डर्बी लाजिरवाणी (मॅन्चेस्टर युनायटेड च्या पराभवाचं गीत)
काल गजर लावून सव्वा वाजता उठून मॅन्चेस्टर डर्बी बघितली... आणि हाय रे दुर्दैवा... ३-० ची हार बघावी लागली. झोपही गेली आणि हारही झाली. निराशेतून सुचलेलं हे कवन, आपणासमोर ठेवतोय, फुटबॉल रसिकांना, त्यातून युनायटेड फॅन्स ना या भावना नक्कीच जास्त समजतील.
(धुनः भातुकलीच्या खेळामधली)
मॅन्चेस्टरच्या युनायटेड ची, हालत केविलवाणी
अर्ध्या मिनिटी घाव लागला, डर्बी लाजिरवाणी ||धृ||
पर्सी बसला, होऊनि जखमी, स्तंभ एक ढासळला
जुना मावळा, रूनी सुद्धा, मुळीच नाही फळला
होता होता गोल होईना, पळे तोंडचे पाणी ||१||