संस्कृती आणि धर्म यातील गल्लत
सर्वसाधारपणे संस्कृती आणि धर्म यांची बेमालुम सरमिसळ दैनंदिन मानवी व्यवहारात एवढी सवयीची झालेली असते की वस्तुतः संस्कृती आणि धर्म या बाबी भिन्न असू शकतात याकडेच मुळी दुर्लक्ष होऊ शकते. संस्कृती आणि धर्म हे एकमेकांवर प्रभाव पाडत असतात ते सहाजिक असते. धर्मसंस्था संस्कृतीतील त्यांना वाटणार्या काही सांस्कृतीक गोष्टी त्याज्य ठरवते काही नव्याने जोडते उर्वरीत संस्कृती जशीच्या तशी स्विकारली जाते. उर्वरीत संस्कृती जिचा धार्मीक तत्वाशी प्रत्यक्षतः संबंध नाही तरी सुद्धा ती त्या धर्माची ओळख आहे असा भास निर्माण होऊ शकतो.