Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आशु जोग on Wed, 12/23/2015 - 21:43
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
.
पॅरीसवर हल्ला झाला त्याची प्रतिक्रिया म्हणून अमेरीकेच्या अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांची प्रतिक्रिया आली. अमुक तमुक समाजाला अमेरीकेत प्रवेश करायला बंदी केली पाहीजे. अगदी पर्यटक म्हणूनही येऊ देवू नये. भारतातले अनेक नागरीक यामुळे जाम खूश झाले. भारत ज्या दहशतवादाचा सामना करत आहे त्यात अमेरीकाही आता सामील होणार. अमेरीकेशी हातमिळवणी करुया. अशी काहीशी भावना होती. पण अमेरीका किती विश्वासार्ह आहे याची या भोळ्या भारतीयांना कल्पना आहे का ? आज अमेरीकन्स ज्या प्रदेशावर हक्क सांगतात तिथे ते उपरे आहेत. तिथल्या मूळ रहीवासी रेड इंडीयन्सचा त्यांनी वंशविच्छेद केला आहे. आफ्रिकेतून जनावरे पकडून आणावीत तशी माणसे त्यांनी पकडून आणली आणि गुलाम म्हणून वापरली. दुसर्‍या महायुद्धात अमेरीकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. प्रचंड मोठा नरसंहार झाला. पुढच्याही अनेक पिढ्या त्याची शिकार बनल्या. दुष्परीणाम लक्षात आले(निदान काही दिवसातले) तरीही अमेरीकेने काही दिवसात नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला. या झाल्या इतिहासातल्या गोष्टी. अल कैदा जगभरात आतंक माजवते. पण तिला जन्माला कुणी घातले. तिला कुणी पोसले. लादेनला संपवताना अमेरीकेने दहशतवाद संपवण्याचा फार मोठा आव आणला तरी तो खोटा होता कारण लादेनला मूळात त्यांनीच मोठे केले. लादेन हा सिनीयर बुश यांचा बिझनेस पार्टनर होता. अफगाणिस्तानमधे रशियाला शह देण्यासाठी अमेरीकेनेच त्याला मोठे केले. रशिया पडल्यावर अमेरीकेला त्याची गरज वाटेनाशी झाली. सद्दामला अमेरीकेनेच मोठे केले. नंतर काही आरोप ठेवून त्याला संपवले. हे आरोपही खोटे होते हे अमेरीकेने मान्य केले. इराकमधे जाऊन तिथल्या राष्ट्राध्यक्षाला अमेरीका संपवू शकत असेल तर आयसिसलाही अमेरीकेची मदत असेल हे अशक्य नाही. सिरीया लिबीया इजिप्त इथे लढणारे हात वेगळे असले तरी त्यामागचे मेंदू अमेरीकन आहेत. असे म्हणायला वाव आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाचा आपल्याला त्रास भोगावा लागतो. त्याविरुद्ध आपण आवाजही उठवतो पण पाकिस्तानल मदत देणार्‍या अमेरीकेविरुद्ध ब्र काढण्याचीही आपली हिम्मत होत नाही. मनमोहनसिंग पंतप्रधान होते. देशाच्या चाव्या मनमोहनसिंग यांच्याकडे होत्या. मनमोहनसिंग यांना खूश ठेवण्यासाठी त्यांच्या विरोधी पार्टीतल्या मोदींना अमेरीकेने व्हिसा नाकारला. मनमोहन पायउतार होवून मोदी येताच व्हिसा मिळाला. मोदी अनेकदा अमेरीकेत गेले. अमेरीका अशा सोयीस्कर भूमिका घेत असते. त्यामुळे दहशतवादाविरुद्धची लढाई आपली आपल्यालाच लढावी लागणार आहे. इतरांवर विसंबून राहता येणार नाही. अमेरीकेवर तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments
  • 7390 views

प्रतिक्रिया

Submitted by DEADPOOL on Wed, 12/23/2015 - 21:56

Permalink

ह्या डोनाल्डची ट्रम्पेट

ह्या डोनाल्डची ट्रम्पेट वाजण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे. असो लेख आवडला! जेब बाबाचं ब्याड लक, दुसरं काय? क्रिस्टी आधी फुल्ल फॉर्मात होता
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 11/13/2016 - 18:41

In reply to ह्या डोनाल्डची ट्रम्पेट by DEADPOOL

Permalink

...

अमेरिकन शादी में भारतीय अब्दुल्ला दिवाना
  • Log in or register to post comments

Submitted by अरिंजय on Wed, 12/23/2015 - 22:53

Permalink

बरोबर बोलले भाऊ.

बरोबर बोलले भाऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 12/23/2015 - 23:20

Permalink

पांडू मोड ऑन ...

पांडू मोड ऑन ... असं झालं तर ते सगळं! पांडू मोड ऑफ ...
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on गुरुवार, 12/24/2015 - 01:11

Permalink

जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा

जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला...
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 12/24/2015 - 15:32

In reply to जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा by उगा काहितरीच

Permalink

...

खरंय
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on गुरुवार, 12/24/2015 - 23:09

Permalink

खिलजीच्या वेळी अमेरीका होती

खिलजीच्या वेळी अमेरीका होती का ? औरंगझेब महाराष्ट्रात येऊन क्रौर्य दाखवत होता, हाल हाल करीत होता तेव्हाही अमेरीका होती का... आसामात दंगा होतो... तिथे अमेरीका असते का आझाद मैदानात ... महीला पोलिसांची विटंबना होते...तिथे अमेरीका असते का भिवंडीत पोलिसांची हत्या होते......तिथे अमेरीका असते का जर्मन बेकरी स्फोट....तिथे अमेरीका असते का मुंबई रेल्वे स्फोट...तिथे अमेरीका असते का २००१ पुणे दंगल...तिथेही अमेरीका असते का औरंगजेबाने लावलेला जिझिया कर...तिथे अमेरीकेचा हात असतो का अफगाणिस्तानात ४० वर्षाचे तालिबानी ९ वर्षाच्या पोरीबरोबर लगीन लावतात...तिथेही अमेरीका असते का जोरावर सिंग फतेहसिंग यांना भिंतीत चिणून मारलं जातं...तिथे अमेरीका असते का अमेरीकेने शिकवायला हे आतंकी देश आणि लोक काही कुक्कुलं बाळ आहेत का अमेरीका...अमेरीका...अमेरीका... सगळीकडे कशी अमेरीका असते. आम्हाला प्रश्न पडतो. http://www.misalpav.com/node/32390 तुमचाच लेख आहे.... ऑगस्ट मधला...आता आम्हाला प्रश्न पडलाय इतका विरोधाभास का ?
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 12/25/2015 - 00:32

In reply to खिलजीच्या वेळी अमेरीका होती by होबासराव

Permalink

...

कशाशी काय कंपेरायचं ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. खिलजीच्या वेळी अमेरीका होती का ? हा प्रश्न तुम्हाला अजूनही पडला असेल तर... काय बोलणार
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on Tue, 12/29/2015 - 02:49

In reply to ... by आशु जोग

Permalink

कशाशी काय कंपेरायचं ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

हाव दा (दा आणि तु जोग ?) तेच स्वातंत्र्य वापरलय बघ.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Wed, 11/27/2019 - 16:09

In reply to कशाशी काय कंपेरायचं ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. by होबासराव

Permalink

.

दोन्ही ठिकाणी अमेरीका नाकारली आहे होबासराव आपल्याला तिची मदतही नकोय आणि एरवी काम करताना अडचण सांगणेही नको. अडचण सांगणे हे झाकीर नाईक यांच्यासारख्यांसाठी होते तर नंतरचे अमेरीकेकडून खूप मदत अपेक्षिणार्‍यांसाठी होते
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Fri, 12/25/2015 - 05:33

In reply to खिलजीच्या वेळी अमेरीका होती by होबासराव

Permalink

=)) =))

:) :) :) - (अमेरिकन विसा एक्सपायर झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by आरोह on गुरुवार, 12/24/2015 - 23:28

Permalink

अमेरिकेने व्हिसा नाकारला असेल त्यांना

अमेरिकेने व्हिसा नाकारला असेल त्यांना
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 12/25/2015 - 00:19

In reply to अमेरिकेने व्हिसा नाकारला असेल त्यांना by आरोह

Permalink

हा हा हा

हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 12/25/2015 - 04:32

In reply to अमेरिकेने व्हिसा नाकारला असेल त्यांना by आरोह

Permalink

म्हणजे आता फक्त ट्रेनमधे चहा विकणं बाकि आहे म्हणा कि...

अर्थात.. रजनीकंतने चहा विकत घेतला तर काहि शक्य आहे...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 12/25/2015 - 08:34

Permalink

पोल्स मधे डोनाल्ड ट्रंप पुढे

पोल्स मधे डोनाल्ड ट्रंप पुढे आहे काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Come On Girls... ;) :- Anirudh
  • Log in or register to post comments

Submitted by DEADPOOL on Fri, 12/25/2015 - 09:34

In reply to पोल्स मधे डोनाल्ड ट्रंप पुढे by मदनबाण

Permalink

हो!

जेब पेक्षा दुपटिने पुढे!
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 06/02/2016 - 09:24

Permalink

...

नवीन काही घडामोडी ट्रम्प बाबाच्या ...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com