समाज

कोषातून बाहेर (Ice-Breaker)

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 12:56 am

मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear)
मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting)
मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation)
मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech)

वावरसमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारप्रतिसादआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखअनुभवशिफारसमाहितीसंदर्भविरंगुळा

वेताळकथा: तर त्यांचे नाते काय असावे?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
13 Mar 2016 - 3:28 pm

मिसळपाव.कॉम वरील वाचकाने आपला हट्ट सोडला नाही. नेहमीसारखाच नविन काय वाचायला आले आहे ते पाहण्यासाठी तो पुन्हा ऑनलाईन आला. ते पाहून वेताळ त्याला म्हटला, "हे वाचका, असाही तू वेळ घालवण्यासाठी येथे आला आहेस. या जगात मानवप्राणी अगदी वेगळा आहे. थोडा विचित्र आहे असे म्हटले तरी चालेल. तर मग मी अशाच प्रकारातील एक सत्यकहाणी सांगतो ती तू ऐक म्हणजे तुझा वेळ मजेत जाईल." असे म्हणून वेताळ सत्यकहाणी सांगू लागला-----

कथासमाजजीवनमानप्रवासमतप्रश्नोत्तरेविरंगुळा

अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद हवा विसंवाद नको

अनिकेत एस जोशी's picture
अनिकेत एस जोशी in जनातलं, मनातलं
12 Mar 2016 - 8:44 pm

राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचा पहिला आठवडा तीन दिवसातच समाप्त झाला. 9 मार्चला सुरु झालेल्या या अधिवेशनाचे कामकाज 17 एप्रिलपर्यंत दाखवण्यात आले आहे. तसे पाहिले तर हे अधिवेशन चक्क चाळीस दिवस चालेल असे म्हणावे लागेल. पण प्रत्यक्षात कमाचे दिवस आहेत फक्त तेवीस!! दि. 17 एप्रिल पर्यंतचे अधिवेशन असे दाखवलेले आहे, पण त्यात दि. 13 एप्रिल नंतर साऱ्या सुट्याच आहेत. पहिला आठवडा तीन दिवसातच संपल्या नंतर पुढचा, म्हणजे दुसरा सप्ताह, हा कामाकजाच्या पूर्ण पाच दिवसांचा आठवडा आहे. त्या नंतरचा तिसरा आठवडा पुन्हा तीन दिवसांचा आहे.

समाजमाध्यमवेध

रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
12 Mar 2016 - 2:16 pm

जानेवारी २०१६ मध्ये 'ज्ञानयोद्धा' नावाची काही एक व्याख्यानमाला झाली असावी, रमेश ओझा नावाचे कुणि एक गांधीवादी आहेत त्यांचे या व्याख्यानमालेत रास्वसंघाची ९० वर्षे या विषयावर भाषण झाले असावे; ज्याचे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने वृत्तांकन केले होते. , रमेश ओझांनी रा.स्व.

समाजविचार

एक हवीहवीशी शाळा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
10 Mar 2016 - 4:43 pm

शाळा सुटण्याचा आनंद जिथे शाळा भरण्याच्या आनंदापेक्षा छोटा असतो, अशा शाळा विरळाच. अशाच एका शाळेबद्दल नुकतंच वाचलं. वाचून मनात प्रचंड कौतुक, प्रचंड आदर, प्रचंड प्रेरणा असे अनेक भाव दाटून आले. शाळेबद्दल; परंतु त्याहून अधिक या शाळेचा ख-या अर्थाने कायापालट करणा-या त्या एका व्यक्तीबद्दल.

समाजजीवनमानशिक्षणविचारअभिनंदनआस्वादबातमीमत

बोटीवरील जीवन

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
10 Mar 2016 - 6:54 am

जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्‍याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दिल

कथासमाजजीवनमानkathaaप्रवासदेशांतरनोकरीलेखअनुभवमाहिती

एका हाताने दुष्काळ गाडणारा 76 वर्षांचा ढाण्या वाघ

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 10:38 pm

आजपर्यंत आपण मिपावर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबद्दल अनेक लेख, कथा, कविता आपण बघितल्या आहेत आणि त्यावर गरमागरम चर्चाही झाल्या आहेत. या आत्महत्या अत्यंत दु:खदायक आहेत आणि त्याबाबत त्वरीत व दूरगामी असे दोन्ही प्रकारचे उपाय होणे जरूरीचे आहे याबाबत दुमत नाही.

यासंबंधी दुष्काळनिवारण योजनांवर नादखुळा यांनी शेततळ्यांच्या प्रकल्पाच्या माहितीची अनेक शेतकर्‍यांचे अनुभव असलेली प्रबोधक लेखमाला लिहिली आहे.

धोरणसमाजविचारबातमीमाहिती

गाव तस न्यार

शाहिर's picture
शाहिर in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 7:18 pm

आमच्या गावामंदी बगा, समदं कसा निवांत हुतं ! समदे पब्लिक गुन्या गोविंदाने नांदायचा आणि भांडायचा .
त्याच असा हाये , आमच्या गावात हये एक पार, चार गल्ल्यातले चार रस्त्ये हितेच येउन टेकत्यात.
दिवसभर कुठ कुठ काम करून माणस , बाया बापड्या यायच्या. चार घटका पारावर टेकायच्या, काय सुख दुख असेल तर सांगनार, कुनाला काय दवा पानी विचारणार , कुणाच्या घरी काय कालवणं याची बातमी काढणार आणि कुनी नवीन पाव्हना घावला तर येड्यात काडून रिकामा व्हनार !

सगळी टाळकी एकदम १२ **ची !

पण टाईम कसा जायचा कळ्ळाचा नाही आणी थोरामोठ्याकंन कायबाय कानावर पडायचा त्यात ज्ञानाचा मार्जिन पन निघायचा..

समाजमौजमजाप्रकटन

मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 12:23 pm

मुर्ती पुजा आणि सगुण पुजे बाबत बरीच उलट-सुलट चर्चा होत असते. भारतात मुर्ती पुजा केली तर जाते पण तत्त्वज्ञानाच्या बाजूला अद्वैतींचे प्राबल्य असल्यामुळे का काय मुर्ती पुजा आणि सगुण पुजेची बाजुने सहसा परंपरेचा हवाला दिला जातो तर्कसुसंगत मांडणी मात्र कमी दिसते, या धागा लेखात मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस म्हणजे सामर्थ्य, दुर्बलता, संधी, जोखीम
आणि 'वैशिष्ट्य, ऊपयोग, लाभ' ; शंका निरसन अशा प्रकारे मांडणी करण्याचा प्रयत्न आहे.

सामर्थ्य
१.१) निव्वळ प्रेरणा घेण्यासाठी,

समाज

#PledgeForParity शपथ समतेची

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 10:51 am

उद्या ८ मार्च. उद्या आहे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’. उद्या आहे शुभेच्छांची देवाणघेवाण. उद्या आहे समस्यांची आकडेवारी आणि चिंता. उद्या काही भाषणं, काही लेख, आणि थोडे सुस्कारे. उद्या प्रगतीची काही उदाहरणं वाचून जागा होणारा आशावाद. उद्या रेडिओ, वर्तमानपत्रं, टीव्ही इकडं सगळीकडं झळकणारं अभिवादन, अभिनंदन आणि कौतुक. ‘महिलांसाठी अमुक इतका डिस्काउंट’ असा बाजाराचा गोंगाट. उद्या महिला मेळावे, ठेवणीतले कपडे घालून आलेल्या स्त्रियांचे एकत्र जेवणाचे कार्यक्रम. उद्या थोडं हसू, काही उद्विग्नता..

इतिहाससमाजशुभेच्छालेखमाहिती