फाया
"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ?
मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते !
काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही
गरज तुझी यासाठी कशाला? कृबुच सर्व देई !"
कठोर शब्दे मानवी प्रतिभा दुःखमग्न झाली
नवक्षितिजांना ओलांडुन कृबु पार पुढे गेली
हताश होत्साती प्रतिभा क्षण-भर निष्प्रभ झाली
पुन्हा सावरून मनात काही जुळवून मग वदली,
"कृबुवरती स्तुतिसुमने उधळीत होऊ नको दंग
कारण विरहित कार्य कधीतरी असते का सांग ?
असेन कायम मीच मानवी सृजनाचा पाया
नसेल माझे अत्तर तर कृबु कोरडाच फाया :)"