वाहुनी तू रहावे
नसे सोय बोलून सत्यात काही
जगाला हवे ते असत्यात राही
उगा मौन राखून विश्वा पहावे
वहात्या जगा वाहुनी तू रहावे
घळे आसवांतून पाषाण लेणी
मुकी साचताना उरी दैव देणी
अबोलाच बोलून गाईल गाणी
स्थितप्रज्ञ राहूनही काळ वाणी
झरे ज्ञान मर्मातले होत ओळी
जरी सांडले वेचले घेत झोळी
शिदोरीच वाटेत ही चालवावी
उपाशी जिवा तेवढी चाखवावी