ऋतू प्रेमाचा ( अंतिम )
साधू संत महात्याम्यानी 'प्रेम करा, प्रेम करा, असे सांगितले आहे; खरे पण पण प्रेम म्हणजे काय माणसाना कळत नाही ते जर त्यांना कळले आसते ; तर प्रेमाविषयी पोकळ वल्गना कुणी केल्या नसत्या. प्रत्येकजन स्वत:च्या प्रेमभावनेला श्रेष्ठ समजत आसतो. तुझ्यासाठी जीव देईन तुझ्यासाठी जगाला ठोकर मारेन , अशा राणाभीमदेवी गर्जना सरार्स प्रेमिकाकडून केल्या जातात. आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करू शकू , असे प्रत्येक स्त्रीला वाटत आसते व तसे ती वारवार बोलून दाखवत आसते; पण तिला आढळून येते कि, तिचे प्रेम किती तकलादू व कमजोर आहे.