मनी छंद गुलकंद
‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट नुकताच १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ढवळे आणि माने या दोन्ही कुटुंबांच्या धमाल प्रेमकहाण्या रंगवण्यात आल्या आहेत. गोष्ट अशी आहे की, ढवळे घराण्यात सई ताम्हणकर (नीता) आणि समीर चौघुले (मकरंद) हे दांपत्य सुखात राहत असून त्यांची मुलगी मीनाक्षी (जुई भागवत) आहे. माने घराण्यात प्रसाद ओक (गिरीश) आणि ईशा डे (रागिणी) हे दुसरे जोडपं असून त्यांचा मुलगा ओंकार (तेजस राऊत) आहे. मीनाक्षी आणि ओंकार यांच्या प्रेमातून दोन्ही घरांची लग्न तयारी सजते; पण लग्नाच्या पहिल्या सोहळ्यात एक धक्का बसतो – प्रसाद आणि सई हे भूतकाळातले प्रेमी होते!