अलविदा हिट्मॅन
सकाळी, हातात चहाचा कप आणि समोर मोबाईल. नेहमीसारखं क्रिकबझ उघडलं आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना — “रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त.”

थांबा जरा. रोहित शर्मा? हिटमॅन? ज्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडायचा, तो आता कसोटीच्या पांढऱ्या जर्सीला रामराम करतोय?
