किती पुढारलेलं आहे ते. ››› पण तुला माहित व्हायचं आहे अजून! ते कळेल तेंव्हा लपायलाही जागा सापडणार नाही तुला. अख्ख्या जगात.

पण तुला माहित व्हायचं आहे अजून! ते कळेल तेंव्हा लपायलाही जागा सापडणार नाही तुला. अख्ख्या जगात.

लपायला? =)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2017 - 7:30 pm | अत्रुप्त आत्मा

चालू द्या.. आता.

ते चालू देऊच हो. बाकी तुमचे लपायचे वैगरे फिल्मी ड्वॉयलॉक टाकून तुम्ही जी काही शोभा वाढवली आहे, त्याला तोड नाही

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2017 - 7:54 pm | अत्रुप्त आत्मा

मससससस्त! जमतय.. जमतय! येउ दे अज्जुन!

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2017 - 1:52 pm | टवाळ कार्टा

"फ्लेक्सवरच्या हायफन पाटलांनाही"

जब्रा

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2017 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायफन पाटील ! =)) =)) =))

भारी ! मराठीत एका 'हाय(ली) फनी' शब्दाची भर पडली आहे :) ;)

विषय सविस्तर बोलण्यासारखा आहे. नंतर प्रतिसाद देतो.

बापाच्या जातीचा येड्यागत गर्व बाळगणारा, आंतरजातिय विवाहातून जन्मलेला एक मनुक्ष्य ओळखीचा आहे. त्यामुळे अश्या विवाहांमुळे जाती मोडतात हे पटत नाही. अर्थात माझा सँपल सेट छोटा आहेच.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2017 - 2:10 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यामुळे अश्या विवाहांमुळे जाती मोडतात हे पटत नाही. ››› सांप्रत काळात त्या मोडत नाहिच्चेत,हे अगदी खरं आहे. पण मी वर म्हणतो तश्या प्रयत्नांनी त्या मोडायचा एक मार्ग नक्कीच उपलब्ध राहिल.

चौकटराजा's picture

16 Mar 2017 - 2:16 pm | चौकटराजा

गुर्जीचा आताच फोन आला त्यानी म्हणे प्रतिज्ञा केली आहे. " आंतरजातीय विवाह फक्त १० रूपयात तर आंतर्राष्ट्रीय फक्त १ लावून देईन "

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2017 - 2:21 pm | अत्रुप्त आत्मा

अरे व्वाह! वंदनीय गुर्जी .

पण कोण हो हा ?

सतिश गावडे's picture

16 Mar 2017 - 9:13 pm | सतिश गावडे

आंतरजातीय विवाहात वधू वर एकाच धर्माचे - जातीचे असतील तरीही १ रुपया का? :)

बाकी अशी ऑफर कुठलेही गुरुजी देणार नाहीत. आधी पोटोबा मग समाज सुधारणा :)

अंतरजातीय विवाह म्हणजे कोणते विवाह?? अंतरधार्मिक विवाह पण यात येतात का?? चित्रात दाखवल्याप्रमाणे जर इथे अर्थ घेतला गेला आहे तर तोडगा निघणे अशक्य आहे. जर तोडगा म्हणुन हा कायदा पास झाला तर हा पुर्णपणे एकतर्फी होऊन हिंदुवर अन्याय होत नाही का??म्हणजेच सोनाली ची सानिया होउ शकते पण सानियाची सोनाली?? मुस्लिमांसाठीच्या साध्या एका कायद्यात बदल न करु शकणारी लोकशाही वा सरकार हिंदु धर्मात इतके बदल करुन काय हासिल करणार??!! हा बडगा सर्वांना लागुच होताना दिसत नाही.

@आत्मबंध, मुस्लिम लोकांमध्ये पण जाती असतात असे ऐकून आहे. त्यांनाही हा कायदा लागू आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2017 - 7:52 am | अत्रुप्त आत्मा

नाही. अस बातमीत म्हणलेलं दिसतय.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Mar 2017 - 10:13 am | llपुण्याचे पेशवेll

आंतर जातीय विवाह आणि जात हे समीकरण भारतात नवीन नाही. पुराणांत देखील अनुलोम, प्रतिलोम विवाहचे दाखले दिसतात. परंतू काय त्याने वर्ण व्यवस्था मोडीत निघाली नाही. जिथे माणसाची प्रवृत्तीच दुसर्‍याला आपल्यापेक्षा कमी लेखून स्वतःला मोठे लेख्ण्याची आहे तिथे जात/वर्ण व्यवस्था ही दुसरे रूप घेऊन शिल्लक राहणारच. बाकी चालूद्या.

सगळं हिंदुंसाठीच का? धमक असेल तर अपसव्यलिपी वाल्यांत बदल घडवून दाखवा.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2017 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा

तेच तर! त्यांची गटारात खेळण्याची सवय मोडवून दाखवा,तरच आंम्हिही लोळायचे बंद करू! म्हणजे आमची वैचारिक वागणूकितली उंची कळून येइल.

विशुमित's picture

17 Mar 2017 - 5:34 pm | विशुमित

मी हसून हसून लोळलो...

संजय पाटिल's picture

17 Mar 2017 - 6:02 pm | संजय पाटिल

मीपण....

सूड's picture

17 Mar 2017 - 6:14 pm | सूड

वाह!!

श्रीनिवास टिळक's picture

17 Mar 2017 - 6:35 pm | श्रीनिवास टिळक

जात जाऊ शकत नाही कारण ती आलीच नाही. जात जन्मजात आहे. जाती व्यवस्थेबद्दल सध्या प्रचलित असलेली विकृत माहिती, जी साधारण दोनशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी अस्तित्वात आणली, ती मात्र आली तशी जाऊ शकते. या विषयी अधिक माहिती आणि विवेचन या दोन दुव्यांवर मिळेल (१) tp://ichr.ac.in/Lecture_9th.pdf
(२) http://indianexpress.com/article/india/india-news-india/ichr-lecture-ind...