अभिजात मराठी

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
5 Oct 2024 - 7:38 pm

सालंकृत नटली मराठी,
झाली अभिजात मराठी ।।

कोल्हापूर,जळगाव गोवा कोकण
नागपूर सातारा सांगली मराठी,
अनेक स्वादांची, सर्वच चांगली मराठी ।।

आंग्लमिश्रीत भ्रष्टतोमय मराठी,
सावरकरांची शुद्ध तेजोमय मराठी ।।

शासकीयपत्रातील दूर्बोध गूढ मराठी,
ओव्या अभंगातील गोड मराठी,

संगणक प्रोग्रामींग शिकवणारी
अर्वाचीन मराठी,
शिलालेखांवर सापडणारी
प्राचीन मराठी ।।

फार्सीमिश्रीत बखरींतील मराठी,
दलीत साहीत्य तसेच नारायण सूर्वेंची
जळजळीत कष्टकरींतील मराठी ।।

कविता

दिवाळी अंक २०२४ :)

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Oct 2024 - 5:50 pm

यंदाचा दिवाळी अंक आमच्या संस्थळावर आलाच नाही
सदरहू जिलब्या आम्ही स्वप्नातच पाडल्या आहेत
कालपर्यंत लेखकूनी कोणापाशी तक्रारी मांडल्या नाहीत
कीबोर्ड जळमटले, डोळे शिणले
संस्थळावर जिलब्यांसाठीचे आवाहन शोधित फिरलो
अभिजात भाषेचे नवे सोवळे नेसून भिरभिरलो
पण
यंदाचा दिवाळी अंक आमच्या संस्थळावर आलाच नाही...

(वरील खरडीचे एखाद्या ज्ञात कवितेशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा..)

मुक्तकविडंबन

तृषा

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
3 Oct 2024 - 9:05 pm

चमचमणारी चांदणी
मला व्हायचीच नाही,
काळ्याकुट्ट रात्री
ती चंद्राशिवाय
एकटीच झुरत राहते...

पहाटेची उषा
मला व्हायचीच नाही
विखुरलेल्या किरणांनी
सूर्य हट्टाने
तिला होरपळतो...

रंगीत फुलपाखरू
मला व्हायचेच नाही
कोमल फुलाला
नकळतही टोचून
बढेजाव मिरवायचा नाही...

मला व्हायचंय नदी...सरिता...
खळखळ मधूर नादात
अस्तित्व माझं जपतं
तुझ्या कुशीत शिरणार आहे
नदी-समुद्राच्या मिलनात
तू माझा समुद्र होशील ना..
तिथे तृषा विरेल
बहरेल अंतरंग गहिरे
-भक्ती

प्रेमकाव्यमुक्तक

परतीचा पाऊस...

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
3 Oct 2024 - 5:26 pm

थोडासा चिडलेला.... अंमळ रुसलेला..

परतीचा पाऊस...

विजांच्या मागून जोरदार गरजला
बरसून दमल्यावर रस्त्यात भेटला
सवयीप्रमाणे थोडावेळ दाटला
मग जाताना कानात पुटपुटला...

कागदाच्या होड्या सोडताना
आताशा भेटत नाहीस ?
पन्हाळीखाली चिंब भिजताना
मुळी दिसतचं नाहीस ?

अनवाणी पायांनी वाहत्या
पागोळ्यांमागे धावत ही नाहीस
की ओंजळीत विरघळणाऱ्या
बर्फ़ाळ गारा वेचित नाहीस

इतका मोठा झालास की पावलांना
गुंजभर चिखल ही लागु देत नाहीस
इतका थोर झालास की कपड्यांवर
थेंबभर ओलसुद्धा सहन करीत नाहीस..

मुक्त कवितामुक्तक

रानफुले

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
3 Oct 2024 - 6:49 am

असाच भटकत रानात असता
रानफुले समोर येती

नव्हता कसला गंध तयांना
रंगही नव्हते भरजरी विविध
परी तयांत होती नक्षी
बारीक नाजूक सुंदर कोमल

पिवळे गेंद उन्हात चमके
वार्यावरती डौलाने डुलके
वेड लागले मलाच तेथे
दृष्य मनोरम खरोखर ते

डोंगर उतार पठारावरती
फुले पाहता लागली समाधी
घोस तयांचे लेऊन घ्यावे
वाटले तक्षणी अंगावरती

एकरूप व्हावे, तेथेच रमावे
परत न फिरावे घराप्रती
बघतो जेव्हा अचानक
रानफुले समोरी येती

- पाभे (03/10/24)
(काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)

भावकविताकविता

सांगलीचे कर्णमधूर लेझीम

स्वधर्म's picture
स्वधर्म in जनातलं, मनातलं
30 Sep 2024 - 7:50 pm

आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे.

संस्कृतीकलानृत्यसंगीतप्रकटनआस्वाद

सूर्य पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
30 Sep 2024 - 2:03 am

सकाळचे साधारण सात वाजले असावेत. श्रावण संपून गेला होता नुकताच तरी अजून आकाशामध्ये ढगांची दाटीवाटी होती. पश्चिमेकडे दूरवर दिसणाऱ्या यवतेश्वरचा डोंगर मात्र अजूनही ढगांच्या दाट धुक्याआड होता, दक्षिणेकडे मात्र अजिंक्यतार्‍याने हिरवीगार दुलई पांघरली होती, पांढरेशुभ्र धबधबे फिसाळत वहात त्या हिरवाईतुन वाट काढत होते. पुर्वेकडे सुर्योदय होऊन गेला होता मात्र सुर्याचा अजुनही ढगांआड लपंडाव चालु होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता. हे असं सारं पहात तासन तास बसुन राहावं अन हे सारं सौंदर्य भोगत रहावं बस असं कोणालाही वाटेल असं काहीसं वातावरण होतं .

कथाअनुभव

स्मशान

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
29 Sep 2024 - 8:04 am

शमशान . . .

मुझे खुद में दिखाई दिए वो,
जिन्हें मैं पागल समझता था !
एक दिन पता चला ,
वह साले बड़े सयाने थे !

धरम की अंधेरी खाइयों मे
सेवादार बनके जीता हू ।
लोग जिन्हे श्रद्धा सुमन कहेते है
उन्हे शराब बनाकर पीता हूँ

आप हसोगे मुझे ,
कहोगे , "वाह क्या सच्चाई देखते हो ! "
मै कभी आपको समझा नही सकूंगा ,
की मुझे झूठ भी कैसे ( ?) दिखाई देता है !?

जिंदगी जीने के इस झमेले मे
अब खुद को कुछ भी कभी नही कहूंगा
जन्मा था इन्सान बन के
फिर इन्सान होकर ही मरूंगा ।

------------
अतृप्त . . .

करुणशांतरससंस्कृतीधर्म