कवडसे-२

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
24 Jul 2025 - 1:06 pm

कवडसे

पद्मावतीला दादा गोडसेंना भेटायला गेलो होतो. दादा म्हणजे तलवारीची धार.श्रीधर स्वामींचे शिष्य. त्यांच्याबरोबर कितीतरी वर्ष राहिलेले. आयुष्यभराची साधना. मिनिटा मिनिटाला परीक्षा घ्यायचे. त्यांच्याशी वागताना बोलताना फार जपून राहावे लागे. बहुतेकदा मी फक्त ऐकायचेच काम करायचो. अशा गप्पातून खूप शिकायला मिळायचे.
========================
तर दादा सांगत होते. अरे रायगडावर राज्याभिषेक सोहळा होता. इंदिरा गांधी आल्या होत्या. मला त्यांच्यासमोर पोवाडा म्हणायचा होता. पण भाषणे खूप लांबली. मला चान्स मिळेल का नाही माहीत नव्हते. पण मित्र म्हणाले घूस तू. चंचू प्रवेशम, मुसळ प्रवेश: मग काय? राहिलो स्टेजवर उभा नी असा आवाज लावलाय की इंदिरा गांधी खूष झाल्या. सगळ्यानी वाहवा केली.
-----------------------------------------------------------------------
बालगंधर्व शेवटच्या दिवसात गोहरबाईकडे राहत होते. ते गेल्यावर गोहरबाईने त्यांची कबर बांधली असती आणि लोक तिकडे माथा टेकायला गेले असते. मग आम्ही मित्रांनी एक युक्ती केली. बालगंधर्व गेल्यावर सरळ त्यांचा देह पळवून स्मशानातच नेल आणि हिंदू पद्धतीने संस्कार करून टाकले. बसा बोंबलत.
-------------------------------------------
दादा एकदा मुंबईत मुंबादेवीच्या दर्शनाला गेले होते. पोलिसांनी तिकडे बॅरिकेड वगैरे लावल्या होत्या आणि लोकांना लांबच्या वाटेने पाठवत होते. पण दादांना तिथूनच जायचे होते. पोलीस काही सोडेनात. तेव्हा दादांनी त्याला सुनावले ,मला माझ्या आईच्या भेटीला जाऊ देत नाहीस तू? मी स्वातंत्र्य मिळण्यापुरवी ४ वेळा आणि नंतर ४ वेळा जेलमध्ये जाऊन आलेला माणूस आहे. पहिले बायकोच्या कपाळाचे कुंकू पुसून ये आणि मग मला आडव. पोलिसांनी त्यांचा आवेश बघून त्यांना बसवून चहापाणी वगैरे विचारले आणि गुमान आत सोडले.
---------------------------------------
श्रीधर स्वामी कात्रजला मुक्कामी होते. आचार्य अत्रे तिथून जाताना दर्शनाला आले. तेव्हा अत्र्यांचे "बुवा तेथे बाया "हे नाटक जोरात होते ज्यात त्यांनी बुवाबाजीवर ताशेरे ओढले होते. ते स्वामींच्या बरोबर काहीतरी बोलत असताना स्वामींनी त्यांच्या कपाळावर अंगठा टेकवला आणि अत्रे समाधीत गेले. अर्धा पाऊण तासाने अत्रे भानावर आले आणि स्वामींना नमस्कार करून तिथून गपचूप निघून गेले.
-------------------------------------
१९९२ च्या दंगली सुरु असतानाचा काळ. मुंबईत बॉम्ब स्फोट झाले आणि इकडे पहाटे ३-४ वाजता दादांचा दरवाजा वाजला. दारात ३-४ माणसे उभी होती. दादांनी विचारले काय पाहिजे? तेव्हा त्यांनी पाणी मागितले. दादांनी ते दिले, पण त्यांच्या केव्हाच लक्षात आले होते की ते साध्या वेशातले पोलीस होते आणि हा गोडसे कुठे आहे ते बघायला आले होते. अर्थात दादा तेव्हा सक्रिय नव्हतेच पण तरीही पोलिसांच्या रेकॉर्ड वर होते. तेव्हा दादा ८५ च्या पुढे होते. त्यानी एकदा गंमत म्हणुन माझा हात पकडला आणि मला हात सोडवुन दाखव म्हणाले. मला सोडवता आला नाही.
-------------------------------------
मी एकदा बाईकवरून दादांना घ्यायला चाललो असताना सिग्नल तोडला म्हणून पोलिसांनी अडवले आणि दंड केला. ही गोष्ट मी तिकडे पोचल्यावर दादांना सांगितली. त्यावर त्यांनी "अरे चल तुला बिना सिग्नल घरापर्यंत नेतो" असे सांगून मला पद्मावती ते कोथरूड एकही सिग्नल नसलेल्या रस्त्यानी आणले. वाटेत भीमसेन जोशींचा कलाश्री बंगला लागला तेव्हा दादा म्हणाले "अरे हा भीमसेन चा बंगला, माझा मित्र आहे तो, सध्या आजारी आहे बिचारा. "

पुढेही गप्पा चालूच, "मला दिल्ली हैद्राबाद चे रस्तेही असेच पाठ आहेत. तू फक्त सांग कधी जायचे." "माझ्याबरोबर एकदा वरदहळ्ळिला शिबिराला ये, बॅटरी चार्ज होईल तुझी. " "अरे काय तुझी तोळामासा तब्येत? आईला आणि बायकोला कसे सांभाळशील?" असे काय नी काय. असो.
---------------------------------

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

24 Jul 2025 - 9:59 pm | कानडाऊ योगेशु

रोचक आठवणी.!

दादा गोडसेंबद्दल अजून वाचायला आवडेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Jul 2025 - 11:47 am | राजेंद्र मेहेंदळे

:) तिथे सांगतो

चार तास हाटिलात बसून देतात? त्यापेक्षा कुठल्या झाडाखाली करा कट्टा.

अनन्त्_यात्री's picture

28 Jul 2025 - 1:04 pm | अनन्त्_यात्री
राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Jul 2025 - 6:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

पाताळेश्वर किवा संभाजी पार्कला, मग खादाडी तिकडेच कुठेतरी

आर्या१२३'s picture

28 Jul 2025 - 2:48 pm | आर्या१२३

अप्रतिम !

छान आहेत आठ्वणी. हे वाचुन श्री दादा गोडसे यांना पाहण्याची ईच्छा निर्माण झाली. माझ्या एका मैत्रीणीच्या माहेरी पुज्य श्रीधर स्वामींची उपासना आहे.
तिने पद्मावती मठातला फोटो पाठवला. ती सांगत होती की पद्मावतीचा मठ पुर्वी त्यांचाच होता. त्यांच्या नंतर तो वरदपुर संस्थानाने घेतला.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Jul 2025 - 6:06 pm | अमरेंद्र बाहुबली

दोन्ही लेख वाचले आवडले.

कुमार१'s picture

28 Aug 2025 - 6:49 pm | कुमार१

रोचक आठवणी.!