~ गंध धुंद ~

किल्लेदार's picture
किल्लेदार in जनातलं, मनातलं
6 Nov 2025 - 9:44 am

कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.

विनोदसाहित्यिकसमीक्षालेखविरंगुळा

धुके असे पडले की

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
5 Nov 2025 - 9:01 pm

धुके असे पडले की

धुके असे पडले की
धुक्याचा महाल आकाशी
सोपान त्याचा असा की
त्यावरी उभी तू टोकाशी

तू परी अस्मानीची
मी फकीर धरतीचा
वाट अशी भयंकर
मार्ग नसे परतीचा
विचार तरी काय करावा ?
तोही थांबला तर्कापाशी

सोपानावरून खुणवू नको
जीवाची होईल तडफड
तुजसवे वर जायाचे तर
प्राणपाखरू करेल धडपड
इथे जगुनी काय करावे ?
आता जावे स्वर्गलोकाशी

हे ठिकाण

मिताली राजला आउट करणारी नांदेडची मुलगी

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
4 Nov 2025 - 4:42 pm

नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्‍यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्‍या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्‍या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!

समाजव्यक्तिचित्रलेखअनुभव

शाळेची वेळ झाली -बालकविता

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
2 Nov 2025 - 1:14 pm

शाळेची वेळ झाली

चला चला बॅग भरा
चला चला डबा भरा
शाळेची वेळ झाली
शाळेची वेळ झाली

एक वही सापडत नाही
गृहपाठाचा पत्ता नाही
पेन्सिल तर तुटकी बाई
पेनामधून गळते शाई
शाळेची वेळ झाली

अंघोळ म्हणजे दोनच तांबे
नुसती बुडबुड जरा न लांबे
बाबांची तर चाले लुडबूड
टॉवेल मिळेतो माझी कुडकूड
शाळेची वेळ झाली

डब्यात काय ? पोळीचा रोल
आणि दोन बिस्किटं गोल
शाळा माझी तिची घाई
कित्ती कामं करते आई
शाळेची वेळ झाली

हे ठिकाण

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला (तरही)

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
2 Nov 2025 - 10:55 am

सानी मिसऱ्याची ओळ क्रांतिताई (क्रांति साडेकर) यांची,
तरही साठी ओळीबद्दल आभार, त्यांना न विचारता ही ओळ वापरली त्याबद्दल क्षमस्व! ओळ वाचून नाही राहवलं.
===================================
त्याच वाटेवर जुन्या भटकायचे नव्हते मला
(या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला)

पेन्शन खातेच मी बदलून गावी घेतले
आणखी शहरात त्या राहायचे नव्हते मला

मी मुलांना मारले अन शिस्त करडी लावली
देशवासी कमकुवत घडवायचे नव्हते मला

नवकवी बोलावला नाहीच त्यांनी एकही
मैफलीला त्यामुळे ह्या जायचे नव्हते मला

gazalगझल

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
31 Oct 2025 - 9:18 am

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला

✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा!
✪ अंजवेलमधलं भूताचं झाड…
✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच
✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या!
✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग
✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना
✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा
✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण
✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय?
✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे

क्रीडाशिक्षणलेखअनुभव

निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
29 Oct 2025 - 9:39 pm

‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.

कविताविचारप्रतिसादआस्वादसमीक्षा

तुरीच्या दाण्यांची कचोरी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
26 Oct 2025 - 1:39 pm

"तुरीच्या दाण्यांची कचोरी" ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगांपासून काढलेले हिरवे दाणे वापरून बनवली जाणारी ही कचोरी कुरकुरीत आणि मसालेदार असते. ती चहा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासोबत उत्तम लागते.
दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे.एक तोडी केली तेव्हा आज कचोरी केली.पुढच्या तोडीला आमटी करणार आहे.

समरसतेची ऐशी-तैशी

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
24 Oct 2025 - 9:09 am

समरसतेची ऐशी-तैशी
===========

--राजीव उपाध्ये

गेल्या काही आठवड्यातल्या बातम्या जर व्यवस्थित समजाऊन घेतल्या तर काही ठळक गोष्टी लक्षात येतात - संघाने आजवर सोडलेल्या पुड्यांपैकी ’समरसतेच्या’ पुडीला छानपैकी चुना लागलेला आहे.

संघाच्या शंभरीच्या निमित्ताने जो उन्माद बाहेर पडला त्यात एक गोष्ट परत-परत उगाळली गेली, ती म्हणजे संघ बदलला पण टीकाकार तिथेच आहेत. हा उन्माद संघाच्या दिशाभूल करण्याच्या रणनीतीला साजेसाच आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे की उन्माद त्या व्यक्तीला/समूहाला नेहेमी बेसावध ठेवतो. हा बेसावधपणा मग कमकुवत बाजूला उघडं पाडतो.

समाज

कळलं च नाई

सुखी's picture
सुखी in जे न देखे रवी...
22 Oct 2025 - 8:20 am

इवले इवले डोळे, खूप खूप खेळले,
दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले,
रडता रडता कधी हसले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे,
मोठे कधी झाले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, दूर निघून गेले,
कधी परत येतात, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, परत फिरून आले,
नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.

अव्यक्तबालसाहित्यमाझी कविताकविता