भलतेच खूश होवू नका !

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
23 Dec 2015 - 9:43 pm

.
पॅरीसवर हल्ला झाला त्याची प्रतिक्रिया म्हणून अमेरीकेच्या अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांची प्रतिक्रिया आली. अमुक तमुक समाजाला अमेरीकेत प्रवेश करायला बंदी केली पाहीजे. अगदी पर्यटक म्हणूनही येऊ देवू नये. भारतातले अनेक नागरीक यामुळे जाम खूश झाले. भारत ज्या दहशतवादाचा सामना करत आहे त्यात अमेरीकाही आता सामील होणार. अमेरीकेशी हातमिळवणी करुया. अशी काहीशी भावना होती. पण अमेरीका किती विश्वासार्ह आहे याची या भोळ्या भारतीयांना कल्पना आहे का ? आज अमेरीकन्स ज्या प्रदेशावर हक्क सांगतात तिथे ते उपरे आहेत. तिथल्या मूळ रहीवासी रेड इंडीयन्सचा त्यांनी वंशविच्छेद केला आहे. आफ्रिकेतून जनावरे पकडून आणावीत तशी माणसे त्यांनी पकडून आणली आणि गुलाम म्हणून वापरली. दुसर्‍या महायुद्धात अमेरीकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. प्रचंड मोठा नरसंहार झाला. पुढच्याही अनेक पिढ्या त्याची शिकार बनल्या. दुष्परीणाम लक्षात आले(निदान काही दिवसातले) तरीही अमेरीकेने काही दिवसात नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला. या झाल्या इतिहासातल्या गोष्टी.

अल कैदा जगभरात आतंक माजवते. पण तिला जन्माला कुणी घातले. तिला कुणी पोसले. लादेनला संपवताना अमेरीकेने दहशतवाद संपवण्याचा फार मोठा आव आणला तरी तो खोटा होता कारण लादेनला मूळात त्यांनीच मोठे केले. लादेन हा सिनीयर बुश यांचा बिझनेस पार्टनर होता. अफगाणिस्तानमधे रशियाला शह देण्यासाठी अमेरीकेनेच त्याला मोठे केले. रशिया पडल्यावर अमेरीकेला त्याची गरज वाटेनाशी झाली. सद्दामला अमेरीकेनेच मोठे केले. नंतर काही आरोप ठेवून त्याला संपवले. हे आरोपही खोटे होते हे अमेरीकेने मान्य केले. इराकमधे जाऊन तिथल्या राष्ट्राध्यक्षाला अमेरीका संपवू शकत असेल तर आयसिसलाही अमेरीकेची मदत असेल हे अशक्य नाही. सिरीया लिबीया इजिप्त इथे लढणारे हात वेगळे असले तरी त्यामागचे मेंदू अमेरीकन आहेत. असे म्हणायला वाव आहे.
पाकिस्तानच्या दहशतवादाचा आपल्याला त्रास भोगावा लागतो. त्याविरुद्ध आपण आवाजही उठवतो पण पाकिस्तानल मदत देणार्‍या अमेरीकेविरुद्ध ब्र काढण्याचीही आपली हिम्मत होत नाही.
मनमोहनसिंग पंतप्रधान होते. देशाच्या चाव्या मनमोहनसिंग यांच्याकडे होत्या. मनमोहनसिंग यांना खूश ठेवण्यासाठी त्यांच्या विरोधी पार्टीतल्या मोदींना अमेरीकेने व्हिसा नाकारला. मनमोहन पायउतार होवून मोदी येताच व्हिसा मिळाला. मोदी अनेकदा अमेरीकेत गेले. अमेरीका अशा सोयीस्कर भूमिका घेत असते.

त्यामुळे दहशतवादाविरुद्धची लढाई आपली आपल्यालाच लढावी लागणार आहे. इतरांवर विसंबून राहता येणार नाही. अमेरीकेवर तर नाहीच नाही.

धोरणविचार

प्रतिक्रिया

ह्या डोनाल्डची ट्रम्पेट वाजण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे.
असो लेख आवडला!
जेब बाबाचं ब्याड लक, दुसरं काय?
क्रिस्टी आधी फुल्ल फॉर्मात होता

आशु जोग's picture

13 Nov 2016 - 6:41 pm | आशु जोग

अमेरिकन शादी में भारतीय अब्दुल्ला दिवाना

अरिंजय's picture

23 Dec 2015 - 10:53 pm | अरिंजय

बरोबर बोलले भाऊ.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2015 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा

पांडू मोड ऑन ...

असं झालं तर ते सगळं!

पांडू मोड ऑफ ...

उगा काहितरीच's picture

24 Dec 2015 - 1:11 am | उगा काहितरीच

जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला...

आशु जोग's picture

24 Dec 2015 - 3:32 pm | आशु जोग

खरंय

होबासराव's picture

24 Dec 2015 - 11:09 pm | होबासराव

खिलजीच्या वेळी अमेरीका होती का ? औरंगझेब महाराष्ट्रात येऊन क्रौर्य दाखवत होता, हाल हाल करीत होता तेव्हाही अमेरीका होती का...

आसामात दंगा होतो... तिथे अमेरीका असते का
आझाद मैदानात ... महीला पोलिसांची विटंबना होते...तिथे अमेरीका असते का
भिवंडीत पोलिसांची हत्या होते......तिथे अमेरीका असते का
जर्मन बेकरी स्फोट....तिथे अमेरीका असते का
मुंबई रेल्वे स्फोट...तिथे अमेरीका असते का
२००१ पुणे दंगल...तिथेही अमेरीका असते का
औरंगजेबाने लावलेला जिझिया कर...तिथे अमेरीकेचा हात असतो का
अफगाणिस्तानात ४० वर्षाचे तालिबानी ९ वर्षाच्या पोरीबरोबर लगीन लावतात...तिथेही अमेरीका असते का
जोरावर सिंग फतेहसिंग यांना भिंतीत चिणून मारलं जातं...तिथे अमेरीका असते का
अमेरीकेने शिकवायला हे आतंकी देश आणि लोक काही कुक्कुलं बाळ आहेत का

अमेरीका...अमेरीका...अमेरीका... सगळीकडे कशी अमेरीका असते. आम्हाला प्रश्न पडतो.

http://www.misalpav.com/node/32390

तुमचाच लेख आहे.... ऑगस्ट मधला...आता आम्हाला प्रश्न पडलाय इतका विरोधाभास का ?

आशु जोग's picture

25 Dec 2015 - 12:32 am | आशु जोग

कशाशी काय कंपेरायचं ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

खिलजीच्या वेळी अमेरीका होती का ? हा प्रश्न तुम्हाला अजूनही पडला असेल तर... काय बोलणार

हाव दा (दा आणि तु जोग ?)
तेच स्वातंत्र्य वापरलय बघ.

आशु जोग's picture

27 Nov 2019 - 4:09 pm | आशु जोग

दोन्ही ठिकाणी अमेरीका नाकारली आहे होबासराव

आपल्याला तिची मदतही नकोय आणि एरवी काम करताना अडचण सांगणेही नको. अडचण सांगणे हे झाकीर नाईक यांच्यासारख्यांसाठी होते तर नंतरचे अमेरीकेकडून खूप मदत अपेक्षिणार्‍यांसाठी होते

सोत्रि's picture

25 Dec 2015 - 5:33 am | सोत्रि

:) :) :)

- (अमेरिकन विसा एक्सपायर झालेला) सोकाजी

अमेरिकेने व्हिसा नाकारला असेल त्यांना

संदीप डांगे's picture

25 Dec 2015 - 12:19 am | संदीप डांगे

हा हा हा

अर्थात.. रजनीकंतने चहा विकत घेतला तर काहि शक्य आहे...

पोल्स मधे डोनाल्ड ट्रंप पुढे आहे काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Come On Girls... ;) :- Anirudh

DEADPOOL's picture

25 Dec 2015 - 9:34 am | DEADPOOL

जेब पेक्षा दुपटिने पुढे!

आशु जोग's picture

2 Jun 2016 - 9:24 am | आशु जोग

नवीन काही घडामोडी ट्रम्प बाबाच्या ...