काल गजर लावून सव्वा वाजता उठून मॅन्चेस्टर डर्बी बघितली... आणि हाय रे दुर्दैवा... ३-० ची हार बघावी लागली. झोपही गेली आणि हारही झाली. निराशेतून सुचलेलं हे कवन, आपणासमोर ठेवतोय, फुटबॉल रसिकांना, त्यातून युनायटेड फॅन्स ना या भावना नक्कीच जास्त समजतील.
(धुनः भातुकलीच्या खेळामधली)
मॅन्चेस्टरच्या युनायटेड ची, हालत केविलवाणी
अर्ध्या मिनिटी घाव लागला, डर्बी लाजिरवाणी ||धृ||
पर्सी बसला, होऊनि जखमी, स्तंभ एक ढासळला
जुना मावळा, रूनी सुद्धा, मुळीच नाही फळला
होता होता गोल होईना, पळे तोंडचे पाणी ||१||
माटा वदला, मला करू द्या, गनिमावरती गोल
संधी येता, परी तयाने, ठरवली ती फोल
हाता तोंडा येता घास, काढुनि घेई कोणी ||२||
वाढत गेले, वैफल्य मग, गडी जाहले हिंस्त्र
फेलैनी ने, वापरले मग, कोपररूपी अस्त्र
एकाएकी होऊ लागले, सगळे इथे अडाणी ||३||
मोयेस होई, लाल बुंद मग, जागीच घाली घिरट्या
तया कळेना, कान पकडुनी, कुणा म्हणावे कारट्या
कापत राही रागाने तो, एकटाच वेड्यावानी ||४||
एक बिचारा, तेथ डी हिया, हतबल लढवी खिंड
गोल कराया, चालून येता, सिटीवाल्यांची झुंड
अखेर खापर त्याच्या माथी, त्याची हीच विराणी ||५||
समय संपता, शिटी वाजली, आणि काय विचारा
तीन शून्य ची, हार जाहली, खेळ संपला सारा
जीजीएमयू, जीजीएमयू, तरीही गाई कोणी ||६||
आहे जरी हा, समय कठीण, झगडती सारे वीर
उभे पाठीशी, फॅन तरीही, अखंड अन खंबीर
मारू उसळी गर्तेतून ही, अमुची रीत पुराणी ||७||
- अपूर्व ओक
-----------
वर म्हटल्याप्रमाणे, या सीजन ला नाही पण पुढच्या सीजन ला नक्कीच कमबॅक होणार अशी खात्री आहे...
ग्लोरी ग्लोरी मॅन्स युनायटेड!
प्रतिक्रिया
26 Mar 2014 - 2:22 pm | आत्मशून्य
.
26 Mar 2014 - 2:24 pm | राजो
बाकि काही लोकांचा (आयुष्यात कधीही फुटबॉल ला पायही लावला नसेल) फुटबॉल(बघण्या)चा उत्साह बघून मौज वाटते.
26 Mar 2014 - 2:27 pm | बॅटमॅन
ते तर क्रिकेट, बुद्धिबळ किंवा युद्ध, इ.इ. सर्वच क्षेत्रांबद्दल तितकंच लागू होतं, नै का?
बाकी कविता आवडलीच-यद्यपि फुटबॉलचे लै मोठ्ठे फ्यान नसलो तरी.
26 Mar 2014 - 6:31 pm | वेल्लाभट
नाईस टॅकल
26 Mar 2014 - 3:45 pm | अनुप ढेरे
=))
26 Mar 2014 - 6:32 pm | वेल्लाभट
तब हम हंसेंगे... और बाकी सब....
26 Mar 2014 - 4:15 pm | छोटा डॉन
डार्बी पाहिलीत काय काल जागुन !
फूटबॉलवर कविता लिहलीत म्हणुन तुमचे कौतुक आहे.
बाकी यंदा चेल्सी येणार हे लिहुन घ्या. मॅनयु जोवर मोयेस ला फायर करत नाही तोवर काही वर येत नाही.
युरोला क्लालिफाय झाले तरी लै आहे.
- (चेल्सीप्रेमी) छोटा डॉन
26 Mar 2014 - 5:08 pm | अनुप ढेरे
पुढच्या शीजनला ते ना चॅपियन्स लीग ना युरोपा लीग खेळतील. म लीग वर कॉसन्ट्रेट करता येइल की त्यांना...
:D
26 Mar 2014 - 6:33 pm | वेल्लाभट
It will get worse before it gets any better
26 Mar 2014 - 4:44 pm | विअर्ड विक्स
काव्य आवडले.... alex ferguson ना Mentor म्हणनू तरी ठेवले पाहिजे २-३ वर्षे.....
मोयेस मध्ये क्षमता नाही आणि संघ पण बराच दुबळा आहे. एका वर्षात एवढी दारूण अवस्था होईल असे वाटले नव्हते...............
26 Mar 2014 - 5:09 pm | अनुप ढेरे
याच संघानी गेल्या सीझनला ११ प्वाईंट्सनी लीग जीतली होती. त्यांचा मॅनेजर छगन आहे.
26 Mar 2014 - 6:57 pm | बॅटमॅन
छगन वाचताक्षणी फुस्सकन हसलो =))
फारा दिवसांनी हा शब्द ऐकला. म्हाराष्ट्रात राहूनही उत्तरभारतीय ग्यांगमध्ये राहिल्याचा परिणाम, दुसरे काय?
26 Mar 2014 - 6:35 pm | वेल्लाभट
मोयेस स्ट्रगल करतोय... मान्य.
संघ दुबळा... नो नो नो. यांनीच गेल्या वर्षी ट्रॉफी आणलेली. मिड्फील्ड घाण करतंय. तिथे सुधार हवाय.
26 Mar 2014 - 6:46 pm | विअर्ड विक्स
sangh दुबळा म्हणण्याचे कारण बचाव फळी आहे कि नाही असे म्हणावेसे वाटते ..... vidic and ferdinand are going through bad patch...
champion league मधला विजय बघून थोडे हायसे वाटले इतकेच
26 Mar 2014 - 10:14 pm | सूड
पहिलं कडवं बर्यापैकी मीटरमध्ये आलंय.
27 Mar 2014 - 12:20 am | अत्रुप्त आत्मा
सुंदर आशय अभिव्यक्ती!
27 Mar 2014 - 7:25 am | वेल्लाभट
धन्यवाद :)