विचार

ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार

सुधीर वैद्य's picture
सुधीर वैद्य in जनातलं, मनातलं
4 Jan 2016 - 8:25 am

ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार

ठष्ट हे ज्वलंत नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन.

नाटकाचा विषय:

नाट्यसमाजविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादसमीक्षालेख

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग १)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
3 Jan 2016 - 6:55 pm

सध्या जी ए कुलकर्णी काढलेत पुन्हा वाचायला. आज पिंगळावेळ काढलं होतं.ऑर्फिअस, स्वामी आणि यात्रिक या त्यातल्या माझ्या आवडत्या कथा. ऑर्फिअस तर नेहमी हलवून सोडते. ऑर्फिअसची माझी ओळख झाली ती सातवी की आठवी मधल्या इंग्रजीच्या धड्यामुळे. Orpheus and Euridice. बर्वे बाई होत्या शाळेत इंग्रजीला आणि क्लासला ऐनापुरे बाई. छान शिकवायच्या दोघी. हा धडा काही फारसा आवडला नव्हता, पण त्यातल्या ऑर्फिअसची देवाने केलेली कोंडी मनात कुठेतरी बोचली होती. ग्रीक शोकांतिकेची पहिलीच भेट आणि तितकीशी न आवडलेली. ही कथा म्हटलं तर प्रेमाची. म्हटलं तर असफल प्रेमाची. म्हटलं तर न होऊ शकलेल्या संसाराची.

कथासाहित्यिकसमाजविचारआस्वादलेखविरंगुळा

Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे

सुधीर वैद्य's picture
सुधीर वैद्य in जनातलं, मनातलं
3 Jan 2016 - 9:59 am

४४१) Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे

Selfie - सेल्फी हे नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन.

नाटकाचा विषय:

नाट्यविचारप्रतिक्रियासमीक्षालेखमत

विश्वाचे आर्त - सिंहावलोकन

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
3 Jan 2016 - 5:59 am

ही लेखमाला लिहिण्यामागचा उद्देश काय, तिचा आवाका काय, तीमधून मला काय सांगायचं आहे, ती कधी संपणार असे काही प्रश्न उपस्थित झाले. आत्तापर्यंत दहा भाग प्रसिद्ध करून झालेले आहेत. तेव्हा काही काळ थांबून मागे वळून पाहात या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ही वेळ योग्य वाटते.

ही लेखमाला लिहायला सुरूवात करण्याआधी मला नक्की काय लिहायचं आहे यापेक्षा मला नक्की कशाप्रकारे आणि कशासाठी लिहायचं आहे याबद्दल काही स्पष्ट कल्पना होत्या. त्या मी त्यावेळी लिहूनही काढल्या होत्या. त्यातलं काय नक्की साध्य होतं आहे, किती यश मिळतं आहे हे वाचकच सांगू शकतील.

मला नक्की काय लिहायचं आहे?

विज्ञानविचार

स्पंदने आणि कवडसे - बदल हा निसर्गाचा नियम आहे.

सुधीर वैद्य's picture
सुधीर वैद्य in जनातलं, मनातलं
2 Jan 2016 - 8:37 am

स्पंदने आणि कवडसे

आपल्या मनात अनेक विचार व त्याची स्पंदने येत असतात. स्पंदने म्हणजे vibrations, मनातील कंपने. काही विचार मनात घर करतात. वाचताना - दुसऱ्याशी बोलताना हि विचारधारा सुरु होते आणि काही काळ मनात हि विचारांची कंपने जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात.

ह्याच भावनेतून जन्मलेले हे वाक्य आहे आणि ते अनेक लोकांच्या बाबतीत सत्यही आहे असे मला वाटते.

---------------------------------------------------

शब्दार्थविचार

कळसूत्र आणि Life of Brian

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
31 Dec 2015 - 6:41 pm

काजळमाया हे जी ए कुलकर्णींचे एक पुस्तक. लहानपणी वाचलेले. नंतर विसरलेलो. पुन्हा वाचायला घेतले. काल त्यातली कळसूत्र ही कथा वाचत होतो.

धर्मवाङ्मयमुक्तकसमाजविचारलेखविरंगुळा

४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे:

सुधीर वैद्य's picture
सुधीर वैद्य in जनातलं, मनातलं
31 Dec 2015 - 6:26 pm

४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे:

प्रत्येक माणूस आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवत असतो. ध्येय निश्चित करताना स्वत:ची कुवत (ability ) लक्षात घेणे जरुरीचे असते. तसेच ध्येय सिद्धीसाठी अपार श्रम आणि जोडीला कमीतकमी नशीब आवश्यक असते.

काहीवेळा ध्येय अपेक्षेप्रमाणे साध्य होते. काही वेळा प्रयत्न करून सुद्धा, अपेक्षित यश हुलकावणी देत राहते. यश किंवा अपयश ह्याची गाठ घालणारे नशीब असते. अपयश आले तरी माणूस प्रयत्न सोडत नाही पण यश मिळाले नाही तर मात्र कालांतराने निराश होतो.

समाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिक्रियासमीक्षामतसल्लाप्रतिभा

एकटा

सुधीर वैद्य's picture
सुधीर वैद्य in जनातलं, मनातलं
31 Dec 2015 - 6:23 pm

एकटा

प्रत्येक माणसाच्या मनाच्या कोपऱ्यात एकाकी पणाची भावना असतेच. तुम्ही मान्य करा अथवा नका करू.

समाजविचार

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
31 Dec 2015 - 1:52 pm

कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं .

मांडणीसंस्कृतीसमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाआस्वादसमीक्षामत