शिक्षा.....
टप्पी टप्पी टप्पी.... छोटा मन चेंडू खेळण्यात मग्न होता. खेळता खेळता त्याच्या हातून चेंडू निसटला आणि आईने कट्ट्यावर मांडून ठेवलेल्या काचेच्या कपला धडकला. कप खाली पडला आणि फुटला. सुमित्रा हे डोळ्याच्या कोपर्यातून पहात होती. तीला पहायचे होते की आता मन काय करतो. एक समजूतदार पालक म्हणून तीने यावर लगेच व्यक्त व्हायचे मुद्दामुनच टाळले.
"मम्मा माझ्या कडून कप फुटला. मला शिक्षा सांग" . मनच्या वाक्याची सुमित्राला गम्मत वाटली. आणि मन खोटे बोलला नाही याचे बरेही वाटले.
" कप फुटला ना मग शिक्षा ही हवीच. तूच ठरव काय शिक्षा घ्यायची ते" सुमित्रा म्हणाली.