समाज

मराठी भावानुवादः मैं चमारों की गली तक ले चलूँगा आपको - अदम गोंडवी

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in जे न देखे रवी...
15 Apr 2016 - 6:56 am

कवी रामनाथ सिंग जे अदम गोंडवी ह्या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक जबरदस्त कवितांपैकी ही एक कविता. शिर्षकासारखी ही थोडी लांबलचक आहे. पण वाचली पाहिजेच. मूळ कविता इथे दिली नाही कारण ती खरंच दिर्घ आहे.

वाङ्मयकवितासमाज

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
13 Apr 2016 - 6:21 pm

"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच!

कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर!

रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता.

संस्कृतीकलामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रवासरेखाटनप्रकटनआस्वादलेखबातमीअनुभवविरंगुळा

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
9 Apr 2016 - 6:49 pm

वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

आय. आय. टी. प्रवेशासाठी नवे पात्रता निकष.

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
9 Apr 2016 - 10:48 am

भारतातले अभियंते नोकरीलायक नसतात अशी ओरड उद्योगव्यवसाय क्षेत्रातून नेहमीच होते. आय आय टी मधल्या विद्यार्थ्यांच्या दर्जाबाबतही असे प्रश्न उपस्थित होत असतात. त्याची कारणे आपण पाहिली आहेत. पण त्यावर उपाय काय? हे समजत नाही आणि कुठचाही पर्याय राष्ट्रीय पातळीवर व्यावहारिक ठरणार नाही म्हणून विरोध होतो. एकूण 'जे जे होईल ते पहावे' अशी अवस्था पालकांची झाली होती. 'तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर' या मालिकेत आपण यावर चर्चा केलीच होती.

धोरणमांडणीसमाजतंत्रविचारप्रतिसादप्रतिक्रियासमीक्षाबातमी

शतशब्दकथा : सर्टिफिकेट

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
8 Apr 2016 - 12:25 pm

अनिरुद्धने कपाटातून फाईल काढली.
नकळत स्मिताच्या एकेका सर्टिफिकेटवरुन त्याची नजर फिरत होती. दहावी, बारावी, एम बी बी एस्, एम डी सगळ्या परीक्षांत अव्वल यश. परीक्षांशिवायही काही सर्टिफिकेट्स होते अंताक्षरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि खूप काही कसल्या कसल्या परीक्षा , पेपर प्रेजेंटेशन्स. स्मिताने मेहनत करुन घवघवीत यश मिळवावं आणि घरी येवून बाबाला प्रेमळ आज्ञा करावी "बाबा..माझं सर्टिफिकेट फाईल करशील ना प्लीज"..आपल्या लाडक्या लेकीचं प्रत्येक नवीन सर्टिफिकेट फाईल करताना तो नेहमीच पुर्ण फाईल पुन्हा पुन्हा बघत रहायचा.

कथासमाजजीवनमानkathaaप्रकटनविरंगुळा

झब्बूशाहची पोरगी - खलिल जिब्रान

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in जनातलं, मनातलं
7 Apr 2016 - 11:46 am

झब्बूशाहची पोरगी - खलील जिब्रान

सिंहासनावर झोपलेल्या म्हातार्‍या राणीच्या आजूबाजूस चार गुलाम पंखा हलवत होते. ती घोरत होती आणि तिच्या कुशीत बसलेली मनिमाऊं म्यांव म्यांव करत अर्धोन्मिलित डोळ्यांतून गुलामांकडे टक लावून बघत बसलेली.

पहिला गुलाम बोलला, "झोपलेली असते तेव्हा ही म्हातारी किती किळसवाणी वाटते, हिचा लटकलेला जबडा बघा; आणि श्वास तर असा घेते आहे जणू सैतानाने हिचा गळा दाबून धरला आहे."

मनिमाउं म्यांव करत म्हणाली, "उघड्या डोळ्याने हिची गुलामी करतांना जितके कुरूप तुम्ही दिसता, झोपलेली असतांना ही त्याच्या अर्धीपण भयंकर दिसत नाही."

वाङ्मयकथासाहित्यिकसमाजजीवनमानभाषांतर

माझी ज्यूरी ड्यूटी ४

शेंडेनक्षत्र's picture
शेंडेनक्षत्र in जनातलं, मनातलं
5 Apr 2016 - 9:10 pm

आधीचा भाग

बचावपक्षाच्या वकिलाने निवड प्रक्रियेत असा एक प्रश्न विचारला होता की "ह्या खटल्यात वेश्या व्यवसायाशी संबंधित मुद्दे उपस्थित होऊ शकतात. हा व्यवसाय राज्यात बेकायदा मानला जातो. तुम्हापैकी कुणाला धर्म वा अन्य श्रद्धेमुळे ह्या व्यवसायाविरुद्ध काही आक्षेप असतील तर सांगा". इथे कुणी आक्षेप घेतला नाही. पण खटल्यात काय होणार ह्याची एक अंधुक कल्पना आली.

समाजअनुभव