प्रकटन

अवघे धरू सुपंथ...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
26 Nov 2018 - 11:11 am

काल मला माझ्या मित्राचा हा मेसेज आला. कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या मुलांची मनोवस्था काय असेल याची कल्पना करणे शक्य नाही, पण तिच्या काळजीने पालकांची अवस्था काय होते, याची मात्र या मेसेजवरून कल्पना येऊ शकते. एका विचित्र आजाराने या मित्राची मुलगी गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहे. तिच्यावर उपचार करून तिला लवकरात लवकर या आजारातून बाहेर करण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची या मित्राची तयारी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही या आजारावरील उपचार करण्यासाठी तिला घेऊन जाण्याचीही त्याची तयारी आहे, असे त्याने मला सांगितले, आणि मला या धाग्याची आठवण झाली.

प्रकटनसद्भावनाऔषधोपचार

उद्योग/व्यापार : प्रस्तावना

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
24 Nov 2018 - 8:33 pm

मराठी माणूस उद्योग/व्यापारात मागे का? ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर?' मध्ये म्हंटल्या प्रमाणे " दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते.

प्रकटनमांडणीअर्थकारण

नाळ!

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
20 Nov 2018 - 3:45 pm

कालच 'नाळ' पाहण्याचा योग आला. सुरुवातीच्या दृष्या बद्दल आणि त्याची 'फॉरेस्ट गम्प'शी तुलना यावर बरीच चर्चा झालीय. पण हा सीन निश्चित आवडून जाईल.

'सुधाकर रेड्डी यंकट्टी' यांनी 'देऊळ', 'हायवे' आणि 'सैराट' नंतर या चित्रपटाच्या कॅमेरा सोबत दिग्दर्शनाची धुरा पण सांभाळली आहे.
पहिल्या फ्रेम पासून हा चित्रपट सिनेमॅटोग्राफी चा आहे हे लक्षात येत.
चित्रपट थेटरात बघण्यासारखाच आहे, त्यामुळे जरूर बघा आणि सुरुवात अजिबात चुकवू नका.

Spoiler alert!

प्रकटनसमीक्षामाध्यमवेधचित्रपट

कल्ला

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जनातलं, मनातलं
18 Nov 2018 - 12:52 pm

मुंबईतनं आलेलो इथे. सगळे बोललेले की लहान गावात कशाला जाताय तुम्ही म्हणून. पण हे काय लहान गाव नाही, आणि मोठं शहरपण नाय वाटत. मालाडला स्टेशनजवळ घर होतं आपलं मस्त. पोरं जास्तकरुन गुजराती. मेहुल, राजेश, निलेश अशी. थोडी आपल्यासारखी. मराठी. परब, कांबळी, करमरकर वगैरे. पण इथे सगळेच मराठी. आणि बोलायला भेंडी एका वाक्यात १-२ शिव्या तर येणार म्हणजे येणारच! शिवाय इथलं घर मोठं आहे. ४ खोल्या आहेत. मस्त एरिया आहे, झाडीबिडी आहे आजुबाजुला. शाळा आहे जरा लांब पण काय फरक पडत नाही.

प्रकटनकथा

ॲडमिशन Engineeringची : एक नाट्यछटा

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
17 Nov 2018 - 11:24 pm

लेखक : कोणी का असेना.
स्थळ : इशान्य भारतातील एक राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे कार्यालय
पात्र : सरकारी बाबू ( श्री. ना.पा. सघोडे)
पिता ( श्री. फा.र. चतापलेले)
पुत्र ( संदर्भास)
इतर सोयीनुसार

पार्श्वभुमी : अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागांचे सुयोग्य आणि यथार्थ वाटप व्हावे, म्हणून केंद्र सरकारने CSAB - NEUT ( Central Seat Allotment Board - North East & Union Territories) ची निर्मिती केली आहे. सदर प्रक्रियेनुसार जागांचे वाटप व भरती होऊन आता जवळपास दोन महीने लोटले आहेत.

प्रकटनआस्वादविरंगुळानाट्यवाङ्मयमुक्तकविनोदसमाज

अतृप्त आत्मा -१

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
15 Nov 2018 - 2:18 pm

काल रात्री अचानकच आम्हाला आम्ही निवर्तल्याचं समजलं .म्हणजे आम्ही झोपलेलोच होतो आणी आजुबाजुला थोडी कुजबुज ऐकु आली.हळुहळु कुजबुजीचं रुपांतर मुसमुसण्यात आणी नंतर गदारोळ आणी गोंगाटात झाले.त्यामुळे झोप चाळावली.डोळे उघडले तर आम्ही सिलींगला आणि द्रोण कॕमेरातुन दिसतं तसं दृष्य दिसायला लागलं. आम्ही अंथरुणातच अर्धी लुंगी वर गेलेल्या आणी भोकं पडलेल्या गंजीफ्रॉकात उताणे पडलेलो.आणी भोवती आमचे हवे नको ते सर्व नातेवाईक ,सगे संबंधी,मित्रमंडळी ,आमच्या उधार्या थकलेले बरेचसे वाणगट,गवळी ,न्हावी सगळे हजर.

ओढुन ओढुन आणलेली सुतकी तोंड .काहींच्या मनातला आनंद न दिसताही जाणवत होता.

प्रकटननाट्य

नवी सायकल आणि पहिली सेंच्युरी

mayu4u's picture
mayu4u in जनातलं, मनातलं
8 Nov 2018 - 3:12 pm

(मी पहिली सायकल घेतली तेव्हाचं हे लेखन... अलीकडेच नवीन सायकल घेतली आणि पहिल्यांदाच १०० किमी ची राईड मारली. या अनुभवाविषयी लिहिण्यासाठी सरपंचांनी सुचवलं, तेव्हा मिपाकरांच्या "सायकल सायकल" या कायप्पा समूहावर केलेलं लेखन)

श्री मामा प्रसन्न

प्रकटनअनुभवविरंगुळाक्रीडा

तोळा तोळा

लौंगी मिरची's picture
लौंगी मिरची in जनातलं, मनातलं
7 Nov 2018 - 9:23 am

ओठांवरचे शब्द बोलके
पापण्यांचे खेळ ते बालिश
तुझ्या मिठितले श्वास जिवंत
स्पंदनातुनहि बरसतो आशीष...

प्रकटनमांडणी

मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
6 Nov 2018 - 10:53 am

https://www.misalpav.com/node/42929

“डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”.....

टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला ....

ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!”

प्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाअनुभवसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्यआरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रण